Monday, January 13, 2020

शिवा संघटना राजकारणात सक्रिय होणार ? २८ जानेवारीला वर्धापनदिनी भूमिका स्पष्ट करणार - प्रा.मनोहर धोंडे सर

शिवा संघटना राजकारणात सक्रिय होणार ? २८ जानेवारीला वर्धापनदिनी भूमिका स्पष्ट करणार -  प्रा.मनोहर धोंडे सर 
ठाणे(पश्चीम) / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
वीरशैव लिंगायत समाजाच्या शिवा संघटनेचा २८ जानेवारीला होणाऱ्या २४ वर्धापन दिनाच्या अधिवेशना पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर यांनी दिले आहेत.यंदा संघटनेचा वर्धापन दिन वसईत होणार आहे.
शिवा संघटनेची स्थापना १९९६ साली झाली.संघटनेच्या आतापर्यतच्या वाटचालीत राजकारणापेक्षा समाजकारण केले जात होते.समाजाला मदत करणाऱ्या पक्षाला साथ देण्याची भूमिका संघटनेची असायची.पण आता राज्यात बदलेल्या राजकीय समिकरणांमुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तशी घोषणा करू असे प्रा.मनोहरजी धोंडे सर यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
    वसईतील एव्हरशाईन सिटी येथे संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.त्यावेळी मुख्य कार्यक्रमाआधी ओकीवरे चौकातील काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यत मिरवणूक काढण्यात येणार आहे.राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने संघटनेचे राज्य आणि देशातील इतर भागातून हजारो कार्यकर्ते वसईत येणार असल्याचे प्रा मनोहजी धोंडे सर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment