सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. वसंत सातपुते हे होते तर प्रमुख उपस्थितीत रोटरी क्लब सोनपेठचे असिस्टंट गव्हर्नर रो.इंजी. चंद्रकांत लोमटे, स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय रुग्नालय अंबाजोगाई येथिल डाॅ.सुजित तुम्मोड, ठाकुर शहा, रमेश तोगरे, बाबा शेख , डिघोळचे सरपंच गोकुळ आरबाड, कार्यक्रम अधिकारी व स्वारातीमवि रासेयो सल्लागार समिती सदस्य डाॅ.मारोती कच्छवे व सहायक कार्यक्रम अधिकारी मुक्ता सोमवंशी यांचा समावेश होता.
यावेळी महाविद्यालयातील प्रा.सखाराम कदम, दत्ता सोनटक्के, प्रा.संतोष वडकर, डाॅ.मुकुंदराज पाटील, गवळी पिंप्रीचे उपसरपंच तुकाराम यादव यांच्यासह रासेयो विभागातील विद्यार्थी व सोनपेठ येथील अनेक तरूणांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ.बापुराव आंधळे यांनी केले तर आभार मुक्ता सोमवंशी यांनी मानले.
No comments:
Post a Comment