Friday, January 17, 2020

धर्म संस्काराच्या आचरणातून शैक्षणिक क्षेत्रात फुलवाडकरांचे अवीस्मर्णीय कार्य-हभप गहिनीनाथ महाराज औसेकर

धर्म संस्काराच्या आचरणातून शैक्षणिक क्षेत्रात फुलवाडकरांचे अवीस्मर्णीय कार्य-हभप गहिनीनाथ महाराज औसेकर
गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-
 
धर्म संस्काराच्या आचरणातून शैक्षणिक क्षेत्रात फुलवाडकरांचे अवीस्मर्णीय कार्य आहे, त्याच बरोबर अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्रातही ते निष्ठेने महत्वपूर्ण योगदान देतात असे प्रतिपादन हभप गहिनीनाथ महाराज औसेकर (सह अध्यक्ष, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर संस्थान समिती, पंढरपूर) यांनी रविवारी, (१२ जानेवारी) गंगाखेड येथे केले. कार्यक्रमच्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. आत्माराम टेंगसे हे होते.प्रेस असोसिएशन गंगाखेडचे संस्थापक-अध्यक्ष शंकर इंगळे यांच्या मूळ संकल्पनेतून माजी प्राचार्य डॉ. दीनानाथ फुलवाडकर यांचा ७५ व्या वर्षात पदार्पणामुळे अमृतमहोत्सव गौरव सोहळा समितीच्या वतीने भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शुभार्शीवचन देताना औसेकर महाराज पुढे म्हणाले, फुलवाडकरांची धार्मिक कार्यात सातत्याने सहभाग असून ते आमच्या संतश्रेष्ठ मल्लनाथ बाबांचे भक्त आहेत. आई वडिलांची सेवा करणारा मुलगा फुलवाडकर यांच्या सारखा मी दुसरा पहिला नाही असे गौरवोदगार औसेकर महाराज यांनी यावेळी काढून उपदेश, दृष्टांत याप्रसंगी दिले.
फुलवाडकर हे आजचे साने गुरुजी-विलास बडे
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विलास बडे (अँकर, न्युज18 लोकमत, मुंबई.) हे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, साने गुरुजी पाहण्यात आले नाहीत पण स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन शिक्षण क्षेत्रात निष्ठेने एक आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी उभी हयात डॉ. दीनानाथ फुलवाडकर सरांनी घातली. एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात गौरव समारंभ होत असल्याने अमृतमहोत्सव प्रसंगी ढीगभर फुलांना स्पर्श आणि फुलवाडकर सरांच्या चरणी लीन होता आले, हे माझे भाग्य समजतो असेही श्री. बडे यांनी सांगून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी  व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष .डॉ. आत्माराम टेंगसे, (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक) यांच्या अध्यक्षतेखाली व
प.पू. हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, (सह अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान समिती, पंढरपूर), श्री. विलासजी बडे,(अँकर, News 18 लोकमत, 
मुंबई.) श्री. विजयजी जोशी,(मा. अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद, परभणी.) अॕड. रमेशराव मोहळेकर,(अध्यक्ष,श्री संत जनाबाई शिक्षण संस्था, गंगाखेड) आदींची उपस्थिती होती.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.धूत यांनी केले. यावेळी विजय जोशी सर यांनी मनोगत व्यक्त केले. 
सत्कारास उत्तर देताना डॉ.दीनानाथ फुलवाडकर म्हणाले, या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे, या पुढेही मी सामाजिक, साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात मिळेलते काम पार पाडीन.अध्यक्षीय समारोप डॉ.टेंगसे यांनी केला.यावेळी शंकर इंगळे संपादित "गोदांगण" या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सन्मान पत्राचे वाचन प्रा. जयश्री पछाडे,सूत्र संचालन प्रशांत प्र. जोशी, लॉ. केशव देशमुख यांनी केले.

No comments:

Post a Comment