सोनपेठ (दर्शन):-
सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती श्री.ष.ब्र.108 गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी नुकतेच माननीय ना.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना एका निवेदनाद्वारे श्री साईबाबा जन्मस्थानाचा मुद्दा हा परभणी जिल्ह्यातील पाथरी संस्थानचा विचार घेऊन सोडवावा कारण जन्मभूमी ही जन्मभूमी असते तर कर्म भूमि ही कर्मभूमी असते म्हणून इतर कोणी श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ वेगळे आहे म्हणत असतील तर त्यांच्या व श्री साईबाबा जन्मभूमी मंदिर संस्थान यांच्या पुराव्यांची पडताळणी करून निर्णय घ्यावा अशी विनंती केलेली आहे.या निवेदनाच्या प्रती परभणी जिल्हाधिकारी तसेच सोनपेठ तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत तसेच परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या विकासाच्या बाबतीत कोणीही राजकारण करू नये असेही मत श्री.ष.ब्र.108 गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment