प्राचार्य सुरेश नाईकवाडे 23 जानेवारी 2020 रोजी आकाशवाणीवर
परभणी / सोनपेठ (दर्शन):-
परभणी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांचे 23 जानेवारी 2020 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त "नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान या विषयावर वार्तालाप प्रसारीत होणार आहे.
दि.23 जानेवारी 2020 हा दिवस संपूर्ण देशात महान देशभक्त देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात येते. या निमित्तानेच परभणी आकाशवाणी केंद्रावर सकाळी 08.45 वाजता "नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान या विषयावर प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या वार्तालाप प्रसारीत होणार आहे.
प्राचार्य सुरेश नाईकवाडे हे गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. परभणी जिल्हयातील सर्व नागरीकांनी वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी परभणी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment