Tuesday, January 7, 2020

नववर्षात विविध 15 दिवसाकरीता ध्वनीची विहीत मर्यादा राखुन सवलत जाहीर - जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर

नववर्षात विविध 15 दिवसाकरीता ध्वनीची विहीत मर्यादा राखुन सवलत जाहीर - जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :- ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनूसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहीक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागेखेरीज इतर ठिकाणी वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहीर करण्याकरीता जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने प्राधिकृत केले आहे.

          जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी शासन निर्णयानूसार आगामी उत्सव कालावधी लक्षात घेता 2020 मध्ये एक दिवस राखीव ठेवून 14 दिवसासाठी फक्त ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वेळेची सवलत शिवजयंती, ईद-ए-मिलाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन यांना प्रत्येकी एक दिवस तर गणपती उत्सवात स्थापना दिवस, दुसरा व पाचवा दिवस, गौरी विसर्जन व अनंत चर्तुदशी यासह 5 दिवस तर नवरात्री उत्सवात अष्टमी व नवमी एकुण दोन दिवस आणि दिवाळी लक्ष्मीपुजन, 31 डिसेंबर, ख्रिसमस प्रत्येकी एक दिवस आणि राज्य शासनाच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार उर्वरित 1 दिवस परवानगी जाहीर करण्यात येईल. असे परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment