Thursday, January 2, 2020

श्री सोमेश्वर मंदिर दहीखेड येथे अखंड हरीनाम सप्ताहास उद्या दि.3 जानेवारी शुक्रवार रोजी प्रारंभ

श्री सोमेश्वर मंदिर दहीखेड येथे अखंड हरीनाम सप्ताहास उद्या दि.3 जानेवारी शुक्रवार रोजी प्रारंभ 
सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरातील ग्राम दैवत श्री सोमेश्वर मंदीर दहिखेड येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा सोहळा दि.3 जानेवारी 2020 शुकवार रोजी प्रारंभ होत असुन सांगता दि.10 जानेवारी 2020 शुक्रवार रोजी होणार आहे.भागवत कथेचे यजमान श्री लक्ष्मण पिलाजी साबळे हे असुन.भागवत कथा प्रवकत्या भागवताचार्य श्री.ह.भ.प.रुक्मिणीताई हावरे आपल्या मधुर वाणीतुन कथा सांगणार आहेत. यांना साथ अजय तुपे, योगेश करंजीकर, अविनाश वैजापुरकर हे देतील, दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दु. 1 ते 4 भागवत कथा ज्ञानयज्ञ, हरिपाठ, रात्रो 9 ते 11 नामवंत किर्तनकारांचे हरिकिर्तन होणार आहे.या निमित्त शुक्रवार रोजी ह.भ.प.भागवताचार्य नारायन महाराज पालमकर, शनिवार ह.भ.प.भागवताचार्य हरिदास महाराज पौळ, रविवार ह.भ.प.विनोदाचार्य विलास महाराज गेजगे, सोमवार ह.भ.प.रुक्मिणीताई हावरे, मंगळवार ह.भ.प.भागवताचार्य नामदेव महाराज फपाळ, बुधवार ह.भ.प.भागवताचार्य केशव महाराज उखळीकर, गुरुवार ह.भ.प.भागवताचार्य रुपालीताई सवणे, शुक्रवार ह.भ.प.मधुसुदन महाराज दैठणकर यांचे सकाळी ११ ते १ काल्याचे किर्तन होणार आहे. सामुदायीक महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे.या धार्मीक कार्यक्रमाचा भावीक भक्तानी लाभ घ्यावा असे अवाहन समस्त गावकरी मंडळी दहिखेड, सोनपेठ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment