जिंतुर येथिल व्दादश पट्टाधिकार महोत्सवच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे गौरवाध्यक्षपदी श्री.ष.ब्र.108श्रीगुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची निवड
परभणी / सोनपेठ (दर्शन ) :-
श्री ष. ब्र.108 श्रीगुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज अमृतेश्वर मठसंस्थान जिंतूर यांचे व्दादश पट्टाधिकार महोत्सवच्या निमित्ताने श्री.श्री.श्री.1008 जगद्गुरु सुर्यसिंहासनाधिश्वर डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल्य पिठ,श्री.श्री.श्री. 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपिठ यांच्या भव्य दिव्य सानिध्यात संपन्न होणारा आणि सामुहिक विवाह सोहळ्याचे ही भव्य दिव्य आयोजनाच्या कार्यक्रमाचे गौरवाध्यक्ष पदी श्री.ष.ब्र.108 श्रीगुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची निवड झाली या निवडी प्रित्यर्थ वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र च्या वतीने प्रभावती नगरी चे खा.मा. संजय जाधव यांच्या निवासस्थानी खा. संजय जाधव व वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.मदन लांडगे, प्रदेश सचीव प्रवक्ते विरभद्र मठपती यांनी श्री.ष. ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी विरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे सोशल मीडिया प्रमुख सोमेश्वर लाहोरकर, प्रतिष्ठान चे सदस्य महेश स्वामी, प्रतिष्ठान चे कर्मचारी अध्यक्ष विठ्ठल रनबावरे, बबन मठपती झरीकर, संजय फूलझळके करडगावकर आधी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment