सोनपेठ येथिल राजीव गांधी महाविद्यालयात आज पासून 'पत्रकारिता सप्ताहा' ची सुरुवात ; विशेष व्याख्याने, स्पर्धा व पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथिल राजीव गांधी महाविद्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून, 'पत्रकारिता सप्ताहा' ला सुरुवात झाली. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सुरू झालेल्या या सप्ताहात विशेष व्याख्याने, बतमि लेखन स्पर्धा, भित्तीपत्रके प्रकाशन आदी कार्यक्रमांचे आयोजन केल्या गेले आहे. ११ जानेवारी रोजी पत्रकार सन्मान सोहळ्याने या सप्ताहाचा समारोप होईल.
सविस्तर वृत्त असे की, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिन. महाराष्ट्रात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून 6 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत सोनपेठ शहरातील राजीव गांधी महाविद्यालयात पत्रकारिता सप्ताहात चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात पत्रकारितेच्या विविध पैलूंवर अभ्यासकांची व्याख्याने, बातमी लेखन स्पर्धा, भित्तीपत्रके प्रकाशन, अशे विविध कार्यक्रम होणार आहेत. शेवटच्या दिवशी, ११ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात येईल. पत्रकारितेच्या विविध पैलूंची सखोल चर्चा व्हावी तसेच शहरातील पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान व्हावा यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून आज या पत्रकारिता सप्ताहात सुरुवात झाली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवन व कार्य या विषयावर प्रा. चंद्रशेखर किरवले यांचे व्याख्यान झाले. मराठी पत्रकारितेला जांभेकरांनी दिलेले योगदान तसेच त्यांचा विद्याव्यासंग यावर प्रा.किरवले यांनी आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कांबळे यांनी केले तर आभार माऊली कदम या विद्यार्थ्याने मानले. प्रा.नर्गिस शेख, लायब्रियान रेखा कांबळे, विकास मोर्टाते, दिक्षा शिरसाठ, स्वेता चौहान, बाळु भरती, सावित्रीबाई शिंदे, कैलास भालेराव आदी सह मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
No comments:
Post a Comment