Saturday, January 4, 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना'संदर्भात दि.6 व 7 रोजी प्रधान सचिव आभा शुक्ला यांची मुलाखत

'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना'
संदर्भात दि.6 व 7 रोजी प्रधान सचिव आभा शुक्ला यांची मुलाखत
            
 मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना' या विषयावर  सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सोमवार दि. 6 आणि मंगळवार दि. 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक  राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
         महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, या कर्जमुक्ती योजनेत  नेमका कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, जुन्या कर्जमाफी तसेच नवीन कर्जमुक्ती योजनेत नेमका कोणता फरक आहे, आपले सरकार सेवा केंद्राची कर्जमुक्तीसाठी कशी व कुठे केंद्र असणार आहेत, आदी विषयांची माहिती श्रीमती शुक्ला यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment