व्हिजन पब्लिक स्कूल येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्धघाटन उत्साहात संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
दिनांक 8 जानेवारी रोजी सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शालेय क्रीडा महोत्सवाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोनपेठ शहराच्या मुख्य अधिकारी सोनल देशमुख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विनोद पवार सर, संस्थेचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे सर, उपप्राचार्य भगवान घाटूळ सर,मुख्याध्यापक रामेश्वर हुंबे सर (विश्वभारती प्रायमरी स्कूल,सोनपेठ), संदीप पोरे, काशिंदे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रल्हाद निर्मळ सर यांनी केले. स्पर्धेची सुरुवात म्हणून मशाल पेटविण्यात आली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पांडुरंग डुकळे सर यांनी केले. तसेच प्रमुख पाहुणे देशमुख मॅडम ने विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळाचे महत्त्व व मार्गदर्शन केले. व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कबड्डी या स्पर्धेचे रिबीन कट करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सुरुवातीच्या सामना हा इयत्ता 9 ब विरुद्ध 8 ब असा खेळण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षक विठ्ठल राठोड सर, रवी कुमार स्वामी सर, व सुरज गायकवाड सर मिलिंद जाधव सर, अनिल पौळ सर, बाळासाहेब धोंडगे सर, आशिष सर, केशव चव्हाण सर,सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment