Friday, January 24, 2020

भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे : डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज

भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेला अनन्यसाधारण 
महत्व आहे : डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज 

लातूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु परंपरेला अनन्य साधारण असे महत्व आहे.मानवाच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम गुरूच्या माध्यमातून केले जाते,असे प्रतिपादन वसुंधरारत्न शतायुषी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज  यांनी केले.लातूर येथे डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्संग सोहळ्यात ते उपस्थित भाविकांना आशिर्वचन देत होते.या सत्संग सोहळ्याच्या संयोजक सौ.लताताई मुद्दे या होत्या.तर यजमान श्रीमती रेखाताई कार्तिक स्वामी,सौ.निरुपमा कैलास स्वामी,सौ.अश्विनी संतोष स्वामी सौ.अनुराधा शिवयोगी स्वामी परिवार हे होते.आपल्या मार्गदर्शनात डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, अनेक जन्मानंतर मानव जीवनाची प्राप्ती होत असते. मानव जीवनाचा लाभ होणे हीच एक फार मोठी उपलब्धी आहे.मनुष्य जीवनात संस्कार, कृती,कर्माला फार महत्व असते.अंतःकरणातील आत्मा म्हणजे जाणीव असते.ही जाणीवच मानवी जीवनात बदल घडवून आणण्याचे काम करते.मनुष्य आणि इतर प्राण्यात अनेक बदल आहेत.अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव हा समाजाभिमुख,नाते संबंधांची  जाणीव ठेवून चालत असतो. मानवात विचार, विवेक, जाणीव आढळून येते.या जाणिवेच्या माध्यमातून दैनंदिन कुलसंस्कार होत असतात.म्हणून तर जीवनात संस्काराचे मोल अधिक असते.समाजात वावरतांना काय करावे, काय करू नये याची जाण असणे आवश्यक असते.प्रत्येकाने आपण स्वतःशी तसेच इतरांशी कसे वागतो, वर्तन ठेवतो, याचे आकलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्यावरून आपण जे कांही करतो आहोत ते योग्य आहे की अयोग्य, हे लक्षात येऊ शकते.परिस्थिती कशी का असेना, व्यक्तीने आपला चांगुलपणा कदापि सोडता कामा नये. व्यक्तीवर आई - वडिलांकडून चांगले संस्कार होत असतात.त्यामुळे ईश्वराच्या पूजा,आराधनेपेक्षा अगोदर माता - पित्याची त्यानंतर गुरुची पूजा करा,असा सल्लाही डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी दिला.दैनंदिन जीवनात आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीत चुका होणार नाही,याची दक्षता घेऊन मार्गोक्रमण करा,असे आवाहनही डॉ.शिवलिंग शिवाचार्यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शिवलिंग शिवाचार्य सत्संग मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

सोनपेठ तालुक्यातील पंचक्रोशितील एकमेव साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी
मो.9823547752.

No comments:

Post a Comment