जिजामाता पब्लिक स्कूल येथे ज्ञानबोध सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील विद्यार्थी मध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व या थोर महापुरुषांच्या कार्याचे स्मरण व्हावे यासाठी सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादासह जिजामाता ज्ञानबोध सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ.विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.मुक्ताताई सोमवंशी, शाळेचे उपप्राचार्य गणेश जयपाल तसेच सहभागी शाळेचे प्रतिनिधी एस.पी.गायकवाड, खरात सर, लटपटे सर ,राठोड सर ,पवार सर , होसनाळे सर ,गुजर सर ,खरे सर तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.तसेच मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.मुक्ताताई सोमवंशी यांनी "सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईचा आदर करावा व तिची शिकवणूक आत्मसात करावी असे मत व्यक्त केले". या परीक्षेमध्ये तालुक्यातील व्हिजन पब्लिक स्कूल, एल.आर.के.इंग्लिश स्कूल, अभय सिंह मेमोरियल इंग्लिश स्कूल, युनिटी इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद शाळा दहीखेड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणी संगम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघलगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विटा(खुर्द), जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळगाव, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा शेळगाव, व कै.बाजीराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेळगाव (महाविष्णू) येथील 950 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला.
शाळेतील विद्यार्थी सुयश वामन याने स्वामी विवेकानंदांची वेशभूषा परिधान केली,तर तेजस्विनी साबळे तिने राजमाता जिजाऊ ची वेशभूषा परिधान केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना वाकनकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश जयपाल सर यांनी केले.
No comments:
Post a Comment