Friday, January 31, 2020

2020-21 केंद्रीय अर्थसंकल्प ठळक मुद्दे :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन


2020-21 केंद्रीय अर्थसंकल्प ठळक मुद्दे  :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 

maharashtra times

  नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
संपूर्ण देश आणि उद्योग जगताचे लक्ष लागून राहिलंय ते आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि.1 फेब्रुवारी 2020 शनिवारी पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडला.
>> एससी आणि ओबीसींसाठी ८५ हजार कोटी, एसटीसाठी ५३७०० कोटी रुपये - अर्थमंत्री

>> ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी ९ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूदः

>> महिलांच्या पोषण आहारावर भर; यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूदः निर्मला सीतारामन

>> देशातील बालविवाहाचे प्रमाण घटलेः निर्मला सीतारामन

>> खाजगी क्षेत्राला डेटा सेंटर पार्क निर्मितीसाठी प्रोत्साहन देणारः निर्मला सीतारामन

>> शिक्षणात मुलांपेक्षा मुली आघाडीवर; मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढलेः निर्मला सीतारामन

>> बेटी बचाव, बेटी पढाव योजनेला उत्स्फूर्त प्रतिसादः निर्मला सीतारामन

>> देशातील सायबर सुरक्षेवर भर देणारः निर्मला सीतारामन

>> देशातील एक लाख ग्रामपंचायतींना भारत नेट योजनेने जोडणार; भारत नेट योजनेसाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूदः निर्मला सीतारामन

>> देशातील प्रत्येक घरात आता स्मार्ट मीटर बसवणारः निर्मला सीतारामन

>> अक्षय ऊर्जेसाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूदः निर्मला सीतारामन

>> राष्ट्रीय गॅस ग्रीडचे जाळे १६ हजार २०० कि.मी.ने वाढवणारः निर्मला सीतारामन

>> जगाच्या तुलनेत भारतात वेगाने विमान वाहतूक; २०२४ पर्यंत आणखी १०० विमानतळांची निर्मिती करणारः निर्मला सीतारामन

>> जलमार्गांचेही जाळे उभारणार; आसामला जोडणारा जलमार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होणारः निर्मला सीतारामन

>> २०२४ पर्यंत ६ हजार कि.मी. महामार्गांची निर्मिती करणारः निर्मला सीतारामन

>> बांधकाम, पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीः निर्मला सीतारामन

>> पायाभूत सुविधांवर खर्च केला जाणार; विमानतळ, बस स्थानके, रेल्वे स्थानके, घर निर्मिती अशा विविध प्रकल्पांवर कामे सुरूः निर्मला सीतारामन

>> उद्योग क्षेत्रासाठी २७ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूदः निर्मला सीतारामन

>> पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपयांची तरतूदः निर्मला सीतारामन


>> देशातील प्रत्येक जिल्ह्यात निर्यात केंद्रांची स्थापन केली जाणारः निर्मला सीतारामन

>> भारतात उद्योजकतेला प्रोत्साहन देणार; इन्वेस्टमेंट क्लिअरन्स सेलची लवकरच स्थापना करणारः निर्मला सीतारामन

>> मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतातच तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणारः निर्मला सीतारामन

>> उद्योजकता हे भारताचे बलस्थान असून, तरुणांना मोठ्या प्रमाणावर उद्योगाच्या संधी देणारः निर्मला सीतारामन

>> शिक्षणासाठी ९९ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूदः निर्मला सीतारामन

>> तरुण अभियंत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एका वर्षाची इंटर्नशीप दिली जाणारः निर्मला सीतारामन

>> आर्थिक विकासामध्ये उद्योग, व्यवसाय हे भाग महत्त्वाचेः निर्मला सीतारामन

>> पीपीपी तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जोडणार; केंद्र सरकारचा पुढाकार घेणारः निर्मला सीतारामन

>> टॉप १०० मध्ये असणाऱ्या शिक्षण संस्थांकडून डिजिटल शिक्षण उपलब्ध करून दिले जाणारः निर्मला सीतारामन

>> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून राष्ट्रीय पोलिस विद्यापीठाची घोषणा

>> २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नशीलः निर्मला सीतारामन

>> इंद्रधनुष्य योजनेत नव्या १२ आजारांचा समावेशः निर्मला सीतारामन

>> आरोग्य क्षेत्राला बळ देण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या तरतुदी; गरिबांना स्वस्तात उपचार देण्यावर भर

>> शेती आणि ग्रामीण विकासासाठी ३ लाख कोटींची तरतूदः निर्मला सीतारामन

>> मत्स्य उत्पादन २०० लाख टनांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्टः निर्मला सीतारामन

>> मच्छीमारांसाठी सागर मित्र योजना राबवली जाणारः निर्मला सीतारामन

>> जिल्हा स्तरावर फळबागा विकासासाठी प्रोत्साहन दिले जाणारः निर्मला सीतारामन

>> शेतकऱ्यांसाठी किसान रेल सुरू करणारः निर्मला सीतारामन

>> एक वस्तू, एक जिल्हा यावर भरः निर्मला सीतारामन

>> ६ कोटी शेतकऱ्यांना विमा योजनांचा लाभ देणारः निर्मला सीतारामन

>> झिरो बजेट शेतीवर सरकारचा भरः निर्मला सीतारामन

>> १६ सूत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर; सौर पंप, शेतीवर गुंतवणूक या मुद्द्यांचा समावेश: निर्मला सीतारामन

>> कृषी क्षेत्रासाठी १६ सूत्री कार्यक्रम राबवणार; राज्य सरकारचा अंमलबजावणीत समावेश असेलः निर्मला सीतारामन

>> शेतीसाठी सौरऊर्जा वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरूः निर्मला सीतारामन

>> बजेटचे वाचन सुरू होताच शेअर बाजार १०० अंकांनी वधारला

>> देशातील सर्व राज्यांशी समन्वय राखून योजना मार्गी लावणारः निर्मला सीतारामन

>> शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्धः निर्मला सीतारामन

>> डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून अधिक सुलभ सुविधा देण्यावर भर; पेन्शनच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेवर भर देणारः निर्मला सीतारामन

>> २७ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात यशः निर्मला सीतारामन

>> आयुषमान योजनेचा सामान्यांना लाभः निर्मला सीतारामन

>> देशात ६० लाख नवे करदातेः निर्मला सीतारामन

>> देशातील बँकांची स्थिती सुधारली आहेः सीतारामन

>> प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पात सामावून घेण्याचा प्रयत्नः सीतारामन


Thursday, January 30, 2020

शेतीला पुरक जोडधंदा म्हणुन पशुपालन करा - पशूधन अधिकारी डाॅ.पांडे एच.बी.

शेतीला पुरक जोडधंदा म्हणुन पशुपालन करा -  
पशूधन अधिकारी डाॅ.पांडे एच.बी.
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीरामध्ये आज पशूरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावकरी मंडळीचा चांगला प्रतिसाद मिळाला. गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी आदी पाळीव प्राण्यांचे रोगनिदान करण्यात आले. यामध्ये घटसर्प, खरूज, खूरकुत, कृत्रिम बीजरोपण, जंत, गर्भपेशी तपासणी, गोचिड निर्मूलन या आजारावर उपचार करण्यात आले. यात दिडशेपेक्षा अधिक प्राण्यांवर उपचार करण्यात आले.
           याप्रसंगी बोलताना डाॅ. पांडे म्हणाले, युवकांनी शेतीला पुरक जोडधंदा म्हणुन पशुपालन करावे. शेळीपालन, कुकुटपालन, दुग्धजन्य पदार्थ व्यवसाय करून आपला आर्थिक विकास करता येतो. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून इतर अनेक रोजगाराच्या संधी देता येतील. याप्रसंगी डाॅ. गायकवाड, डाॅ. चौधरी, डाॅ. पांडूळे आदी कर्मचारी उपस्थित होते. 
       या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच गोकुळदास आरबाड हे होते तर प्रमुख उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष महादेव गिरे पाटील, डाॅ. मारोती कच्छवे, डाॅ. बापुराव आंधळे, डाॅ. मुक्ता सोमवंशी,प्रा. गोविंद वाकणकर हे उपस्थित होते. 
  याप्रसंगी हुतात्मा दिनानिमिताने महात्मा गांधी यांना आदरांजली आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल उबाळे या विद्यार्थाने केले तर आभार प्रदर्शन दिपक जोगडे यांनी केले.

Tuesday, January 28, 2020

जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ आयोजित शिव जन्मोत्सव आज दुसरे पुष्प शिवगीतांचा कार्यक्रम व पत्रकार सन्मान सोहळा तयारी पुर्ण.....

जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ आयोजित शिव जन्मोत्सव आज दुसरे पुष्प  शिवगीतांचा कार्यक्रम     व पत्रकार सन्मान सोहळा तयारी पुर्ण.....!
सोनपेठ (दर्शन) :-     

               पहिले पुष्प
        🧘  योग शिबिर 🧘
दि. 10/02/2020 सोमवार ते 14/02/2020 शुक्रवार वेळ सकाळी 5.00 वा
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह 
सोनपेठ जि. परभणी

               दुसरे पुष्प
       शिव गीतांचा कार्यक्रम
                    व
       पत्रकार सन्मान सोहळा
दि. 13/02/2020 गुरूवार वेळ सायंकाळी 6.00 वा
स्थळ: अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ जिल्हा परभणी

             तिसरे पुष्प
       जरा याद करो कुर्बानी 
   शहीद जवानांच्या कुटुंबियांचा     
            कृतज्ञता सोहळा
                    व
      महाराष्ट्र पोलीस सोनपेठ 
           सन्मान सोहळा
दि. 14/02/2020 शुक्रवार वेळ सायंकाळी 6.00 वा 
स्थळ: अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ जिल्हा परभणी

              चौथे पुष्प
            कवी संमेलन
दि. 15/02/2020 शनिवार वेळ सायंकाळी 6.00 वा
स्थळ: अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ 

              पाचवे पुष्प
    रक्तदान शिबिर रक्तपिती
स्वा.रा. ती. ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई     
       नेत्र तपासणी शिबीर
    उदयगिरि लायन्स उदगीर
                   व
          आरोग्य शिबीर
दि. 16/02/2020 रविवार वेळ सकाळी 9.00 वा
स्थळ अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ जिल्हा परभणी

              सहावी पुष्प 
             वक्तृत्व स्पर्धा
दि. 16/02/2020 रविवार वेळ सायंकाळी 6.00 वा
राज्यस्तरीय खुला गट विषय
1. भारत एक महासत्ता स्वप्न डॉक्टर कलामांचे
2. नारी तू जिजाऊ बन
3. शिवरायांचे स्वराज्य धोरण
             खुला गट 
प्रथम पारितोषिक 5000
द्वितीय पारितोषिक 3000 
तृतीय पारितोषिक 2000
जिल्हास्तरीय बालगट विषय
1. दयाचा सागर माझी आई
2. माझी शाळा माझे शिक्षक
3. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा
स्थळ अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ जिल्हा परभणी
पात्रता फेरी दि. 08/02/2020   स्थळ जि प प्रशाला सोनपेठ वेळ सकाळी दहा वाजता

              सातवे पुष्प      
  राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा
दि.17/02/2020 सोमवार वेळ सायंकाळी 6.00 वा
प्रथम पारितोषिक 5000
द्वितीय पारितोषिक 3000
तृतीय पारितोषिक 2000
स्थळ अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ
पात्रता फेरी दि. 08/02/2020 स्थळ जि प प्रशाला सोनपेठ वेळ सकाळी 10 वा

               आठवे पुष्प
        राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा 
दि. 18/02/2020 मंगळवार वेळ सायंकाळी 6.00वा 
प्रथम पारितोषिक 5000
द्वितीय पारितोषिक 3000
तृतीय पारितोषिक 2000
स्थळ अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ
पात्रता फेरी दि. 09/02/2020 स्थळ जि प प्रशाला सोनपेठ

               नववे पुष्प
       शिव प्रतिमेचे पूजन
दि. 19/02/2020 बुधवार वेळ सकाळी 9.00वा 
           प्रमुख उपस्थिती 
जय भवानी महीला समिती सोनपेठ
स्थळ अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ जिल्हा परभणी

              दहावे पुष्प
     भव्य मोटारसायकल रॅली
दि. 20/02/2020 गुरुवार वेळ सकाळी 9.00 वा 
स्थळ: अहिल्याबाई होळकर चौक सोनपेठ येथून निघेल
प्रमुख उपस्थिती सर्व शिवप्रेमी मित्रपरिवार

                अकरावे पुष्प 
                   भव्यदिव्य 
         शिव प्रतिमेची शोभायात्रा
प्रमुख उपस्थिती
लखुजी राजे जाधव यांचे वंशज     
शिवाजी राजे जाधव व 
अण्णाभाऊ साठे यांचे वंशज
सचिन साठे
दि. 20/02/2020 गुरूवार वेळ दुपारी 3.00वा
स्थळ: अहिल्याबाई होळकर चौक

              आयोजक
         बळीराम भाऊ काटे 
जय भवानी शिवजन्मोत्सव समिती 
सोनपेठ जिल्हा परभणी.

सोनपेठ येथील प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांनी जिंतुर येथे ज्ञानेश्वर विद्यालयात केला कृतज्ञता सोहळा साजरा

सोनपेठ येथील प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांनी जिंतुर येथे ज्ञानेश्वर विद्यालयात केला कृतज्ञता सोहळा साजरा

जिंतुर / सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील कै.र.व.वरिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात कार्यरत असलेले प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांनी त्यांच्या ८ वी ते १० वी शिक्षण घेतलेल्या ज्ञानेश्वर विद्यालय, जिंतूर येथे वैश्विक मूल्य संवर्धन कार्यक्रम अंतर्गत गुणवंत विद्यार्थी सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व आपल्या व शिक्षकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात डॉ.जायभाये यांनी शाळेची गुणवंत विद्यर्थिनी कु.सुवर्णा भीमराव खरात हिचा रोख ३०००/ रुपये, एक ड्रेस, पुस्तक, शाल व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राचार्य एन.एम. कांदे सर यांना देऊन सन्मान केला. या प्रसंगी डॉ. जायभाये यांनी आपले गुरुजन शेप सर, बडे सर, कांदे सर, कच्छवे सर, केंद्रे सर, भंडारे सर, मोरे सर आदी शिक्षक वृंदाचा शाल, पुष्पहार व दर्शन घेऊन गौरव केला. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे, वरपूडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, मुख्याध्यापक कांदे सर, भगवान बाबा युवक संघटना जिंतूरचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मणराव बुधवंत, जेष्ठ शिक्षण अधिकारी श्री गजानन वाघमारे, पत्रकार राजाभाऊ नगरकर, शेख शकील, शहजाद पठाण, विजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये यांनी, सुत्रसंचलन वाघ सर यांनी तर आभार प्रा.मुरलीधर जायभाये यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक, उद्योजक श्री विलास जायभाये, प्रशांत घिके, विलास रोकडे, बाळू बुधवंत सर, ह भ प अनंता महाराज सांगळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी सरकारी अभियोक्ता अँड. योगेश सरवदे, स.पो.नी. सोपान सांगळे, दिलीप अंभोरे सर, विष्णू जवळे सर, ज्ञानोबा वारे सर अन्य मान्यवर व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Monday, January 27, 2020

लोकभारत न्युजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज "लोकसाहित्य" या अंकाचे मा.मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस,नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा.प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचे शुभहस्ते प्रकाशन संपन्न

लोकभारत न्युजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज "लोकसाहित्य" या अंकाचे मा.मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस,नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा.प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचे शुभहस्ते प्रकाशन संपन्न
नांदेड / परभणी / सोनपेठ  (दर्शन ) :- 

नांदेड येथे दिनांक 27/01/2020 सोमवार रोजी
नांदेड जिल्ह्यात अल्पावधित लोकप्रिय झालेले लोकभारत न्युजच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लोकसाहित्य या अंकाचे प्रकाशन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते मा देवेंद्र फडणवीस,नांदेडचे लोकप्रिय खासदार मा.प्रतापराव चिखलीकर यांचे हस्ते लोकसाहित्य अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
मा.खा.कुंटुरकर,आमदार मा.राजेश पवार,आमदार मा.डॉ.तुषार राठोड,जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे,मा.प्रविण पाटील चिखलीकर,मा.संतुकराव हंबर्डे,भाजपाचे नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी,जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ डोईफोडे तसेच नांदेड मधिल सर्व पत्रकार,प्रेस फोटो ग्राफर बांधव व शेकडोंच्या उपस्थितीत लोकसाहित्य या विशेषांकाचे थाटात प्रकाशन झाले.

Saturday, January 25, 2020

परभणी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न ; प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडल्यास लोकशाही बळकट होईल - पालकमंत्री नवाब मलिक

परभणी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न ; प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडल्यास लोकशाही बळकट होईल - पालकमंत्री नवाब मलिक
 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 
भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहेत. संविधानाशी बांधिलकी रहावी आणि नागरिकांमध्ये संविधानाप्रती जनजागृती निर्माण व्हावी हा हेतु समोर ठेवून आजपासुन ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. तरी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडल्यास लोकशाही बळकट होईल. असे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, महापौर श्रीमती अनिताताई रविंद्र सोनकांबळे, खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर-साकोरे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पालकमंत्री श्री.मलिक म्हणाले की, अनेक देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा लाभ जनसामान्यांना व्हावा यासाठी व्रतस्थ होण्याचा हा दिवस आहे. आपल्या प्राणांची आहुती देवून शुर क्रांतीकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोलाचे योगदान दिलेले विसरता येणार नाही. त्यांच्या बलिदानानेच आपण आज स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. देशाने संविधानाचा स्विकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात या दिवशी केली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत आणि स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. तरी जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन एकसमानतेने सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर रहावे. प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबुत होत आहे. या वर्षामध्ये व त्यापुढे होणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करावे. असे आवाहन श्री.मलिक यांनी यावेळी केले. 
 यावेळी पोलिस दल, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी शाळा, बॉम्ब नाशक पथक,  अग्निशामक दल, रुग्णवाहिका, यांनी परेड संचालनातून मानवंदना दिली तसेच आरोग्य, कृषी, स्वच्छ भारत मिशन, महानगरपालिका, शिक्षण, ‘स्पर्श’ कुष्ठरोग निर्मूलन, महिला व बालविकास विभाग आदिंनी देखाव्यावर चित्ररथ सादर केले.  यावेळी जिल्ह्यातील पोलिस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केलेले  पोलिस निरीक्षक व्ही.एस.आलेवार,  पोलिस नाईक शंकर हाके व गजानन राठोड यांचा तसेच खेळाडू, पोलीस, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 
 यावेळी पालकमंत्री श्री.मलिक यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीदांच्या वीर माता व वीर पत्नी आणि ज्येष्ठ नागरिक, मान्यवरांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, डॉ.संजय कुंडेटकर, शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वाहुळ, यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासकीय इमारतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न
 
 प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व कार्यालय  प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक
नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहिर केले आहेत. देशातील 1040 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची  घोषणा केली आहे. राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये उल्लेखीनय कामगीरीसाठी पोलिसांना दिले जाणारे शौर्य पदक, विशिष्ठ सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये देशातील 1040 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

देशातील 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, 286 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक तर 93 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाले आहे. 

महाराष्ट्रातील 54 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक

  महाराष्ट्रातील 10 पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 4 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहिर झाले आहे. 

शौर्य पदक – 1.श्री.मिठू नामदेव जगदाळे, 2.श्री.सुरपत बावाजी वड्डे, 3.श्री.आशिष मारूती हलामी, 4.श्री.विनोद राऊत, 5.श्री.नंदकुमार अग्रे, 6.डॉ.एमसीव्ही महेश्वर रेड्डी, 7.श्री.समीरसिंह साळवे, 8.श्री.अविनाश कांबळे, 9. श्री.वसंत अत्राम, 10. श्री.हमीत डोंगरे.
विशिष्ठ सेवा पदक – 1. श्रीमती अर्चना त्यागी (आयपीएस), 2. श्री.संजय सक्सेना (आयपीएस), 3.श्री.शशांक सांडभोर (सहा.पोलिस आयुक्त), 4. श्री.वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक).

गुणवत्ता सेवा पदक – 1. श्री.धनंजय कुलकर्णी (पोलिस अधिक्षक), 2. श्री.नंदकुमार ठाकुर (पोलिस उपायुक्त, मुंबई), 3. श्री.अतुल पाटील (अतिरिक्त आुयक्त मुंबई), 4. श्री.नंदकिशोर मोरे (सहाय्यक आयुक्त, मुंबई), 5. श्री.स्टीव्हन मॅथ्यू ॲनथनी (सहा.आयुक्त मुंबई), 6.श्री.निशिकांत भुजबळ (सहा.आयुक्त, औरंगाबाद), 7. श्री.चंद्रशेखर सावंत (उपाधिक्षक, अकोला), 8. श्री.मिलिंद तोतरे (निरिक्षक, नागपूर), 9.श्री.सदानंद मानकर (निरिक्षक, अकोला), 10. श्री मुकुंद पवार (वरिष्ठ निरिक्षक, मुंबई) 11. श्री.संभाजी सावंत (निरिक्षक, सांगली), 12. कायोमर्ज बोमन इरानी (सहा.आयुक्त, मुंबई), 13. श्री.गजानन काबदुले (वरिष्ठर निरिक्षक, मुंबई शहर), 14. श्रीमती निलिमा अरज (निरिक्षक, अमरावती), 15. श्री.इंद्रजीत कारले (सहा.आयुक्त ठाणे) 16. श्री.गौतम पराते (निरिक्षक औरंगाबाद), 17. श्री.सुभाष भुजंग (निरिक्षक जालना), 18.श्री सुधीर दळवी (निरिक्षक, मालाड, मुंबई), 19. श्री किसन गायकवाड (निरिक्षक, तुर्भे,नवी मुंबई),    20.श्री जमिल सय्यद (उपनिरिक्षक, नांदेड), 21. श्री मधुकर चौगुले (उपनिरिक्षक, गगनबावडा, कोल्हापूर), 22.श्री भिकन सोनार (उपनिरिक्षक, जळगांव), 23. श्री. राजू अवताडे (सहा.पोलिस उपनिरिक्षक, अकोला), 24. श्री.शशिकांत लोखंडे (सहा.पोलिस निरिक्षक, मुंबई), 25. श्री अशफाखअली चिस्तीया (मुख्य हवालदार, गडचिरोली), 26. श्री. वसंत तराटे (सहा.पोलिस उपनिरिक्षक, मुंबई शहर), 27. श्री.रविंद्र नुल्ले (सहा.पोलिस उपनिरिक्षक, कोल्हापूर), 28. श्री. मेहबूबअली सय्यद (सहा.पोलिस उपनिरिक्षक, नाशिक शहर), 29. श्री.साहेबराव राठोड (सहा.पोलिस उपनिरिक्षक), 30. श्री दशरथ चिंचकर (सहा.पोलिस उपनिरिक्षक, मावळ, पुणे) 31. श्री.लक्ष्मण टेंभुर्णे (सहा.पोलिस उपनिरिक्षक, गडचिरोली), 32. श्री.बट्टुलाल पांडे (सहा.उपनिरिक्षक, नागपूर शहर), 33. श्री.विष्णू गोसावी (सहा.उपनिरिक्षक, नाशिक), 34. श्री प्रदीप जांभळे (सहा.उपनिरिक्षक, पुणे), 35. श्री. चंद्रकांत पाटील (सहा.उपनिरिक्षक, जळगांव), 36. श्री.भानूदास जाधव (मुख्य हवालदार, मुंबई शहर), 37. श्री. नितिन मालप (इटिलीजन्स अधिकारी, मुंबई), 38. श्री.रमेश शिंगाटे (मुख हवालदार, मुंबई), 39. श्री.बाबुराव बिऱ्हाडे (इटिलीजन्स अधिकारी, नाशिक), 40. श्री.संजय वायचळे (मुख्य हवालदार, नाशिक)

महाराष्ट्राला 5 जीवन रक्षा पदक

संकटात सापडलेल्यांना वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जीवन रक्षा पदक दिले जाते. महाराष्ट्रातील 5 व्यक्तींना जीवन रक्षा पदक जाहिर झाले आहे. यामध्ये महेश पांडुरंग साबळे यांना सर्वोत्तम रक्षा पदक जाहिर झाले आहे. मुंबईतील कमला मिल आग दुर्घटनेत साबळे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले होते.
जीवन रक्षा पदक जाहिर झालेल्यामध्ये 1. श्री एन.कार्तिकेयन, 2. कुमारीप्रमोद बाळासाहेब देवडे, 3. मास्टर शिवराज रामचंद्र भांडारवड, 4. श्री दत्तात्रय सुरेश टेंगळे यांचा समावेश आहे.

अग्निशमन सेवा पदक

अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगीरीसाठी महाराष्ट्रातील 7 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहिर झाले आहे. यामध्ये श्री. प्रभात सुरजलाल रहांगदळे (मुख्य अग्निशमन अधिकारी), 2. श्री.राजेंद्र चौधरी (उपमुख्य अधिकारी), 3. श्री.रविंद्र अंबुलगेकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), 4. श्री.मिलिंद दोंडे (सहाय्यक अग्निशमन अधिकारी), 5. श्री.अभिजीत सावंत (स्टेशन अधिकारी), 6. श्री.सुधीर वर्तक (वाहनचालक), 7. श्री. दिलीप पालव (उपमुख्य अग्निशमन अधिकारी) यांचा समावेश आहे. 


परभणी जिल्ह्याच्या 219 कोटीच्या जिल्हा वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री नवाब मलिकलोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करणार

परभणी जिल्ह्याच्या 219 कोटीच्या जिल्हा वार्षिक प्रारुप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री नवाब मलिक
लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करणार
परभणी / सोनपेठ (दर्शन):- 
परभणी जिल्ह्याच्या सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 219.2 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास अल्पसंख्याक व औकाफ, कौशल्य विकास मंत्री तथा परभणी जिल्हाचे पालकमंत्री  नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वाढविण्यासाठी वित्त मंत्री यांच्याकडे वाढीव निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री मलिक यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हा वार्षीक नियोजन समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री.मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., यांनी प्रास्ताविक करुन बैठकीबाबत माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2020-21 यावर्षासाठी सर्वसाधारण योजनेसाठी 156 कोटी 82 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 60 कोटी 22 लाख, आदिवासी उपक्षेत्राबाहेरील उपयोजना ओटीपीएस 2 कोटी 16 लाख रुपयाच्या प्रारुप आराखड्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2019-20 या वर्षात वाटप झालेल्या एकुण निधीपैकी डिसेंबर 2019 अखेरपर्यंत सर्वसाधारण योजनेत 63.2 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर अनुसूचित जाती उपयोजनेत 24.8 कोटी रुपयांच्या कामांना तसेच आदिवासी उपक्षेत्राबाहेरील योजना ओटीपीएस अंतर्गत 51.63 लक्ष रुपयांच्या कामांनाप्रशासकीय मान्यता दिली असल्याचे जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराज यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री मलिक म्हणाले की, सन 2020-21 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 219.2 कोटी रुपयाची वित्तीय मर्यादा शासनाकडून कळविली आहे. हा निधी वाढवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कामांचे प्रस्ताव सादर करावेत. वित्तमंत्री यांच्याशी चर्चा करुन हा निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. श्री.मलिक म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असून या विभागांना प्राधान्याने निधी दिला जाईल. जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी आरोगयमंत्री यांच्यासोबत मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. जिल्‌ह्यात पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पुरविण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत असल्याबाबतच्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना याबाबतची चौकशी करुन त्या मशीन वापरात आणण्याबाबत कार्यवाही करावी असे निर्देश श्री.मलिक यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी दिले.

            सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्ह्यातील विविध विभागाच्या प्रलंबित योजनांचा पाठपुरावा करणार असल्याचेही श्री मलिक यांनी सांगितले. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात असलेल्या नऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था जागतिक दर्जाच्या करण्यावर भर देण्यात येणार असून येथील प्रवेश क्षमता वाढवून नवीन अभ्यासक्रम व त्या आधारे रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील जिल्हा परिषदअंतर्गत रस्ते, वाळुचा लिलाव आदि बाबतचे प्रश्नही लवकर मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा समावेश करणार असल्याचेही श्री मलिक यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर, खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, महापालिका आयुक्त रमेश पवार, पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Friday, January 24, 2020

मुख्याध्यापक पी एल जोशी श्री महालिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ पाच हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात पकडला

मुख्याध्यापक पी एल जोशी श्री महालिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ पाच हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात पकडला

 सोनपेठ (दर्शन) :-

कर्मचारी तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय परभणी येथे दिनांक 24 जानेवारी 2020 शुक्रवार रोजी तक्रार दिली नमूद आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांची सातव्या वेतन आयोग नुसार फरकाचे बिल काढण्यासाठी पंढरीनाथ लक्ष्मणराव जोशी मुख्याध्यापक श्री महालिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ यांनी मला सहा हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी वगैरे मजकुराची तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी कडून पंचासमक्ष करण्यात आलेल्या कार्यवाहीत नमूद आलोसे यांनी दिनांक दिनांक 24 जानेवारी 2020 शुक्रवार रोजी तक्रारदार यांचे सातव्या वेतन आयोगानुसार फरकाचे बिल काढण्यासाठी 6000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 5000 रुपये लाचेची मागणी करून पैसे आजच घेऊन येण्यास सांगितले त्यावरून सापळा कारवाई आजमाविण्यात आली असता पंढरीनाथ लक्ष्मणराव जोशी तक्रारदार यांचे कडून 5000 लाचेची रक्कम स्वीकारली आहे. त्यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन सोनपेठ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरचा सापळा कारवाही माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेड व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले, पोलीस हवालदार हनुमंते, पोलीस नायक कटारे, पोलीस शिपाई धबडगे, पोलीस शिपाई शेख, चालक पोलीस हवालदार चौधरी ए.सी.बी.परभणी यांनी यशस्वी केलेली आहे.तरी परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी लाचखोर भ्रष्टाचारी लोकसेवका विरुद्ध तक्रार देण्यासाठी अथवा भ्रष्टाचारा विरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाई बाबत अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांच्याकडून केली आहे दूरध्वनी क्रमांक -02452-22 0597 व टोल फ्रि क्रंमाक -1064 वरती संपर्क साधावा असे अवाहन केले आहे.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातूनच भविष्यात चित्रपट अभिनेता निर्माण होऊ शकतो - चित्राताई गोळेगावकर

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातूनच भविष्यात चित्रपट अभिनेता निर्माण होऊ शकतो - चित्राताई गोळेगावकर 
सोनपेठ (दर्शन) :-

शालेय विद्यार्थी हा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातूनच भविष्यात चित्रपट अभिनेता निर्माण होऊ शकतो असे प्रतिपादन श्री बळीराजा शिक्षण संस्थेच्या सहसचिव श्रीमती चित्राताई काशिनाथराव गोळेगावकर यांनी तालुक्यातील मौजे लासिना येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात दि. 24 जानेवारी वार शुक्रवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती चित्राताई काशिनाथराव गोळेगावकर ह्या होत्या. तर उद्घाटक म्हणून राकाँचे  युवा नेते तथा नगरसेवक अॕड.श्रीकांत विटेकर हे होते .तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ सुमित्राताई श्यामसुंदर परांडे ,पत्रकार गणेश पाटील, पंडितराव कदम ,ओम परांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या शाळेत गतवर्षी एस.एस.सी .परीक्षेत प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना गोळेगावकर म्हणाल्या की, श्री बळीराजा शिक्षण संस्थेच्या विविध शाळा ह्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे या उद्दात हेतूने शैक्षणिक चळवळ निर्माण केली आहे. ग्रामीण भागांमध्ये अतिशय हुशार गुणवंत विद्यार्थी आहेत. या शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुण यातून  भविष्यातील चित्रपट अभिनेता निर्माण होऊ शकतो .त्यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष  राहिले पाहिजे असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मराठी ,हिंदी ,लावणी, लोकगीते,व गवळणी आदी विविध गाण्यावर नृत्य केलं. याला रसिकांनी चांगलीच दाद दिली होती .कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक अंकुश परांडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान पैठणे यांनी तर आभार प्रकाश सोळंकी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद मोरे, दत्ता परतवाड,  गणेश भंडे , बळीराम कदम ,रामचंद्र काकडे ,देवानंद निरस, अनिल कुंडगीर, मुंजाजी डूकरे ,सुभाष मकने  आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली आहे.

भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे : डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज

भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेला अनन्यसाधारण 
महत्व आहे : डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज 

लातूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु परंपरेला अनन्य साधारण असे महत्व आहे.मानवाच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम गुरूच्या माध्यमातून केले जाते,असे प्रतिपादन वसुंधरारत्न शतायुषी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज  यांनी केले.लातूर येथे डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्संग सोहळ्यात ते उपस्थित भाविकांना आशिर्वचन देत होते.या सत्संग सोहळ्याच्या संयोजक सौ.लताताई मुद्दे या होत्या.तर यजमान श्रीमती रेखाताई कार्तिक स्वामी,सौ.निरुपमा कैलास स्वामी,सौ.अश्विनी संतोष स्वामी सौ.अनुराधा शिवयोगी स्वामी परिवार हे होते.आपल्या मार्गदर्शनात डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, अनेक जन्मानंतर मानव जीवनाची प्राप्ती होत असते. मानव जीवनाचा लाभ होणे हीच एक फार मोठी उपलब्धी आहे.मनुष्य जीवनात संस्कार, कृती,कर्माला फार महत्व असते.अंतःकरणातील आत्मा म्हणजे जाणीव असते.ही जाणीवच मानवी जीवनात बदल घडवून आणण्याचे काम करते.मनुष्य आणि इतर प्राण्यात अनेक बदल आहेत.अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव हा समाजाभिमुख,नाते संबंधांची  जाणीव ठेवून चालत असतो. मानवात विचार, विवेक, जाणीव आढळून येते.या जाणिवेच्या माध्यमातून दैनंदिन कुलसंस्कार होत असतात.म्हणून तर जीवनात संस्काराचे मोल अधिक असते.समाजात वावरतांना काय करावे, काय करू नये याची जाण असणे आवश्यक असते.प्रत्येकाने आपण स्वतःशी तसेच इतरांशी कसे वागतो, वर्तन ठेवतो, याचे आकलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्यावरून आपण जे कांही करतो आहोत ते योग्य आहे की अयोग्य, हे लक्षात येऊ शकते.परिस्थिती कशी का असेना, व्यक्तीने आपला चांगुलपणा कदापि सोडता कामा नये. व्यक्तीवर आई - वडिलांकडून चांगले संस्कार होत असतात.त्यामुळे ईश्वराच्या पूजा,आराधनेपेक्षा अगोदर माता - पित्याची त्यानंतर गुरुची पूजा करा,असा सल्लाही डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी दिला.दैनंदिन जीवनात आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीत चुका होणार नाही,याची दक्षता घेऊन मार्गोक्रमण करा,असे आवाहनही डॉ.शिवलिंग शिवाचार्यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शिवलिंग शिवाचार्य सत्संग मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

सोनपेठ तालुक्यातील पंचक्रोशितील एकमेव साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी
मो.9823547752.

Thursday, January 23, 2020

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाच्या नावांची घोषणा ; भोर, पेण, चंदगड, अंबड, येवला, कुही, शेगाव, कंधार तालुके ठरले पुरस्कारांचे मानकरी{रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार सांगली जिल्हा पत्रकार संघाला जाहीर}

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाच्या नावांची घोषणा ;भोर, पेण, चंदगड, अंबड, येवला, कुही, शेगाव, कंधार तालुके ठरले पुरस्कारांचे मानकरी {रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार सांगली जिल्हा पत्रकार संघाला जाहीर}
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या आणि राज्यातील 354 तालुक्यात शाखा विस्तार असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते.राज्यातील तालुका पत्रकार संघाच्या मेळाव्यात दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा होत असतो.यंदाचा हा पुरस्कार वितरण सोहळा आणि मेळावा सोलापूर जिल्हयात अक्कलकोट येथे 8 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न होत आहे.त्यानुषंगाने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी  2019 च्या आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या नावाची घोषणा आज केली आहे.

रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ पुरस्कार यंदा सांगली जिल्हा पत्रकार संघाला घोषित कऱण्यात आला आहे.सांगली जिल्हा संघानं पत्रकारांचे मजबुत संघटन उभारण्याबरोबरच पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजनेच्या लढयात मोठाच सहभाग नोंदविला आहे..शिवाय  सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेच्या प्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत परिषदेने त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ

वसंतराव काणे यांच्या नावाने राज्याच्या प्रत्येक विभागातून एक या प्रमाणे आठ तालुक्यांची निवड केली जाते आणि त्यांना सन्मानित करण्यात येते.पत्रकार संघटन,परिषदेच्या उपक्रमातील सहभाग,सामाजिक कार्य आदि गोष्टींचा निवड करताना विचार केला जातो.

पुणे विभाग  :           भोर तालुका पत्रकार संघ ( जिल्हा पुणे )

कोकण विभाग :      पेण तालुका पत्रकार संघ ( जिल्हा रायगड )

कोल्हापूर विभाग :   चंदगड तालुका पत्रकार संघ ( कोल्हापूर जिल्हा )

औरंगाबाद विभाग : अंबड तालुका पत्रकार संघ ( जिल्हा जालना )

लातूर विभाग  : कंधार तालुका पत्रकार संघ ( जिल्हा नांदेड ) 

नाशिक  विभाग :     येवला तालुका पत्रकार संघ ( जिल्हा नाशिक )

नागपूर विभाग :    कुही तालुका पत्रकार संघ ( जिल्हा नागपूर )

अमरावती विभाग : शेगाव तालुका पत्रकार संघ ( जिल्हा बुलढाणा ) 

वरील जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना 8 फेब्रुवारी 2020 रोजी अक्कलकोट येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.शाल,श्रीफळ,मानपत्र आणि परिषदेचे स्मृतीचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.पुरस्कार प्राप्त सर्व जिल्हा आणि तालुका संघाचे एस.एम.देशमुख,परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे,सरचिटणीस संजीव जोशी,कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे.मागील सर्व तालुका पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याप्रमाणेच अक्कलकोट मेळावा देखील यशस्वी करायचा असल्याने राज्यातील सर्व तालुका संघांचे पदाधिकारी तसेच पत्रकारांनी मोठया संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी  केले आहे.

ग्राहक संरक्षण संघटनेच्या मराठवाडा संघटक सचिवपदी परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती

ग्राहक संरक्षण संघटनेच्या मराठवाडा संघटक सचिवपदी परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती
परळी / सोनपेठ (दर्शन) :- 

परळी येथील परळी समाचारचे संपादक तसेच विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी आत्मलिंग शेटे यांची राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटना (नॅशनलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनाएझेशन) च्या मराठवाडा संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मा.संजय पाठक यांनी पाठवले असून ही नियुक्ती 2 वर्षासाठी असल्याचे यात नमुद केलेले आहे. ग्राहकांचे हक्क मिळवून देणारी व ग्राहकांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध लढणारी ही संघटना असून या मार्फत ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवणे, ग्राहकांना मिळणार्‍या वजन मापातील तफावत, एमआरपी प्रमाणे मालाचे पैसे न घेता जास्तीचे पैसे घेणे, खाद्य पदार्थ, पेयजल, खाद्य मसाले इत्यादीतील भेसळ याबाबत आवाज उठवणारी ही संघटना असल्याचे पत्रात नमुद केलेले आहे व याबाबत जेष्ठ पत्रकार व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असलेले आत्मलिंग शेटे चांगले कार्य करतील व सर्वसामान्य ग्राहकांना न्याय मिळवून देतील असा विश्वास संजयजी पाठक यांनी पत्रात व्यक्त केला.
तसेच या संघटनेचे महाराष्ट्र निरीक्षक संजीव जोशी, महाराष्ट्र संघटन सचिव डॉ.सुनीलकुमार थिगळे, महाराष्ट्र सचिव सौ.नलीनी गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी आदी पदाधिकार्‍यांनी आत्मलिंग शेटे यांचे अभिनंदन केले आहे.
आत्मलिंग शेटे यांनी ही निवड झाल्याबद्दल सांगितले की, आपण ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित काम करून ग्राहक संरक्षण, शोषणमुक्तीची चळवळ अभियानाचा प्रसार करून ग्राहकांचे प्रश्न सोडवणे व जागो ग्राहक जागो अभियान अंतर्गत “तक्रार तुमची कार्यवाही आमची” हा संघटनेचा मुलमंत्र जोपासण्याचे काम करून संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांचे प्रश्न  सोडवनार असल्याचे आत्मलिंग शेटे य़ांनी सांगीतले त्यांच्या निवडी बध्दल सर्वत्र अभिंदन होत आहे.

युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणावा - मा.शिवाजीराव मव्हाळे

युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणावा - मा.शिवाजीराव मव्हाळे
 सोनपेठ (दर्शन) : - 

नेताजी सुभाष चंद्र बोस हे भारताच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. युवकांनी नेताजींच्या विचारांचा वारसा आचरणात आणल्यास भारत जागतिक महासत्ता होईल. त्याचबरोबर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाच्या इतिहासातील सुवर्णपान असून त्यांनी मराठी माणसासाठी केलेला संघर्ष कधीही विसरला जाणार नाही. असे मत शिवाजीराव मव्हाळे यांनी व्यक्त केली.
       सोनपेठ शहरातील राजीव गांधी महाविद्यालय सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अनिल कवटिकवार व किरण स्वामी यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्राचार्य बालाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाला झालेल्या या कार्यक्रमात प्रा.नर्गिस शेख, लायब्रियान रेखा कांबळे, विकास मोरताटे, दिक्षा शिरसाठ, स्वेता चौहान, बाळु भरती, सावित्रीबाई शिंदे, कैलास भालेराव आदीसह
महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस.सी.चा विद्यार्थी कैलाश भालेराव याने केले तर आभार राजकुमार मस्के या विद्यार्थ्याने मानले.

Wednesday, January 22, 2020

प्राचार्य सुरेश नाईकवाडे 23 जानेवारी 2020 रोजी आकाशवाणीवर

प्राचार्य सुरेश नाईकवाडे 23 जानेवारी 2020 रोजी आकाशवाणीवर
परभणी / सोनपेठ (दर्शन):-
परभणी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांचे 23 जानेवारी 2020 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त "नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान या विषयावर वार्तालाप प्रसारीत होणार आहे.
दि.23 जानेवारी 2020 हा दिवस संपूर्ण देशात महान देशभक्त देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात येते.  या निमित्तानेच परभणी आकाशवाणी केंद्रावर सकाळी 08.45 वाजता "नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान या विषयावर प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या वार्तालाप प्रसारीत होणार आहे. 
प्राचार्य सुरेश नाईकवाडे हे गेल्या 25 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. परभणी जिल्हयातील सर्व नागरीकांनी वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी परभणी यांनी केले आहे.

परळी तालुक्यातील कौडगाव (घोडा) येथे उद्या दि 23 गुरुवार रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती

परळी तालुक्यातील कौडगाव (घोडा) येथे उद्या दि 23 गुरुवार रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची समाप्ती
 
परळी / सोनपेठ (दर्शन) :-  
परळी तालुक्यातील कौडगाव (घोडा) येथे प्रतिवर्षी प्रमाणे पुष्प आठवे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ दिनांक 16 जानेवारी 2020 गुरुवार रोजी करण्यात आला कथा प्रवक्ते हरिभक्त पंडित परमश्रद्धेय बालव्यास श्री मंगेशकृष्ण शास्त्रीजी श्रीधाम वृंदावन (मथुरा) हे असून साथ-संगत विशाल महाराज खरात, विकास महाराज मुटके, कृष्णा महाराज चव्हाण यांची आहे तर कीर्तन नेतृत्व धोंडीरामजी सोलंकर, गाथा भजन नेतृत्व विकास महाराज मुटके व कृष्णा महाराज चव्हाण, काकडाभजन नेतृत्व सुनील कोळेकर, राजेभाऊ कोचे, विश्वनाथ कोपनर, वैजनाथ कोपनर, हरिपाठ नेतृत्व समस्त गावकरी मंडळी, विना नेतृत्व मारोती कोळेकर आदींचे असून दिनांक 16 रोजी कीर्तनकार गोविंद महाराज मुंडे यांची कीर्तन संपन्न झाले, दिनांक 17 रोजी यशवंत महाराज कातळे यांचे, दिनांक 18 रोजी हरिदास महाराज पौळ यांचे, दिनांक 19 रोजी प्रशांतजी महाराज चव्हाण यांचे, दिनांक 20 रोजी विनायक महाराज काचगुंडे यांचे तर दिनांक 21 रोजी छगन महाराज खडके यांचे तसेच आज दिनांक 22 रोजी शिवानंदजी महाराज शास्त्री यांचे कीर्तन रात्री 9 ते 11 होईल तर दिनांक 23 रोजी गुरुवार काल्याचे किर्तन विजयानंद महाराज सुपेकर यांचे ठीक 11 ते 1 नंतर राधेश्याम नगर वस्ती च्या वतीने महाप्रसाद होईल तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन राधेश्याम नगर वस्ती, तरुण मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी कौडगाव (घोडा) तालुका परळी वैजनाथ यांनी केली आहे.

श्री साईबाबा जन्मभूमी चा मुद्दा पाथरी वासियांना विचारात घेऊन सोडवावा - नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर

श्री साईबाबा जन्मभूमी चा मुद्दा पाथरी वासियांना विचारात घेऊन सोडवावा - नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर

सोनपेठ (दर्शन):-
सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती श्री.ष.ब्र.108 गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांनी नुकतेच माननीय ना.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना एका निवेदनाद्वारे श्री साईबाबा जन्मस्थानाचा मुद्दा हा परभणी जिल्ह्यातील पाथरी संस्थानचा विचार घेऊन सोडवावा कारण जन्मभूमी ही जन्मभूमी असते तर कर्म भूमि ही कर्मभूमी असते म्हणून इतर कोणी श्री साईबाबा यांचे जन्मस्थळ वेगळे आहे म्हणत असतील तर त्यांच्या व श्री साईबाबा जन्मभूमी मंदिर संस्थान यांच्या पुराव्यांची पडताळणी करून निर्णय घ्यावा अशी विनंती केलेली आहे.या निवेदनाच्या प्रती परभणी जिल्हाधिकारी तसेच सोनपेठ तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत तसेच परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या विकासाच्या बाबतीत कोणीही राजकारण करू नये असेही मत श्री.ष.ब्र.108 गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले आहे.

Tuesday, January 21, 2020

नूतन पालकमंत्री ना.नवाब मलिक यांच्या उपस्थितीत परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे मेळावा

नूतन पालकमंत्री ना.नवाब मलिक यांच्या उपस्थितीत परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे मेळावा       
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री ना.नवाब मलिक दि 25 जानेवारी २०२० शनिरोजी परभणी जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यादिवशी सकाळी 11 वाजता मंत्री महोदय यांचा  सत्कार व पदाधिकारी , कार्यकर्ते यांचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आला आहे, या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा किरण सोनटक्के यांनी केले आहे.पालकमंत्री ना.नवाब मलिक यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यास माजी मंत्री फोजिया खान, जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुराणी, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के,जी.प.अध्यक्षा निर्मलाताई विटेकर,माजी खासदार सुरेशराव जाधव, माजी आमदार विजय भांबळे, मधुसूदन केंद्र, माजी जी.प.अध्यक्ष राजेश विटेकर, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, त्यांच्या सोबतच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सभापती, पदाधिकारी,जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व जी प सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती उपसभापती,सदस्य,कृषि उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य, सरपंच,सोसायटीचे चेअरमन व इतर लोकप्रतिनिधी सह सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, शाखा अध्यक्ष, व सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत,राष्ट्रवादी काँग्रेस ची पक्ष बांधणी व आगामी निवडणुकी बाबत पक्षाचे धोरण याबाबत पालकमंत्री पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत, दि 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन , वसमत रोड येथे होणाऱ्या या सत्कार समारंभ व कार्यकर्ते मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी केले आहे

घराच्या उन्नतीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा-निर्मलाताई विटेकर ; सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपन्न

घराच्या उन्नतीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा-निर्मलाताई विटेकर ; सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे दिनांक २१ जानेवारी २०२० मंगळवार रोजी हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी श्रीमती निर्मलाताई विटेकर यांची परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच एएलएफ च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.संगीता खेडकर यांचा महिला मंडळाच्या वतीने शॉल, श्रीफळ, प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात सौ.रेखाबाई दहिवाळ व सौ.ताराबाई आंबेकर यांना समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना निर्मलाताई विटेकर यांनी प्रत्येक घराच्या विकास व उन्नतीसाठी पुरूषा सोबतच कुटुंबातील महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरतो असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमास सरस्वतीबाई खेडकर, राधाबाई दहिवाळ, गवळणबाई टाक, आशा कुलथे, साधना आंबेकर, सविता दहिवाळ, लक्ष्मीबाई दहिवाळ, मंगल टाक, करूणा दहिवाळ, छाया टाक, वैशाली लोलगे, कल्पणा खेडकर, रेखा दहिवाळ, सरोज सावळे, आदींसह सुवर्णकार महिला मंडळाच्या सर्व सदस्या, शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वर्षा दहिवाळ यांनी केले तर सीमा वेदपाठक यांनी आभार प्रदर्शन केले.

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई ;ध्वजसंहितेचे पालन व्हावे

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई ;
ध्वजसंहितेचे पालन व्हावे
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे. 
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
-*-*-*-*-

Monday, January 20, 2020

नुतण जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांचा श्री.ष.ब्र.१०८ गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न

नुतण जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांचा श्री.ष.ब्र.१०८ गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न 
सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ येथिल श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे नुतण जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांचा श्री.ष.ब्र.१०८ गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते भव्य सत्कार दि.१९ जानेवारी रोजी मकरसंक्रात निमित्त आयोजित "हळदी कुंकवाचा भव्य कारेक्रमाचे निर्मलाताई विटेकर यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करुन सुरुवात केली याप्रसंगी शहरातील सर्व समाजातील महिलांनी लाभ घेतला.यावेळी श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ सदस्यांनी परीश्रम घेतले.

पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून निधी देणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पाथरीला साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून निधी देणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्ह्यातील पाथरीला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाग म्हणून शासन निधी देईल. साईबाबांचे  जन्मस्थळ आहे म्हणून हा निधी दिला जाणार नाही. त्या वादात शासनाला पडायचे नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे शिर्डीकरांचे समाधान झाले आहे. 
साईबाबांची जन्मभूमी असल्याचा दावा केला जात असलेल्या पाथरीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा ठाकरे यांनी केली होती. त्यावरुन वाद उद्भवला आहे. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळच नाही, असा आक्षेप शिर्डीतील ग्रामस्थांनी घेतला आहे. यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांची बैठक घेतली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते. 
पाथरीला तीर्थक्षेत्र विकास योजनेतून निधी देण्यास शिर्डीकरांची हरकत आहे का? असा मुद्दा बैठकीत ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यावर शिर्डीतील ग्रामस्थांनी तीर्थक्षेत्र योजनेतून गावाला निधी द्या. पण साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून निधी देण्यास आमची हरकत असल्याचे नमूद केले. त्यावर शासन हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचा उल्लेख करणार नाही. त्या वादात आम्हाला पडायचे नाही. मात्र तीर्थक्षेत्र म्हणून या गावाला निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यावर समाधान झाल्याने शिर्डीतील बंद ग्रामस्थांनी कायमस्वरुपी मागे घेतला आहे. 
मी जनतेची गार्हाणी ऐकायला बसलो आहे. शिर्डीकरांनी माझ्याशी चर्चा करण्यापूर्वी बंद करायला नको होता अशा भावनाही ठाकरे यांनी व्यक्त केल्या. 
साईबाबांना जात, धर्म नाही असे आम्ही लहानपणापासून ऐकले आहे, बैठकीला शिर्डीतून संस्थान अध्यक्ष सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी सह नागरीकांची उपस्थिती होती.

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभागाच्या विभागप्रमुख प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता

सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभागाच्या विभागप्रमुख प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता 
सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभागाच्या विभागप्रमुख प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी यांना लोकप्रशासन विषयाच्या संशोधन मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता दिली असून तशा आशयाच्या पत्रान्वये विद्यापीठाच्या कुलसचिवांनी कळवले आहे. 
शहरातील कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ येथिल  प्रा.डॉ. मुक्ता सोमवंशी यांनी मागील २१ वर्षापासून लोकप्रशासन विषयाच्या अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी डॉ.अजय पाटील (प्राचार्य, श्रीमती सुशीला देवी महाविद्यालय लातूर) यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून पी.एच् डी. ही पदवी प्राप्त केली पंचायतराज संस्थेतील महिला प्रतिनिधी व निर्णय प्रक्रिया कार्यालय प्रशासन ही पुस्तके प्रकाशित आहेत तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमधून त्यांनी शोधनिबंध वाचन केले आहे. महिला हिंसाचार या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन केले आहे. त्यांनी 30 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांची लेखन केले आहे. त्यांचा हा सर्व अनुभव विचारात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना नुकतेच लोकप्रशासन विषयासाठी संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माननीय परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष कालीदास मस्के, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष मुरलीधर पायघन, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्षा शिवमती अर्चनाताई वाकणकर, जिजाऊ ब्रिगेड मा.जि.अध्यक्षा शिवमती पुष्पाताई इंगोले, नामदेव तुकोबाराय परीषद तालुका अध्यक्ष बालासाहेब इंगोले, सर्व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी, जय भवानी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बळीराम काटे व पदाधिकारी सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी व पत्रकार   तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Sunday, January 19, 2020

साप्ताहिक सोनपेठ दर्शन दि.२० जानेवारी २०२०


साप्ताहिक सोनपेठ दर्शन दि.२० जानेवारी २०२०
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

साप्ताहिक सोनपेठ दर्शन दि.२० जानेवारी २०२०
अंक ९ वा.वर्ष.६ वे.पृष्ठे ४.

सोनपेठ ते शिर्डी पायी दिंडीचे २५ जानेवारी रोजी होनार प्रस्थान श्री साई द्वारकामाई परिवार यांचे आवाहन

सोनपेठ ते शिर्डी पायी दिंडीचे २५ जानेवारी रोजी होनार प्रस्थान श्री साई द्वारकामाई परिवार यांचे आवाहन
सोनपेठ (दर्शन) :-
प्रती वर्षा पमाणे याही वर्षी सोनपेठ ते शिर्डी पायी दिंडी चे श्री साई द्वारकामाई परिवार यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.पालखी सोहळ्याचे तीसरे वर्ष आहे. पालखी दि.२५ जानेवारी रोजी सोनपेठ येथुन प्रस्थान करणार असुन सांगता ५ फेब्रुवारी शिर्डी येथे होणार आहे.दिंडीचे १० मुक्काम असुन पहिला मुक्काम तुकाराम महाराज मंदिर टाकळगव्हाण (ता. पाथरी), दि. २६ छोटेवाडी (ता.पाथरी),दि.२७ माऊली मंदिर माऊली फाटा (ता. माजलगाव),दि. २८ सिरसदेवी (ता. गेवराई), दि.२९ बागपिंपळगाव (गेवराई) दि. ३० भिमसेन महाराज संस्थान सुकळी, दि.३१ येवले वस्ती (ता.शेवगांव), दि.०१ फेब्रुवारी कुकाणा ( ता. नेवासा), दि. ०२ श्री साईनाथ नगर (ता. नेवासा ), दि. ०३ गोंदवणी श्रीरामपुर (ता. श्रीरामपुर), ४ स्वामी नित्यानंदजी गोविंद गिरीजी सिद्ध आश्रम पिंपळदरी, दि. ५ फेेब्रुवारी रोजी पालखी शिर्डी येथे पोहंचणार आहे. या दिंडीचे साईबाबा च्या आर्शिवादाने व्यापक स्वरूप होत आहे. दिंडी साठी मागील पंधरा दिवसा पासुन शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. साई रथाची सजावट सुरू आहे. या दिंडीत ज्या साई भक्तांना सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी दि.२३ जानेवारी २०२० पर्यंत मो.९४२३७३७७८४, ९६२३०८४४७७, ९८५०४३०५१५, ९८८१२६३४४३ येथे संपर्क साधावा, हि दिंडी शहराचे ग्राम दैवत हनुमान चौकातील मारोती मंदिर येथुन सकाळी ८ वा. निघणार आहे, या दिंडीत जास्तीत जास्त साई भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री साई द्वारकामाई परिवार सोनपेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिंतुर येथिल व्दादश पट्टाधिकार महोत्सवच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे गौरवाध्यक्षपदी श्री.ष.ब्र.108श्रीगुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची निवड

जिंतुर येथिल व्दादश पट्टाधिकार महोत्सवच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे गौरवाध्यक्षपदी श्री.ष.ब्र.108श्रीगुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची निवड 
परभणी / सोनपेठ (दर्शन ) :-

श्री ष. ब्र.108 श्रीगुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज अमृतेश्वर मठसंस्थान जिंतूर यांचे व्दादश पट्टाधिकार महोत्सवच्या निमित्ताने श्री.श्री.श्री.1008 जगद्गुरु सुर्यसिंहासनाधिश्वर डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल्य पिठ,श्री.श्री.श्री. 1008 जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपिठ यांच्या भव्य दिव्य सानिध्यात संपन्न होणारा आणि सामुहिक विवाह सोहळ्याचे ही भव्य दिव्य आयोजनाच्या कार्यक्रमाचे गौरवाध्यक्ष पदी श्री.ष.ब्र.108 श्रीगुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची निवड झाली या निवडी प्रित्यर्थ वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र च्या वतीने प्रभावती नगरी चे खा.मा. संजय जाधव यांच्या निवासस्थानी खा. संजय जाधव व वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.मदन लांडगे, प्रदेश सचीव प्रवक्ते विरभद्र मठपती यांनी श्री.ष. ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी विरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे सोशल मीडिया प्रमुख सोमेश्वर लाहोरकर, प्रतिष्ठान चे  सदस्य महेश स्वामी, प्रतिष्ठान चे कर्मचारी अध्यक्ष विठ्ठल रनबावरे, बबन मठपती झरीकर, संजय फूलझळके करडगावकर आधी मान्यवर उपस्थित होते.