वादळीवार्यासह पावसाची शक्यता....
हवामानशास्त्र विभाग ः मंगळवारी गारिपीटीचा अंदाज....
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणीसह हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यात वादळी वार्यासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याने सोमवारी (दि. 22) वर्तवली आहे.
दरम्यान, तापमान हळूहळू वाढू लागले आहे. सोमवारी सकाळचे तापसमान 19.2 अंश सेल्सीअसची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून दुपारचे 34 अंशाच्या आसपास तापमान राहू लागल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली. सद्यस्थितीत उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे रविवारी (दि.21) दिवसभर उन्हाचा तेवढा परिणाम जाणवला नाही. मात्र, उकाड्यात काहीशी वाढ झाली.
परभणीसह हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यात येथे सोमवारी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी (दि.23) औरंगाबाद, जालना, बीड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, पावसासह वार्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच लातूर, नांदेड, उस्मानाबाद तर परभणी जिल्ह्यात वादळीवर, पाऊस, वार्याचा वेग अधिक राहून गारपीटीची शक्यता आहे. बुधवारी (दि.24) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, पावसाची शक्यताही व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment