Wednesday, March 10, 2021

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणे तात्काळ निकाली काढा - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणे तात्काळ निकाली काढा - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील अत्याचाराची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत तसेच लवकरात लवकर चार्जशिट दाखल करुन प्रकरणातील साक्षी पुरावे न्यायालयासमोर उभे करुन अत्याचारग्रस्तांना  न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. असे निर्देश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक दि.10 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.यावेळी "सदस्य प्रभाकर सिरसाट" , समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,निवासी आरोग्य अधिकारी डॉ.किशोर‍ सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की,सर्वात अगोदर ॲक्शन प्लॅन तयार करावा त्यानंतर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी खबरदारी घेण्यात घ्यावी. तसेच अत्याचार पीडितांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ गुन्हाचा तपास प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.अशा सुचनाही त्यांनी संबंधितांना यावेळी केल्या.  तसेच न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील प्रकरणे आदिचा आढावा घेवून योग्य त्या सुचना करण्यात आल्या.  अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली माहे फेब्रुवारी 2021 अखेर एकुण 8 गुन्हे दाखल  झाले असून त्यापैकी 8 गुन्हे पोलिस तपासावर आहेत. अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी यावेळी दिली. 


No comments:

Post a Comment