परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने महिला मतदारांना लोकशाही प्रक्रियेसंदर्भात जागरुक करुन त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्हा निवडणूक विभागाच्यातर्फे सन 2020-2021 मध्ये उत्कष्ट कार्य केलेल्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अनिता घोडके, श्रीमती सिमा देशमुख, श्रीमती रोहिणी मुकीरवार तसेच स्थानिक पातळीवर विशेष प्रयत्न केलेल्या वृत्तपत्राच्या संपादक व महिला पत्रकार आणि प्रतिनिधी श्रीमती सुमन उ फाडे, श्रीमती तेजस्विनी देशमुख, श्रीमती ऐश्वर्या डावरे यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, नायब तहसिलदार वंदना मस्के, नानासाहेब भेंडेकर, प्रविण कोकांडे, वैजनाथ भेंडेकर, दिवाकर जगताप, विकास कुटे, बबन भराडे, मारोती माळगे, कुणाल नाहर आदि उपस्थिती होते.
-*-*-*-*-
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment