Wednesday, March 10, 2021

जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणातून 43 इच्छुकांची माघार....

जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणातून 43 इच्छुकांची माघार....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या रिंगणातून बुधवारी (दि.दहा) म्हणजे अंतिम दिवशी विविध मतदारसंघाअंतर्गत 43 इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
जिल्हा बँकेच्या आवारातील शेतकी भवनात बुधवारी सकाळपासून उमेदवारी अर्ज माघारीकरिता एकेककरीत दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 43 इच्छुकांनी अर्ज मागे घेतले आहेत. 
सकाळच्या सत्रात सुमीत परिहार यांनी विमुक्त जाती, यशश्री भगवान सानप यांनी गंगाखेड सोसायटीसह अन्य मतदारसंघ, समशेर वरपुडकर यांनी इतर शेती संस्था व परभणी सोसायटी, भगवान सानप यांनी विमुक्त जाती, शशीकांत रामराव वडकुते यांनी इतर शेती संस्था, दत्तराव काळे यांनी हिंगोली संस्था, अंजली रविंद्र देशमुख यांनी महिला राखीव व इतर मागास प्रवर्ग, सौ. रुपाली पाटील यांनी सेनगाव सहकारी संस्था, गुलाबराव सरकटे यांनी हिंगोली सहकारी संस्था, सोपानराव करंडे यांनी इतर शेती संस्था, ज्ञानेश्वर जाधव यांनी इतर शेती संस्था, भावना कदम यांनी कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया, सुरेश गिरी यांनी विमुक्त जाती, श्रीकांत भोसले यांनी सोनपेठ सहकारी संस्था, सिध्दार्थ भालेराव व प्रतिभा भालेराव यांनी अनुसूचित जाती जमाती, मनिष आखरे यांनी इतर मागासप्रवर्ग, अंबादास भोसले यांनी वसमत सहकारी संस्था, मनिष आखरे यांनी औंढानागनाथ सहकारी संस्था, व्यंकटेश राखे यांनी इतर शेती संस्था, पंकजकुमार राठोड यांनी विमुक्त जाती, चंद्रकांत चौधरी यांनी इतर शेती संस्था, संजीवनी भगवान वटाणे यांनी महिला राखीव, भगवान वटाणे यांनी इतर शेती संस्था, नारायण पिसाळ यांनी विमुक्त जाती, प्रशास ठाकूर यांनी अनुसूचित जाती, सुशीलकुमार देशमुख यांनी कृषी पणन संस्था, व्दारकाबाई कांबळे यांनी अनुसूचित जाती, करूणाबाई कुंडगीर यांनी महिला राखीव, विमुक्त जाती, सुशील मानखेडकर यांनी अनुसूचित जाती, प्रशांत कापसे यांनी इतर मागास प्रवर्ग, वेणूबाई आहेर यांनी महिला राखीव, गतम मोगरे यांनी अनुसूचित जाती, प्रल्हादराव मुरकूटे यांनी गंगाखेड सहकारी संस्था, बालाजी त्रिमले यांनी इतर शेती संस्था, खोब्राजी नरवाडे यांनी वसमत सहकारी संस्था, सुभाष ठवरे यांनी गंगाखेड सहकारी संस्था, व गयबाराव नाईक यांनी औंढानागनाथ सहकारी संस्थेतून उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

No comments:

Post a Comment