Saturday, March 13, 2021

कोरोना लसीकरणाची फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती ; नागरिकांनी कर्तव्य निष्ठेने कोरोना लस टोचून घेऊन कोरोनाचे समूळ उच्चाटन करावे - जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर

कोरोना लसीकरणाची फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती ; नागरिकांनी कर्तव्य निष्ठेने कोरोना लस टोचून घेऊन कोरोनाचे समूळ उच्चाटन करावे -  जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यातील नागरी भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत असताना दिसून येत आहे. कोरोना हॉटस्पॉट भागातील नागरिकांची अँटिजेन चाचणी आणि संपर्कातील व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी जबाबदारीने मास्क,  सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.  सर्व नागरिकांनी कर्तव्य निष्ठेने कोरोना लस टोचून घ्यावी तसेच आपली व समाजाची सुरक्षा करावी आणि कोरोना आजाराचे समूळ उच्चाटन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात कोरोना लसीकरणाबाबतच्या जनजागृतीसाठी तयार केलेल्या फिरत्या वाहनाचे उदघाटन संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,  उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा ग्रामीण  आरोग्य अधिकारी  डॉ. शंकर देशमुख, जिल्हा सूचना अधिकारी सुनिल पोटेकर आदीची उपस्थिती होती.
       पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री मुगळीकर म्हणाले की, कोरोना विषाणू या आजाराला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात कोविशिल्ड व कोवॅक्सिन त्या दोन लस उपलब्ध आहेत. सर्वप्रथम ही लस जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. ही लस आता 45 ते 59 वर्षापर्यंत व 60 वर्षावरील नागरिकांना ही लस उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिका रुग्णालय, आणि खाजगी रुग्णालयात ही लस उपलब्ध झालेली आहे. ही लस अतिशय परिणामकारक असून यामुळे कोरोनापासून बचावासाठी 90 टक्के सुरक्षा मिळते, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कर्तव्याने ही लस टोचून घ्यावी असे सांगून संपूर्ण लसीकरणात लसीचे दोन डोस घ्यावे लागतात एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो त्यामुळे कोरोना आजारापासून सुरक्षा मिळण्यास मदत होते. कोरोना या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी परभणी जिल्ह्यात व्यापक जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून या लसीचा काय उपयोग होतो हे महत्व विषद करणाऱ्या फिरत्या वाहनांचे आज उदघाटन करण्यात आले आहे. तसेच कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात दि.13 व 14 मार्च या दोन दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

               

No comments:

Post a Comment