कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्यास प्रारंभ
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केली प्रत्येक्ष पाहणी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हयामध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याला 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. परभणी शहर महानगर पालिका अंतर्गत जायकवाडी परिसर येथील रुग्णालयात सुरु असलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याची आज जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी या महानगर पालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, महानगर पालिका उपायुक्त प्रदिप जगताप, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, डॉ. आरती देवुळकर हे उपस्थित होते.कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याला 1 मार्चपासून जिल्हयात सुरुवात झाली आहे. या दरम्यान जेष्ठ नागरिक आणि 45 वर्ष वयापैक्षा अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. परभणी महानगर पालिका अंतर्गत जायकवाडी परिसर येथील रुग्णालयात जावून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी लसीकरणाची पाहणी केली. यावेळी जेष्ठ नागरिक बाबुराव गोविंदराव जाधव वय 70 वर्ष यांना आरोग्य सेविका जयश्री गुंगे यांनी लस दिली. तसेच नागरिकांना अर्धा तास डॉक्ट्ररांच्या देखरेखीखाली ठेवले जात आहे. लसीकरण घेतलेल्या नागरिकांची जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी विचारपुस केली व त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच पात्र नागरिकांनी कोविन डिजिटल मंचावर नोंदणी करुन कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.यावेळी डॉक्ट्रर,आरोग्य सेविका, आशा वर्कर, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment