Monday, March 15, 2021

बाबांनो आता तरी ऐका…! - जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ▪️'मी जबाबदार' कर्तव्यभावनेच्या जागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले मास्कचे वाटप ▪अन्यथा दंडात्मक कारवाई

बाबांनो आता तरी ऐका…! - जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
▪️'मी जबाबदार' कर्तव्यभावनेच्या जागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले मास्कचे वाटप
▪अन्यथा दंडात्मक कारवाई


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

शहर व महानगरात व्यापाऱ्यांकडून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे मागील महिन्यापासून बाजारपेठांवर विशेष भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वत: बाजारपेठेत पायी फिरुन कायद्याचा धाक दिला होता. यामुळे काही व्यापाऱ्यांनी कोरोनापासून बचाव व काळजीची त्रिसूत्री पाळली होती. आरोग्य विभागाकडून व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्यांवरही जिल्हा प्रशासनातर्फे भर दिला होता.  तथापि  परभणी शहरात बहुसंख्य व्यापारी स्वत:हून पुढे येत नसल्याने व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणारी मास्क घालणे व इतर त्रिसूत्री पाळत नसल्याचे निदर्शनास आल्याने आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पुन्हा स्वत:  परभणीत जिंतूर रोड, दर्गा रोड, सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बाजारपेठेत फिरून लोकांना मास्क व 'मी जबाबदार' चे बॅचेस आणि गुलाबपुष्प देऊन समजाविण्याचा प्रयत्न केला. 
      यावेळी महापालिका आयुक्त देविदास पवार, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर उपस्थित होते.
          कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन नागरिकांनी मास्कचा वापर, सर्व व्यापारी, आस्थापनाधारक तसेच आस्थापनेवरील सर्व कर्मचारी यांना देखील मास्कचा वापर, विना मास्क दुकानात कोणासही प्रवेश निषिद्ध आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जर रोखायचा असेल तर हे नियम पाळावेच लागतील असे  जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले.
             मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर तसेच व्यापारी आस्थापनामध्ये कोणीही विना मास्क आढळुन आल्यास अशा आस्थापनाधारकांवर अत्यंत कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करुन स्वतः व समाजास सुरक्षीत ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. आज प्रत्यक्ष बाजारपेठेत फिरून त्यांनी पाहणी केली.
              

No comments:

Post a Comment