50 वर्षावरील पोलिसांना फील्डवर ड्युटी देऊ नका ; पोलिस अधीक्षक जयंत मीना....
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलिस दलातील पन्नास वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलीस कर्मचार्यांना फील्डवर ड्युटी देऊ नका, असे स्पष्ट निर्देश रविवारी (दि.28) दिले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी रविवारी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना 50 वर्षावरील कर्मचार्यांना फील्डवर ड्युटी देऊ नका, असे स्पष्ट निर्देश बजावले आहेत. तसेच ज्या कर्मचार्यांना हायपर टेन्शन, बिपी-शुगर, हार्ट प्रॉब्लेम, एन्जोप्लास्टी, पॅरालिसीस, श्वास घेण्याचा प्रॉब्लेम्स, अस्थमा, दमा असे आजार असलेले पोलिस कर्मचारी जर कोरोनाबाधित आढळले तर त्यांना परभणीतील आयटीआय कोविड सेंटरमध्ये दाखल करावे. कोणताही कर्मचारी व होम आयसोलेशनमध्ये राहणार नाही. कुठलाही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय अधिकारी, गृह पोलीस उप अधीक्षक यांच्या वैयक्तिक व्हाट्सअप क्रमांकावर मेसेज करण्यात यावा.
कुठल्याही कर्मचार्याला जराही शारीरिक प्रॉब्लेम असेल तरीही त्यांनी कोरोना लस घ्यायची आहे. ज्या कर्मचार्यांनी पहिली लास घेऊन झाली त्यांनी 28 दिवसांत दुसरी लस घ्यावी. कोणीही कर्मचारी लस घेण्यापासून राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी ठाण्यांना दिलेल्या निर्देशातून स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment