Saturday, March 6, 2021

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकरांनी कोरोनाची घेतली दुसरी लस ; ज्येष्ठ नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकरांनी कोरोनाची घेतली दुसरी लस ; ज्येष्ठ नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन





परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मार्चपासून कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी जबाबदारीने स्वतःहुन पुढे यावे,  असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.        
            जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर  यांनी 6 फेब्रुवारी रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. एक महिना उलटल्यानंतर आज शनिवार दि. 6 मार्च 2021 रोजी लसीकरणातील दुसरा डोस घेऊन त्यांनी लसीकरणाचे दोन टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. 
जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. बाळासाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे व इतर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्या उपस्थितीत त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. 
          कोव्हिड-19 लसीकरणासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारीच्या उपाययोजना घेतलेल्या घेतलेल्या आहेत.  संपूर्ण लसीकरण मोहिमेत पावलोपावली दक्षता घेण्याचे आदेश शासनाने निर्गमित केलेले आहेत. 
                 

No comments:

Post a Comment