"माझा गाव सुंदर गाव" या अभियानाचा विटा खुर्द येथे शुभारंभ तर खपाट पिंपरी अंतर्गत तांडा येथे भेट देऊन घरकुलाच्या कामांचे कौतुक
सोनपेठ (दर्शन) :-
"माझा गाव सुंदर गाव" या अभियानांतर्गत दि.2 फेब्रुवारी 2021 मंगळवार रोजी पंचायत समिती सोनपेठ अंतर्गत ग्रामपंचायत विटा खुर्द येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय निर्मलाताई विटेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शिवानंद टाकसाळे साहेब हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेंद्र तूबकले( उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता) , डॉक्टर कैलास घोडके (उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण), गट विकास अधिकारी सचिन खुडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष पवार, कृषी अधिकारी मधुकर कदम, साहेब गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण, तसेच विस्तार अधिकारी (पंचायत) पंडित साहेब, भोसले साहेब ,विस्ताराधिकारी कृषी अविनाश माळी ,तसेच स्वच्छ भारत मिशन कक्ष, मग्रारोहयो कक्ष कर्मचारी , जिल्हा स्तरावरील स्वच्छ भारत मिशन कक्षाचे गायकवाड साहेब, मुळे साहेब हे उपस्थित होते."माझा गाव सुंदर गाव" या मोहीमेच्या शुभारंभी गावातील येणारा प्रमुख रस्त्यांवर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ यांसारख्या दीर्घायुषी वृक्षांची रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून करण्यात आली. तसेच मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची पाहणी करण्यात आली. सोबतच गावातील सांडपाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून गावांमध्ये दोन ठिकाणी सार्वजनिक शोषखड्डे करण्यात आले. यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सरपंच ,ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शना मध्ये माननीय महोदय यांनी प्रामुख्याने गावातील सर्व नागरिकांनी शौचालयाचा शंभर टक्के वापर करून उघड्यावर शौचालयास जाण्याचे पूर्णपणे टाळणे याबाबत आवाहन केले. सोबतच गावांमध्ये वड ,पिंपळ सोबतच फळझाडांची लागवड करून गाव निसर्ग संपन्न करावा असेही सूचित केले. मुलींचां 18 वर्षे अगोदर विवाह म्हणजेच बालविवाह होणार नाहीत याबाबत गावांनी एकजूट करावी.मुलींनाही मुलांसोबतच शिक्षणाच्या संधी देऊन त्यांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक सक्षमीकरण होईल या बाबतही लक्ष द्यावे असे सुचवले.गावाचा विकास व्हायचा असेल तर शासकीय कर्मचारी, सरपंच यांनी झोकून देऊन काम करावे आणि ग्रामस्थांनीही त्यांना घरपट्टी , पाणीपट्टी 100% भरणा करून सहकार्य करावे असेही आवाहन केले. तसेच गावातील नागरिकांनी सर्व शासकीय कर्मचारी यांना सहकार्य करावे तर ते नक्कीच अजून ताकतीने आपल्याला गावाच्या विकासामध्ये मदत करतील असे सुचवले.जल जीवन मिशन चे माध्यमातून प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी सोबतच प्रति माणसी 55 लिटर पाणी उपलब्ध होईल याकरिता उपलब्ध निधी मधून नियोजन करावे.पाण्याचा वापर जपून करून सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन, ठिबक सिंचन चा वापर भविष्यात अनिवार्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.गावातील प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे.तसेच गोदावरीच्या काठावर बाभळीची झाडे नष्ट करून त्या जागेवर बांबूची लागवड करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकण्याचे काम करणे बाबत ही नियोजन करावे असे त्यांनी सांगितले. पुढच्या पिढी करिता एक समृद्ध निसर्ग हीच खरी संपत्ती असल्याचे नमूद करून गावातील सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या अगदी प्रत्येक बाबीवर सखोलपणे मार्गदर्शन त्यांनी केले.शेवटी ग्रामपंचायत ने केलेल्या कामाबद्दल सरपंच आणि ग्रामपंचायत तसेच कर्मचारी यांचे कौतुक केले.यानंतर माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी ग्रामपंचायती मध्ये झालेल्या विकासकामांचे अभिनंदन करून आपली ग्रामपंचायत राज्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून नावारूपाला येईल याकरिता प्रयत्नशील राहावे असे शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले.तसेच पंचायत समिती सोनपेठ येथे दौर्यावर असताना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत खपाट पिंपरी अंतर्गत तांडा येथे भेट देऊन घरकुल पाहणी केली. येथे सुरू असणाऱ्या घरकुलाच्या कामांचे कौतुकही केले. खपाट पिंपरी येथे अतिशय दर्जेदार, पक्के, स्लॅप मधील बांधकाम होताना पाहून त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केले . त्याच वेळेस त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खपाट पिंपरी तांडा येथेही भेट दिली. भेट देऊन शाळेमध्ये शौचालयाचा नियमित वापर सुरू ठेवावा. शाळेच्या प्रांगणात फळ झाडे लावून ती टिकवा वीत. शाळा स्वच्छ, सुंदर करून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडतील याकरिता जास्तीचे नियोजन करावे, अशाही सूचना दिल्या. या नंतर पंचायत समिती सोनपेठ येथे जल जीवन मिशन अंतर्गत सन्माननीय पदाधिकारी ,सरपंच ,ग्रामसेवक यांचे जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यशाळेला भेट देऊन उपस्थित सरपंच यांना जल जीवन मिशन अंतर्गत करावयाची कामे, कृती आराखडे बाबत सविस्तर मार्गदर्शन करून, उपस्थित महिला सरपंच यांचेही उपस्थिती तसेच कार्यशाळेतील सहभागाबाबत कौतुक करून त्यांचा सन्मानही केला.



No comments:
Post a Comment