मराठवाड्यात 18 व 19 मार्चला वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक १८ मार्च रोजी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात तर दिनांक १९ मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकरी बांधवांनी परिपक्व झालेल्या पीकांची काढणी केली नसल्यास लवकरात लवकर काढणी करून घ्यावी तसेच काढणी व मळणी केलेले पीक ताडपत्री च्या सहायाने झाकून ठेवावे. विजा व पाऊस सुरू असताना शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिला आहे.

No comments:
Post a Comment