परभणी शिक्षणाधिकारी (माध्यमिक )विठ्ठलजी भुसारे यांना राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक पुरस्कार जाहीर
परभणी / सोनपेठ (दर्शन)
परभणी येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) विठ्ठलजी भुसारे यांना मुंबई येथील बालरक्षक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक सन्मान पुरस्कार रविवार ( दि. १४ ) रोजी जाहीर झाला.शिक्षणाधिकारी विठ्ठलजी भुसारे हे मुलांच्या प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणासाठी सदैव अग्रेसर असतात. त्यांच्या शैक्षणिक जागरणामुळे गाव, वाडी, वस्ती, तांडा , फिरस्ते यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचले आहे. येणारे नवीन शैक्षणिक धोरण, रचनावादी शिक्षण , मुलांचा कृतीयुक्त सहभाग या दृष्टीने ते कटिबद्ध आहेत. गाव, शाळा व शिक्षक यांची ते सांगड घालतात. सध्या माध्यमिक शिक्षण विभागाला लोकाभिमुख कामे करून त्यांनी प्रगतीपथावर नेले आहे.मुंबई येथील बालरक्षक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक सन्मान जाहीर झाल्याबद्दल विठ्ठलजी भुसारे यांचे जिल्हा परिषदेतील अधिकारी, पदाधिकारी, अरूण चव्हाळ, यशवंत मकरंद, नागनाथ जाधव, सुशिल देशमुख, त्र्यंबक वडसकर, सुरेश हिवाळे, शरद ठाकर आदींनी अभिनंदन केले आहे.तसेच सा.सोनपेठ दर्शन परीवार व सर्वस्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.


No comments:
Post a Comment