शहर अभियंता महानगरपालिका यांना माहिती आयुक्त यांनी ठोकला पाच हजारांचा दंड
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी शहर महानगरपालिका मधील शहर अभियंता परभणी यांना राज्य माहिती आयोग महाराष्ट्र राज्य खंडपीठ औरंगाबाद यांनी एका प्रकरणी 5000 रुपयांची शास्ती लावण्यात आली आहे. सदरील माहिती अशी की सन 2017 या कालावधीमध्ये अर्जदार भूषण मोरे यांनी माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत माहिती मागविली होती याप्रकरणी जन माहिती अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची अर्जदारास माहिती पुरविली नाही उपायुक्त तथा प्रथम आपली अधिकारी महानगरपालिका परभणी यांनीही या प्रकरणी अर्जदारास सात दिवसाच्या आत माहिती पूरवावी असे आदेश निर्गमित केले होते त्यानंतरही माहिती अधिकारी यांनी आदेशाची कोणतीही दखल घेतलेली नव्हती यामुळे अर्जदाराने खंडपीठ औरंगाबाद माहिती आयोगाकडे एक अपील दाखल केले होते त्या आपिला वरही आयुक्त यांनी माहिती तात्काळ देण्याचे आदेश निर्गमित केले होते पण एक महिन्यानंतरही अर्जदारास कोणतीही माहिती मिळाली नाही यामुळे जनमाहिती अधिकारी यांच्या विरोधात अर्जदार यांनी माहिती आयुक्त यांच्याकडे एक तक्रार केली तक्रारीची माहिती आयोग गंभीर दखल घेऊन संबंधित जन माहिती अधिकारी यांनी विहित मुदतीत कारवाई न केल्यामुळे माहिती अधिकार अधिनियमा तील कलम 7(1) चा भंग झाल्यामुळे जन माहिती अधिकारी यांना कलम 19 (8 )(ग) व 20 (1) नुसार शास्ती का करण्यात येऊ नये अशी नोटीस देऊन तीस दिवसाच्या आत खुलासा करावा यावरही कोणताही खुलासा न करता शहर अभियंता यांनी कोणतीही कारवाई केली नाही यामुळे अधिनियमातील कलम 19( 8) का अन्वये राज्य माहिती आयोगाने आपल्या अधिकारा नुसार शहर अभियंता परभणी शहर महानगरपालिका यांना प्रस्तुत प्रकरणी पाच हजार रुपयाची अंतिम शास्ती लावण्याचा निर्णय घेतला सदरील आदेशावर दिलीप धारूरकर राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांची स्वाक्षरी आहे.


No comments:
Post a Comment