Tuesday, March 30, 2021

माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती

माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती

मुंबई / परभणी सोनपेठ (दर्शन) : -

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून श्री. गणेश श्रीधर रामदासी यांची पदोन्नती झाली आहे. मंत्रालयात संचालक (प्रशासन व तांत्रिक कक्ष) या पदावर त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे.
श्री. रामदासी हे यापूर्वी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2001 मध्ये उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे प्रमुखपदी झाली होती. केंद्रशासनात प्रतिनियुक्तीवर असताना माजी केंद्रिय राज्यमंत्री श्री. तारिक अन्वर तसेच माहिती व प्रसारण मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांच्यासोबत काम करण्याची त्यांना संधी लाभली होती. प्रसारभारतीमध्ये संचालक (प्रशासन) या पदावर त्यांची केंद्रशासनामध्ये सुमारे चार वर्षे प्रतिनियुक्ती होती.

Monday, March 29, 2021

छत्रपती शाहू आणि डॉ आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना मोठे बळ - इतिहास संशोधक इंद्रजित सावंत

छत्रपती शाहू आणि डॉ आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना मोठे बळ - इतिहास संशोधक इंद्रजित सावंत



नवी दिल्ली मुंबई परभणी सोनपेठ (दर्शन):-

छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  छत्रपती शाहूंचे‍ विचार पुढे घेवून जाण्याचे केलेले कार्य आणि या दोघांमधील ऋणानुबंधातून आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांना मोठे बळ मिळाले, असे मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत योनी आज मांडले.
 महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प गुंफताना ‘छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध’ या विषयावर श्री सावंत बोलत होते.छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या थोर व्यक्तीमत्वांनी भारतदेश आणि महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रावर दुरगामी परिणाम केला. या दोन्ही महापुरुषांमध्ये अडीच वर्षांच्या काळात झालेल्या अप्रकाशित पत्रव्यवहारातून त्यांच्या नात्यातील ऋणानुबंध आपणास दिसून येतो. या कालावधीतील गाठी-भेटी व परिषदांमधून शाहूंनी आंबेडकरांचे नेतृत्व प्रस्थापित केले.त्यामुळे बाबासाहेबांना नैतृत्वाचा संघर्ष कमी होवून त्यांना राजमार्ग मिळाला ,असे श्री सांवत म्हणाले.डॉ आंबेडकरांनी स्वत:च्या हस्ताक्षरात छत्रपती शाहुंना लिहीलेली काही अप्रकाशित पत्र कोल्हापूरच्या पुराभिलेख विभागात सापडली आहेत. नागपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेच्या संबंधाने ही पत्र होती. शाहु आणि आंबेडकर एकाच ध्येयाने पुढे जाणारे व्यक्तीमत्व होती. कागदपत्र आणि अभ्यास असा सांगतो की फक्त दोन ते अडीच वर्षाच्या त्यांच्या एकमेकांच्या गाठी-भेटी आहेत. छत्रपती शाहुंनी १९०२ ला त्यांच्या कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा पहिला जाहीरनामा काढून  ५० टक्के जागा आरक्षीत ठेवल्या होत्या. बाबासाहेबांची भेट होण्याआधी शाहु महाराजांनी ६ सप्टेंबर १९१९ रोजी शिवतरकर मास्तरांना लिहीलेले पत्र उपलब्ध झाले आहे. या पत्रानंतरच छत्रपती शाहु आणि बाबासाहेब यांची भेट झाली. या पत्रात शाहुंनी अस्पृष्यतेविरोधातील आपले मत लिहीली होती. या पत्राचे प्रतिबिंब राज्यघटनेत आल्याचे ‍ दिसते असे श्री सावंत म्हणाले.अस्पृष्य चळवळीच्या नेतृत्चाच्या शोधात असताना छत्रपती शाहुंना डॉ. आंबेडकरांविषयी कळताच ते परळच्या चाळीत स्वत: गेले. या दोघा महापुरुषांमध्ये १९१९ ला पहिली भेट झाली. त्या भेटीतच ‘मूकनायक’ वृत्तपत्रासाठी शाहूंनी अडीच हजार रूपये दिले. पहिल्याच भेटीत शाहूंनी आंबेडकरांना कोल्हापूर संस्थानात आमंत्रित केले त्यांचे स्वागत करत फेटा दिला. बाबासाहेबांनीही शाहूंनी बांधलेल्या या फेटयाचा मी आयुष्यभर मान राखीन असा शब्द  दिला. आणि येथून या दोन नेत्यांतील ऋणानुबंधाला सुरुवात झाली. गाठी भेटी सुरु झाल्या.भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार छत्रपती शाहुंनी भारताला दिला
कोल्हापूर संस्थानातील कागल जहागिरीच्या मानगाव येथे २० आणि २१ मार्च १९२० ला दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन भरले हे अधिवेशन म्हणजे बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनातील नैतृत्वाची सुरुवात होती. बाबासाहेब अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात पारित झालेल्या १५ ठरावांवरच बाबासाहेबांच्या पुढील चळवळीची वाटचाल झाली. या अधिवेशनातच छत्रपती शाहूंनी डॉ आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याची घोषणा केली. पुढे ते संपूर्ण भारताचे नेते झाले. भारताच्या क्षितीजावर तडपणा-या या ता-याने देशाला राज्यघटना दिली ज्यावर आज आपला देश समर्थपणे मार्गक्रमण करीत आहे असे श्री सावंत म्हणाले.

 बाबासाहेबांना शाहुंविषयी होता अतिव आदर

 बाबासाहेबांनी ‘बहिष्कृत भारत’ वर्तमानपत्रात शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांक काढला व त्याची  माहिती गोळा करण्यासाठी आपण स्वत: कोल्हापूरला येत असल्याचे  पत्र त्यांनी शाहूंना लिहीले होते. १९५६ मध्ये ‘प्रबुध्द भारत’ च्या अंकात बाबासाहेबांनी शाहूंची महती सांगणारा अंक प्रकाशित केला. शाहुंच्या निधनानंतरही बाबासाहेबांच्या मनातून शाहू कधीच गेले नाहीत, छत्रपती शाहूंचा जन्मदिन उत्सव म्हणून साजरा व्हावा अशी  कल्पना बाबासाहेबांनी मांडली होती, असे श्री सावंत म्हणाले.
३०, ३१ मे १९२० दरम्यान नागपूर मध्ये अखिल भारतीय परिषद भरणार होती शाहू महाराजांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी बाबासाहेंबांची इच्छा होती. त्याचवेळी छत्रपती शाहुंच्या कन्या अक्कासाहेब यांची प्रकृती बरी नव्हती. अक्कासाहेब आजारी असल्याने येवू शकत नाही असे शाहुंनी बाबासाहेबांना पत्राद्वारे कळवले होते. त्यावर बाबासाहेबांनी शाहुंना चार पानाचे पत्र लिहीले त्यात त्यांनी ‘अक्कासाहेबांप्रमाणेच आम्ही आपले लेकर नाही का? असा लडीवाळ हक्क सांगितला होता. या पत्रानंतर शाहुंनी विनंती मान्य करून नागपूर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविल्याचे श्री सावंत म्हणाले.उच्च शिक्षणासाठी डॉ.आंबेडकर लंडनला  गेले तेव्हाही  छत्रपती शाहुंचा त्यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरु होता. 
महात्मा फुले यांचा वारसा छत्रपती शाहुंनी पुढे नेला तर  डॉ. आंबेडकरांनी  फुले-शाहुंच्या विचारांचा वारसा पुढे नेत त्यात भर टाकली. भारत देशाचा सबंध गाडा ज्या राज्यघटनेवर चालतो ती राज्यघटना डॉ. आंबेडकरांनी आपल्याला दिली.आधुनिक महाराष्ट्राचा पायाच या महारुषांनी घातला व हेच विचार महाराष्ट्राला पुढे घेवून जाणारे आहेत असा विश्वास श्री सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
 

Sunday, March 28, 2021

‘छत्रपती शाहू-डॉ.आंबेडकर यांचे ऋणानुबंध’या विषयावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे व्याख्यानाचा जरुर लाभ घ्या

‘छत्रपती शाहू-डॉ.आंबेडकर यांचे ऋणानुबंध’या विषयावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचे व्याख्यानाचा जरुर लाभ घ्या





नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे उद्या २९ मार्च २०२१ रोजी ‘छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध’ या विषयावर अकरावे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’आयोजित करण्यात आली आहे. २९ मार्च रोजी या व्याख्यानमालेच्या अकराव्या दिवशी इंद्रजित सावंत हे दुपारी ४ वाजता विचार मांडणार आहेत.

इंद्रजित सावंत यांच्या विषयी
इंद्रजित सावंत यांनी ‘शिवगर्जना’ व ‘नरशार्दुल संभाजी’ ही महानाटय लिहीली आहेत. ‘राजर्षी शाहू महाराजांचे चित्ररूप चरित्र’, ‘छत्रपती शिवरायांच्या अस्सल पत्रांवर टाकलेला प्रकाश’, ‘शोध भवानी तलवारीचा’ आदी त्यांचे संशोधनात्मक ग्रंथ होत. शिवकालीन इतिहासाचा दस्ताऐवज असणा-या ‘शिवाजी द ग्रेट’ या संकेतस्थळावरील मजकुराचे संपादन श्री सावंत यांनी केले आहे. यासह विविध पुस्तके व ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे.
सोमवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण

सोमवार, 29 मार्च 2021 रोजी दुपारी 4 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे ‍मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic, हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि ‍ इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मिडीया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi युटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic
                       ००००

50 वर्षावरील पोलिसांना फील्डवर ड्युटी देऊ नका ; पोलिस अधीक्षक जयंत मीना....

50 वर्षावरील पोलिसांना फील्डवर ड्युटी देऊ नका ; पोलिस अधीक्षक जयंत मीना....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलिस दलातील पन्नास वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना फील्डवर ड्युटी देऊ नका, असे स्पष्ट निर्देश रविवारी (दि.28) दिले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी रविवारी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना 50 वर्षावरील कर्मचार्‍यांना फील्डवर ड्युटी देऊ नका, असे स्पष्ट निर्देश बजावले आहेत. तसेच ज्या कर्मचार्‍यांना हायपर टेन्शन, बिपी-शुगर, हार्ट प्रॉब्लेम, एन्जोप्लास्टी, पॅरालिसीस, श्वास घेण्याचा प्रॉब्लेम्स, अस्थमा, दमा असे आजार असलेले पोलिस कर्मचारी जर कोरोनाबाधित आढळले तर त्यांना परभणीतील आयटीआय कोविड सेंटरमध्ये दाखल करावे. कोणताही कर्मचारी व होम आयसोलेशनमध्ये राहणार नाही. कुठलाही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय अधिकारी, गृह पोलीस उप अधीक्षक यांच्या वैयक्तिक व्हाट्सअप क्रमांकावर मेसेज करण्यात यावा. 
कुठल्याही कर्मचार्‍याला जराही शारीरिक प्रॉब्लेम असेल तरीही त्यांनी कोरोना लस घ्यायची आहे. ज्या कर्मचार्‍यांनी पहिली लास घेऊन झाली त्यांनी 28 दिवसांत दुसरी लस घ्यावी. कोणीही कर्मचारी लस घेण्यापासून राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी ठाण्यांना दिलेल्या निर्देशातून स्पष्ट केले आहे.

लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचा महाराष्ट्रावर प्रभाव- डॉ अशोक चौसाळकर

लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचा महाराष्ट्रावर प्रभाव- डॉ अशोक चौसाळकर           
                                                          
नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

 आशियाई देशातील लोकांचे जनजागरण,भारतीय धर्मनिपरपेक्ष राष्ट्रवादाची मांडणी आणि देशात लोकशाही स्थापन होण्यासाठी मांडलेले विचार हे लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचे महत्वाचे पैलु असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही जाणवतो, असे मत विचारवंत व राज्यशास्त्रज्ञ डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.
 महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना ‘लोकमान्य टिळक यांचा वारसा’ या विषयावर डॉ. चौसाळकर बोलत होते.
 आधुनिक भारताच्या इतिहासात 1880 ते 1920 या कालावधीत लोकमान्य टिळकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ब्रिटीश सत्ताधा-यांविरुध्द उभे राहण्यासाठी त्यांनी भारतीय जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. दैनिक केसरीच्या शिरोभागी लिहीलेल्या श्लोकातून टिळकांनी ब्रिटीश सत्तेचा मदांध सत्ताधारी असा उल्लेख करून मोठे आवाहन दिले होते व आयुष्यभर त्यांनी ब्रिटीश साम्राज्यवादा विरूध्द लढा दिला. या संपूर्ण कालावधीत लो. टिळकांनी दिलेला वैचारिक वारसा हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वपूर्ण असल्याचे डॉ. चौसाळकर म्हणाले.
ब्रिटीशांच्या दडपशाहीमुळे भारतीय जनतेमध्ये निर्माण झालेली भिती नष्ट करून त्यांच्या मध्ये वीर वृत्तीचे पोषण करण्याचे कार्य टिळकांनी केले. टिळकांनी मराठी भाषेत लिखाण केले त्यासाठी वर्तमानपत्र काढले .लोकांमध्ये जावून कार्य केले.लोकचळवळ उभारल्या. राजकीय कारणासाठी तुरुंगवास भोगणारे लो.टिळक हे पहिले भारतीय राजकीय पुढारी होत. कोल्हापूर प्रकरणात लो.टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना 101 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. 1897 ते 1899 या काळात त्यांना राजद्रोहासाठी तुरुंगवास भोगावा लागला. 1908 ते 1914 असा दीर्घ काळाचा कारावास त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात भोगावा लागला.
  1918 साली पॅरीस येथे भरलेल्या परिषदेत टिळकांनी राष्ट्रीय स्वयं निर्णयाचा प्रस्ताव मांडला होता व अनेक देशांनी याला पाठिंबा दिला. टिळकांनी राष्ट्रवादाची शिकवण दिली. धर्माधिष्टीत राष्ट्रात प्रत्येकास आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे असा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद त्यांनी मांडला. टिळकांनी स्वराज्याची कल्पना मांडताना लोकशाही राज्याची भूमिका मांडली. स्वराज्यात जनतेला स्वत:चे भवितव्य घडविण्याचा अधिकार असावा, लोकांना मनाप्रमाणे सरकार निवडण्याचा अधिकार असावा,स्वराज्याचा कारभार लोककल्याणासाठी व्हावा असे टिळक मानत. ‘गिता रहस्य’  ग्रंथाच्या माध्यमातून आपले कर्तव्य निस्वार्थपणे करावे व अन्यायाचा निष्काम भावनेने प्रतिकार करावा असा विचार टिळकांनी  मांडला.
  ‘स्वराज्य’, ‘स्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षण’ आणि ‘बहिष्कार’ या चतु:सूत्रीच्या आधारावर टिळकांनी ब्रिटीश सरकार विरुध्द निडरपणे संघर्ष केला.1905-06 मध्ये देशात वंगभंगाविरूध्द सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये टिळकांना मोठया प्रमाणात पाठिंबा मिळाला. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी ‘होमरूल चळवळ’ अर्थात ‘स्वराज्य संघाची चळवळ’ सुरु केली त्यासाठी त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली व  हजारो लोकांना लीगचे सभासद बनवले. 
होमरूल लीगचे महत्व सांगतांना लो. टिळकांनी ,‘स्वराज्य माझा जन्म सिध्द हक्क आहे व तो मी मिळविणाराच’ अशी प्रसिध्द घोषणा केली. हजारो लोक या चळवळीत सहभागी झाले. या चळवळीत स्त्रिया मोठया प्रमाणात सहभागी झाल्या. स्वराज्याचे अधिकार हे जनतेचे जन्मसिध्द अधिकार असून नैसर्गिकरित्या ते प्राप्त झाले आहेत अशी  टिळकांची मांडणी होती.
टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटीक पार्टीची स्थापना करून 1920 मध्ये त्या पार्टीचा जाहीरनामा घोषित केला. यात नवभारताची प्रतिमा अभिव्यक्त झाल्याचे दिसते. लोकमान्य टिळकांनी देशासह महाराष्ट्राला दिलेला हा वैचारीक वारसा जपून महाराष्ट्राला पुढे घेवून जावू या असा विश्वास डॉ चौसाळकर यांनी यावेळी मांडला.

Saturday, March 27, 2021

शहर अभियंता महानगरपालिका यांना माहिती आयुक्त यांनी ठोकला पाच हजारांचा दंड

शहर अभियंता महानगरपालिका यांना माहिती आयुक्त यांनी ठोकला पाच हजारांचा दंड



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

परभणी शहर महानगरपालिका मधील शहर अभियंता परभणी यांना राज्य माहिती आयोग महाराष्ट्र राज्य खंडपीठ औरंगाबाद यांनी एका प्रकरणी 5000 रुपयांची शास्ती लावण्यात आली आहे. सदरील माहिती अशी की सन 2017 या कालावधीमध्ये अर्जदार भूषण मोरे यांनी माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत माहिती मागविली होती याप्रकरणी जन माहिती अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची अर्जदारास माहिती पुरविली नाही उपायुक्त तथा प्रथम आपली अधिकारी महानगरपालिका परभणी यांनीही या प्रकरणी अर्जदारास सात दिवसाच्या आत माहिती पूरवावी असे आदेश निर्गमित केले होते त्यानंतरही माहिती अधिकारी यांनी आदेशाची कोणतीही दखल घेतलेली नव्हती यामुळे अर्जदाराने खंडपीठ औरंगाबाद माहिती आयोगाकडे एक अपील दाखल केले होते त्या आपिला वरही आयुक्त यांनी माहिती तात्काळ देण्याचे आदेश निर्गमित केले होते पण एक महिन्यानंतरही अर्जदारास कोणतीही माहिती मिळाली नाही यामुळे जनमाहिती अधिकारी यांच्या विरोधात अर्जदार यांनी माहिती आयुक्त यांच्याकडे एक तक्रार केली तक्रारीची  माहिती आयोग गंभीर दखल घेऊन संबंधित जन माहिती अधिकारी यांनी विहित मुदतीत कारवाई न केल्यामुळे माहिती अधिकार अधिनियमा तील कलम 7(1) चा भंग झाल्यामुळे जन माहिती अधिकारी यांना कलम 19 (8 )(ग) व 20 (1) नुसार शास्ती का करण्यात येऊ नये अशी नोटीस देऊन तीस दिवसाच्या आत खुलासा करावा यावरही कोणताही खुलासा न करता शहर अभियंता यांनी कोणतीही कारवाई केली नाही यामुळे अधिनियमातील कलम 19( 8) का अन्वये राज्य माहिती आयोगाने आपल्या अधिकारा नुसार शहर अभियंता परभणी शहर महानगरपालिका यांना प्रस्तुत प्रकरणी पाच हजार रुपयाची अंतिम शास्ती लावण्याचा निर्णय घेतला सदरील आदेशावर दिलीप धारूरकर राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांची स्वाक्षरी आहे.

शाहिरी परंपरेने प्रबोधन चळवळ जनमानसात नेली - शाहीर संभाजी भगत

शाहिरी परंपरेने प्रबोधन चळवळ जनमानसात नेली - शाहीर संभाजी भगत


नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  केलेले समाजकार्य व राबविलेली प्रबोधन चळवळ समर्थपणे जनमानसांपर्यंत नेण्याचे महत्वपूर्ण कार्य शाहिरी परंपरेने केले, असे मत प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांनी आज मांडले.       महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे नववे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राची शाहिरी परंपरा’ या विषयावर शाहीर भगत बोलत होते.
  मातृसत्ताक मुल्यातून १३ व्या शताकात झालेला शाहिरीचा उगम आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी शाहिरी पंरपरेचा केलेला प्रभावी वापर. पेशवाईत शाहिरीत झालेला बदल. पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ‘सत्यशोधक जलसे’ उभारून जनप्रबोधनाचे केलेले कार्य . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजक्रांतीसाठी उभारलेले सत्याग्रह व लढयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सुरु केलेले ‘आंबेडकरी जलसे’. ‘लाल बावटा कलापथक’. ‘समाजवादी कलापथक’ ते संयुक्त महाराष्ट्राच्या चवळवळीत शाहिरीने प्राण फुंकुन केलेले प्रबोधन असा पटच शाहीर भगत यांनी यावेळी उलगडला.

Thursday, March 25, 2021

आज दि. 26 मार्चला श्रीजगद्गुरू रेणुकाचार्य जयंती आहे. ती सर्व वीरशैवांनी भक्तिभावाने साजरी केली पाहिजे. यासाठी हा विशेष लेख...

आज दि. 26 मार्चला श्रीजगद्गुरू रेणुकाचार्य जयंती आहे. ती सर्व वीरशैवांनी भक्तिभावाने साजरी केली पाहिजे. यासाठी हा विशेष लेख...


महान समन्वयाचार्य श्रीरेणुकाचार्य
जगातील धर्मांमध्ये वीरशैव हा एक प्राचीन धर्म मानला जातो. या धर्माला प्राचीन इतिहास असून युगायुगांची परंपरा लाभलेली आहे. इष्टलिंगधारणेच्या वीरव्रताचे प्रबोधन करणारा, शरीर हेच शिवालय असे प्रतिपादन करणारा, पंचसूतके नाकारणारा, अन्य धर्मांना विरोध न करता त्यांच्यात समन्वय साधण्याचा उपदेश करणारा, लिंगदीक्षेमध्ये वर्ण-जाति-लिंगभेद न पाळणारा, लिंगांगसामरस्यबोधक विद्येत रममाण व्हा असा उपदेश करणारा असा हा धर्म होय. या धर्मात व्यक्तीची योग्यता व उत्कट शिवभक्ती पाहून, तिच्या जातीचा विचार न करता दीक्षा दिली जाते. दीक्षेनंतर सर्वांना शिवस्वरूप मानण्यास हा धर्म सांगतो.या धर्माने उद्योगाचे व श्रमाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. स्वकष्टार्जित संपत्ती प्रथम शिवार्पण करून नंतर गुरु-लिंग-जंगमांना आणि समाजातील दुर्बल घटकांना दान करून मग तिचा उपभोग घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे अन्नदेखील शिवार्पित करून, प्रथम भुकेल्यास देऊन नंतर स्वत: ग्रहण करण्यास सांगितले आहे. अशी शिकवण देणारा जो धर्म आहे त्याला ‘वीरशैवधर्म’ म्हणतात. या धर्मालाच समाजात ‘लिंगायत’ असे पर्यायनाम असून वीरशैव व लिंगायत हे भिन्न आहेत असा प्रचार करणारे दिशाभूल करतात असे समजले पाहिजे.वेद,अगम व उपनिषदांतून वरील तत्त्वांचे प्रतिपादन केलेले आहे. ही तत्त्वे लोकमनात बिंबवण्यासाठी शिवाच्या आज्ञेने पंच शिवगणांनी लिंगांतून प्रादुर्भूत होऊन या धर्माची प्रतिष्ठापना केली असे परंपरा मानते. हे पंच शिवगण म्हणजेच पंचाचार्य असून हेच वीरशैवधर्माचे संस्थापक होत. या शिवगणांनी अनुक्रमे कृतयुगात एकाक्षर, द्व्यक्षर, त्र्यक्षर, चतुरक्षर व पंचाक्षर या नावांनी; त्रेतायुगात एकवक्त्र, द्विवक्त्र. त्रिवक्त्र, चतुर्वक्त्र व पंचवक्त्र या नावांनी; द्वापरयुगात रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण व विश्‍वकर्ण या नावांनी आणि कलियुगात रेवणाराध्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य व विश्‍वाराध्य या नावांनी अवतार घेतला. पंचाचार्यांनी रंभापुरी, उज्जयिनी, केदार, श्रीशैल व काशीक्षेत्र येथे पंचपीठांची स्थापना केली. ही वीरशैवांची राष्ट्रीय महापीठे होत.पंचाचार्यांच्या या दिव्य परंपरेतील श्रीजगद्गुरू रेणुकाचार्य हे रंभापुरी पीठाचे आचार्य होते. फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला तेलंगणा प्रांतातील सुप्रसिद्ध कोल्लिपाकी क्षेत्रातील सोमेश्‍वर महालिंगातून ते प्रादुर्भूत झाले. या प्रदेशाला ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’त त्रिलिंग देश असे म्हटले आहे. श्रीशैलमल्लिकार्जुन, कोल्लिपाकी सोमेश्‍वर आणि द्राक्षाराम क्षेत्रातील भीमनाथ (रामनाथ) ही तीन लिंगे या प्रदेशात असल्यामुळे याला त्रिलिंग देश असे म्हटले जात असे. याशिवाय इष्टलिंग, प्राणलिंग व भावलिंग या त्रिलिंगांची पूजा करणार्‍या वीरशैवांची संख्या या प्रदेशात अधिक असल्यामुळेही याला त्रिलिंग देश म्हणतात, असेही एक मत आहे. विशेष म्हणजे सोमेश्‍वरलिंगातून रेणुकाचार्य, भीमनाथलिंगातून एकोरामाराध्य व मल्लिकार्जुनलिंगातून पंडिताराध्य यांचा उद्भव झाल्यामुळे ही तीनही लिंगे वीरशैवांची श्रद्धास्थाने होत.सोमेश्‍वरलिंगातून प्रादुर्भूत झाल्यावर श्रीजगद्गुरू रेणुकाचार्य आकाशमार्गाने मलयपर्वतावर गेले आणि तेथे अगस्त्य महर्षींना त्यांनी शिवाद्वैताचा उपदेश केला. तोच उपदेश श्रीशिवयोगी शिवाचार्यांनी ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’ या ग्रंथात ग्रथित केला आहे. महर्षी अगस्त्यांनी प्रत्यक्ष श्रीरामाला आदित्यहृदय-कवचाचा उपदेश केला होता. अशा थोर अगस्त्य ऋषींना दीक्षा देऊन आणि शिवाद्वैताचा उपदेश करून त्यांच्या मनातील संदेह जगद्गुरू रेणुकाचार्यांनी दूर केला. यावरून जगद्गुरू श्रीरेणुकाचार्यांचे थोरपणही सहज लक्षात येते.जगद्गुरू श्रीरेणुकाचार्यांनी जो उपदेश केला त्याचा सारांश अशाप्रकारे सांगता येईल. धर्म हा आचरणासाठी असतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जप व ध्यान यांचे आचरण करणे म्हणजे धर्म होय. धर्माचरण केल्यामुळे व्यक्तित्वाचा विकास होतो आणि व्यक्तित्व विकसित झाल्यामुळे समाजाचे कल्याण साधते. धर्माचरण करताना अन्य धर्मतत्त्वांचे खंडन करू नये. शिवदीक्षा घेतलेल्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. जीवाचा आध्यात्मिक विकास होऊन त्याला शिवभाव प्राप्त व्हावा यासाठी षट्स्थलांचे आचरण करावे. षट्स्थलातील १०१ उपस्थले म्हणजे मानवी मनाचा क्रमबद्ध विकासच होय. जगद्गुरू रेणुकाचार्यांनी अगस्त्य महर्षींना पडविडी सूत्राचा उपदेश केला. पडविडी म्हणजे पदविधी. श्रीगुरूला शरण गेल्यानंतरच कोणतेही तत्त्व प्राप्त करून घेता येते, असा या सूत्राचा अर्थ होय. दीक्षाविधी स्पष्ट करताना सामाजिक असमानता दूर करण्याचा त्यांनी जसा उपदेश केला त्याप्रमाणेच सोपाधिक, निरुपाधिक व सहज असे दानप्रकार सांगून आर्थिक असमानता दूर करण्याचीही शिकवण दिली. याशिवाय जे लोक शिवयात्रा करतात त्यांच्यासाठी अन्न व जलाची व्यवस्थाही करण्यास सांगितले.श्रीरेणुकाचार्य हे एक महान पुरुष होते. शुद्धाचरण, शुद्ध विचार आणि अष्टमहासिद्धी या गुणांनी ते संपन्न होते. तीन कोटी आचार्यांची रूपे धारण करून त्यांनी श्रीलंकेत त्रिकोटी लिंगस्थापना केली. असे ते महासिद्ध पुरुष होते. त्यांनी कलियुगात रेवणसिद्ध या नावाने अवतार घेतला. आद्य शंकराचार्यांना लिंगप्रदान केले, कोल्हापूरच्या गोरक्षराजाचे गर्वहरण केले, कांचीमध्ये वरदराजमूर्तीचे शिरकंपन थांबविले, अशा त्यांच्या अनेक चमत्कारकथा ‘रेणुकविजयपुराणा’त वर्णिलेल्या आहेत.सर्व वीरशैवांनी अवश्य साजरा केली पाहिजे.त्यांनी जो महान उपदेश केला त्याबद्दल त्यांना मानवंदना दिली पाहिजे. याशिवाय प्रत्येक पीठात त्या त्या पीठाचार्यांचे उत्सव साजरे होतात. परंतु सर्व पीठाचार्यांनी एका व्यासपीठावर येऊन समाजाचे व शासनाचे सहकार्य घेऊन पाचही आचार्यांचा प्राकट्यमहोत्सव साजरा केला पाहिजे.

Wednesday, March 24, 2021

बृह्ममहाराष्ट्राने निर्माण केली महाराष्ट्राची सशक्त प्रतिमा – ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे

बृह्ममहाराष्ट्राने निर्माण केली महाराष्ट्राची सशक्त प्रतिमा – ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे



नवी दिल्ल /मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक नैतृत्व करत राज्याच्या साहित्य, संस्कृती  व्यवहाराला पुढे आणण्याचे कार्य करणा-या बृह्नमहाराष्ट्राच्या चळवळीने राज्याची सशक्त प्रतिमा निर्माण करण्याचे  मोलाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन पणजी (गोवा) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक प्रभाकर ढगे यांनी आज केले.   
     महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफताना ‘बृह्नमहाराष्ट्रातील महाराष्ट्र’ या विषयावर श्री ढगे बोलत होते. 

             बृह्नमहाराष्ट्रातील महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र परिचय केंद्र यांनी महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक नैतृत्व करत साहित्य, सांस्कृतिक  व्यवहाराला पुढे आणण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे म्हणूनच  देश व परदेशात ही  महाराष्ट्राची शक्तीस्थळे  ठरली असल्याचे श्री ढगे म्हणाले. अन्य राज्यात मराठी माणसांची  विविध क्षेत्रातील घौड-दौड महाराष्ट्राला पुरक आहे.अखिल भारतीय साहित्य महामंडळ,विश्व साहित्य संमेलन यामाध्यमातूनही बृह्नमहाराष्ट्रात सुरु असलेल्या कार्याला जोडण्याचे व महाराष्ट्र संस्कृतीचे विश्वव्यापी काम झाल्याचे त्यांनी सांगीलते. तसेच या कार्यास  महाराष्ट्रातील जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो याची अपेक्षा व प्रतिक्षाही बृह्ममहाराष्ट्रातील जनतेला असते असे ते म्हणाले. देशाच्या विविध प्रांतात व परदेशात आपले स्वत:चे स्थान निर्माण करत असताना आपल्या संस्कृतीला सतत जपणा-या बृहन्महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्रातील जनतेकडूनही काही सहकार्य मिळण्याची वा त्‍यांच्या सादाला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 मराठी संस्कृती व मराठी भाषेचा प्रसार व संवर्धन करण्यासाठी मराठी नियत कालीके, मराठी शाळा-विद्यालये, ग्रंथालये, संशोधनकार्य आदींच्या माध्यमातून बृह्नमहाराष्ट्रात सुरु असलेल्या उपक्रमांवरही श्री ढगे यांनी प्रकाश टाकला. विचार आणि स्नेहाचे आदान-प्रदान अधिक वृध्दींगत होण्यासाठी बृह्ममहाराष्ट्र आणि महाराष्ट्र यामध्ये दुवा सांधणारी  एक चळवळ राज्यात निर्माण होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.बृह्ममहाराष्ट्रात साहित्य निर्मिती प्रमाणेच अनुवादाचेही काम होत असे. मात्र, मराठी भाषेत होणारी साहित्य निर्मिती ही देशातील अन्य भाषांमध्ये हव्या त्या प्रमाणात जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्या-राज्यांतील अशा सांस्कृतिक व्यवहारांना गती देण्यासाठी पुढाकार घेतला जावा अशी अपेक्षा श्री ढगे यांनी व्यक्त केली. 

            महाराष्ट्र परिचय केंद्र ठरले बृह्नमहाराष्ट्राला जोडणारे दुवे  
 
‍ि गोवा आणि दिल्ली  येथील  महाराष्ट्र परिच केंद्र आपल्या राज्याचा त्या-त्या राज्यांतील लोकांना परिचय करून देण्याबरोबरच दोन राज्यांचे सांस्कृतिक आणि सामाजिक अनुबंध व संवाद सेतु सांधण्याचे कार्य करीत आहेत. या परिचय केंद्रानी बृह्नमहाराष्ट्राला जोडणा-या दुव्यांप्रमाणे कामगिरी निभवली आहे. हे कार्य प्रत्येक राज्यात वाढत गेले तर महाराष्ट्राचा प्रभाव वाढण्यासाठी पूरक भूमिका साध्य केली जाईल. महाराष्ट्र मंडळ व परिचय केंद्र ही  चाकोरीत काम करणारी  नसून महाराष्ट्राची भूमिका प्रभावीपणे मांडणारी शक्तीस्थळ आहेत. त्यामुळे  यांची व्यापकता वाढवणे गरजेचे ठरेल यांना सोबत घेवून भविष्यात काम करावे लागेल ,असे श्री ढगे म्हणाले.  
महाराष्ट्राने इतिहासात गौरवास्पद कामगिरी केली आहे व वर्तमानात उल्लेखनी कामगिरी करीत आहे आणि भविष्यातही या राज्याला वैचारीक नैतृत्व करण्याची संधी लाभणार आहे. या वैचारीक वारशाचा व औद्योगितकतेचा वसा पुढे नेत असताना एक प्रगल्भ विकास पूरक व पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राने बृह्ममहाराष्ट्रातील ही  आपली जनसंपर्काची  साधने अधिक सशक्त करण्याची गरज आहे. भविष्यात ही साधने सशक्त झाल्यास महाराष्ट्र हे केवळ राज्याच नाही तर महाराष्ट्र हा एक विचार असेल, एक चळवळ असेल महाराष्ट्र ही देशाला जोडणारी व्यापक अर्थाने सशक्त भूमिका असेल असा विश्वास श्री. ढगे यांनी व्यक्त केला.
                       

आज सायंकाळी सातपासून संचारबंदी ;अत्यावश्यक सेवेस सूट....31 मार्चपर्यंत संचारबंदी....

आज सायंकाळी सातपासून संचारबंदी ;अत्यावश्यक सेवेस सूट....31 मार्चपर्यंत संचारबंदी....


परभणी / सोनपेठ (दर्शन):-

कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखावा म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी (दि.24) सायंकाळी सात वाजल्यापासून ते 31 मार्चपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारपंदीतून काही बाबींना सूट देण्यात आली असल्याची माहिती बुधवारी (दि.24) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.सूट देण्यात आलेल्यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये त्यांचे अधिकारी, कर्मचाऱी व त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, रुग्णवाहिका, सर्व शासकीय व खासगी दवाखाने, सर्व औषदी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, लसीकर केंद्र, आरटीपीसीआर, अँटीजन चाचणी तपासणी केंद्र, वैद्यकीय आपताकल व त्यासंबधी सेवा, कोव्हिड रुग्णांना घेऊन येणारी वाहने, त्यांचे नातेवाईक त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व वय्क्ती, प्रिंट मेडिया, इलेक्ट्रॉनिक मेडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने, किराणा दुकानातून होणारी घरपोच सेवा, दुध विक्रेते (गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी सहा ते नऊ या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबून विक्री करता येणार नाही), कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्ती व लसीकरणासाठी जाणार्‍या व्यक्ती यांना सूट राहील, आरटीपीसीआर व अँटीजन चाचणी करण्यासाठी जाणार्‍या व्यक्ती यांना सूट राहील, स्पर्धा परीक्षेसाठीच्या अभ्यासिका, वाचनालय यातील विद्यार्थी व कर्मचारी वर्ग इ., जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे अंतर्गत कामकाज, शासकीय चालान, शासकीय रोकड घऊन जाणारी वाहने व अत्यावश्यक सेवेतील बँक यांना संचारबंदी कालावधीत सूट देण्यात येत आहे, सीए, सीएमए, सीएस, टॅक्स प्रेक्ट्रीशनर इत्यादी सेवांची कार्यालये व त्यांची वाहने, स्वस्त धान्य दुकाने (शक्यतो घरपोच धान्य देण्याचा प्रयत्न करावा), दि. 24 मार्च व दि. 26 मार्च रोजी श्री शिवाजी महाविद्यालय येथे घेण्यात येणार्‍या ऑनलाईन परीक्षेसाठी येणारे अधिकारी,कर्मचारी, प्राध्यापक, घरपोच पिण्याचे पाणी पुरवठ करणारी वाहने, लसीकरणासाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी,बीएलओ आदींना यातून सूट असेल असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी काढलेल्या आदेशातून म्हटले आहे.

Tuesday, March 23, 2021

परजिल्ह्यातून ये-जा करण्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी -जिल्हाधिकारी मुगळीकर यांचे आदेश

परजिल्ह्यातून ये-जा करण्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदी -जिल्हाधिकारी मुगळीकर यांचे आदेश


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातुन ये - जा करणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांना मंगळवार दि.23 पासून 31 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (दि.22) सायंकाळी जारी केले.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव आजुबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अधिकारी -  कर्मचार्‍यांचे अपडाऊन रोखणे आवश्यक आहे. त्यावर उपाययोजना म्हणून परभणी जिल्ह्याबाहेरून जे अधिकारी - कर्मचारी जिल्ह्यात अप-डाऊन करतात असे अधिकारी, कर्मचारी अनेक व्यक्ती, नागरिक, प्रवाशांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून कोरोना विषाणूचा संसर्ग, प्रादूर्भाव जिल्ह्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे मंगळवारपासून ते 31 मार्चपर्यंत जे कोणी अधिकारी - कर्मचारी नोकरी व कामानिमित्त बाहेर जिल्ह्यात जातात अथवा बाहेर जिल्ह्यातील अधिकारी - कर्मचारी या जिल्ह्यात येतात अशा अधिकारी, कर्मचार्‍यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास व जिल्ह्यातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व कार्यालये, विभागप्रमुख यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Monday, March 22, 2021

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश


 परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

 जिल्ह्यात covid-19 कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज सोमवार दिनांक 22 मार्च रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आवश्यकतेनुसार सनियंत्रण अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेडिकल ऑक्सीजन व्यवस्थापन नियंत्रक अधिकारी म्हणून रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जराड, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थापनासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, सिविल हॉस्पिटल व्यवस्थापनासाठी पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी बी.एच. बिबे, आयटीआय हॉस्पिटल व्यवस्थापनासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, रूम वॉर हॉस्पिटल व्यवस्थापनासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड,  हॉस्पिटल बेड व्यवस्थापनासाठी जिल्हा सूचना अधिकारी सुनिल पोटेकर, आरटीपीसीआर व आरएटी तपासणी व्यवस्थापनासाठी नायब तहसीलदार रामदास कोलगणे,लसीकरण व्यवस्थापनासाठी तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसीलदार अशोक मिरगे, खाजगी रुग्णालय व्यवस्थापनासाठी पथक प्रमुख म्हणून तहसीलदार डॉ.संजय बिराजदार यांची नियुक्ती केली आहे. या पथकात नायब तहसीलदार अशोक मिरगे, वंदना मस्के, दळवे, कैलास वाघमारे, शितल कच्छवे यांचाही समावेश आहे. सर्व नियुक्त अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.

‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.........

‘बार्डो’ या  चित्रपटाला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.........



दिल्ली / मुंबई / परभणी (दर्शन) : - 

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता याविषयावरील चित्रपटांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘ताजमाल’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

येथील नॅशनल मिडीया सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.  

‘बार्डो’ हा ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला  आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. हा चित्रपटाचे निर्माते रितु फिल्मस कट एलएलपी हे आहेत. याच चित्रपटातील  ‘रान पेटला...’ या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.   
 ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिसाइनचाही पुरस्कार जाहीर झाला आहे.  प्रोडक्शन डिसाइन  सुनिल निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे. 
राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला जाहीर झाला आहे.  हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे. तर टूलाईन स्टूडियो प्रा.ली. यांची निर्मिती आहे. 

‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.  उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘कस्तुरी’ या हिंदी सिनेमाला जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आहेत तर इनसाईट फिल्मसची निर्मिती आहे. 

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत विविध मराठी चित्रपटांना पुरस्कार

‘जक्कल’ या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत  उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सिनेमा निऑन रील क्रियेशन ने निर्मित केला असून विवेक वाघ दिग्दर्शक आहेत.

उत्कृष्ट डेब्यु दिग्दर्शक या श्रेणीमध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते पीपी सिने प्रोडक्शन आहेत. तर राज प्रितम मोरे हे या स‍िनेमाचे दिग्दर्शक आहे. 
सामाजिक विषयावर आधारित श्रेणीत  ‘होली राईट्स’ या हिंदी नॉन फिचर फिल्मला विभागुन पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्मात्या प्रियंका मोरे या आहेत तर दिग्दर्शक फराह खातून या आहेत.

स्पेशल मेन्शन या श्रेणीत 2 मराठी चित्रपटांना पुरस्कार जाहीर

स्पेशल मेन्शन या श्रेणीत ‘लता भगवान करे’ या मराठी सिनेमाच्या अभिनेत्री लता करे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याच श्रेणीत ‘पिकासो’ या सिनेमाला सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत वारंग हे आहेत. 

सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रटाचा पुरस्कार ‘अनु रूवड’ या सिनेमाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते  ओबो नोरी पिक्चर आहेत तर दिग्दर्शक दिलीप कुमार डोले हे आहेत. 

‘त्रिज्या’ या सिनेमाला  उत्कृष्ट ऑडीयोग्राफी (साऊंड डिजाइनर) चा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

चित्रपटांवरील उत्कृष्ट समिक्षात्मक पुस्तक या श्रेणीत  ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला   स्पेशल मेन्शन पुरस्कार प्राप्त झाला आहे.

फेरफारासाठी लाच स्वीकारणारा गंगाखेड तालुक्यातील वाघदरा मंडळ अधिकारी लटपटे व सरपंच गोविंद दत्तराव सानप ताब्यात...

फेरफारासाठी लाच स्वीकारणारा गंगाखेड तालुक्यातील वाघदरा मंडळ अधिकारी लटपटे व सरपंच गोविंद दत्तराव सानप ताब्यात...


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोर्टाकडून झालेल्या तडजोडीचा फेरफार वडील व चुलत्याच्या नावे लावण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या मंडळ अधिकार्‍यासह सरपंचास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.22) रंगेहात पकडले.
गंगाखेड तालुक्यातील वाघदरा शिवारातील आजोबांच्या नावाने असलेल्या जमिनीचा कोर्टाकडून झालेल्या तडजोडीचा फेरफार आपले वडील व चुलत्याच्या नावे लावून द्यावा, अशी विनंती राणीसावरगाव येथील मंडळ अधिकारी बालाजी संभाजी लटपटे यांच्याकडे तक्रारदाराने केली होती. मात्र, मंडळ अधिकारी लटपटे यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद न देता वाघदरा येथील सरपंच गोविंद दत्तराव सानप यांच्यामार्फत फेरफार करण्यासाठी 15 हजार रुपये लागतील, असा निरोप देत लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदारास लाच देणे योग्य वाटत नसल्याने त्यांनी परभणी येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे व पोलिस निरीक्षक अमोल कडू यांच्याकडे मंडळ अधिकार्‍याविरूध्द तक्रार केली. श्री. हुंबे व कडू यांनी कर्मचारी अनिल कटारे, अनिरूध्द कुलकर्णी, सचिन धबडगे, जमील जागीरदार, हनुमंते, शेख मुखीद, माणिक चट्टे, शेख मुख्तार, कदम, चौधरी, महिला पोलिस कर्मचारी दंडवते, महिला कर्मचारी सारिका टेहरे आदींच्या पथकाने सोमवारी लटलटे यांच्या निवासस्थानी गंगाखेड येथे सापळा लावला. तक्रारदार यांचे वाघदरा शिवारातील त्यांचे आजोबाच्या नावाने असलेला जमिनीचा कोर्टाकडून झालेला तडजोडीचा फेरफार त्यांचे वडीलांचे व चुलत्याच्या नावे लावण्यासाठी मंडळ अधिकारी बालाजी लटपटे, सरपंच गोविंद सानप यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी करून तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती 12 हजार 500 रुपये बालाजी लटपटे यांच्या गंगाखेडातील व्यंकटेशनरातील निवासस्थानी सरपंच गोविंद सानप यांच्या मार्फत स्वीकारले. लाचेच्या रकमेसह दोघांनाही लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच.;सोमवारी 315 व्यक्ती कोरोनाबाधीत, तिघांचा मृत्यू.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच.;सोमवारी 315 व्यक्ती कोरोनाबाधीत, तिघांचा मृत्यू.


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार उडू लागला असून सोमवारी (दि.22) तब्बल 315 कोरोनाबाधीत आढळले असून तिघा कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला. तर 45 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
रुग्णालयातील कक्षात 984 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 353 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 11 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 9 हजार 674 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 51 हजार 218 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 39 हजार 627 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 10 हजार 858 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 593 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.

वादळीवार्‍यासह पावसाची शक्यता.... हवामानशास्त्र विभाग ः मंगळवारी गारिपीटीचा अंदाज....

वादळीवार्‍यासह पावसाची शक्यता....
हवामानशास्त्र विभाग ः मंगळवारी गारिपीटीचा अंदाज....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणीसह हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यात वादळी वार्‍यासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याने सोमवारी (दि. 22) वर्तवली आहे.
दरम्यान, तापमान हळूहळू वाढू लागले आहे. सोमवारी सकाळचे तापसमान 19.2 अंश सेल्सीअसची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून दुपारचे 34 अंशाच्या आसपास तापमान राहू लागल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली. सद्यस्थितीत उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे रविवारी (दि.21) दिवसभर उन्हाचा तेवढा परिणाम जाणवला नाही. मात्र, उकाड्यात काहीशी वाढ झाली. 
परभणीसह हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यात येथे सोमवारी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी (दि.23) औरंगाबाद, जालना, बीड व हिंगोली  जिल्ह्यात  तुरळक ठिकाणी वादळीवारा, पावसासह वार्‍याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच लातूर, नांदेड, उस्मानाबाद तर परभणी जिल्ह्यात वादळीवर, पाऊस, वार्‍याचा वेग अधिक राहून गारपीटीची शक्यता आहे. बुधवारी (दि.24) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा,  विजांचा कडकडाट, पावसाची शक्यताही व्यक्त केली आहे.

जिल्हा बँक निवडणूक: उद्या कल्याण मंडपम्मध्ये मतमोजणी... उमेदवार, त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आदींची कल्याणमंडपम् येथे आरटीपीसीआर चाचणी......

जिल्हा बँक निवडणूक: उद्या कल्याण मंडपम्मध्ये मतमोजणी...
उमेदवार, त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आदींची कल्याणमंडपम् येथे आरटीपीसीआर चाचणी......



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मंगळवारी (दि.23) जायकवाडी वसाहत परिसरातील कल्याण मंडपम् येथे सकाळी आठपासून मतमोजणीस सुरवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, निरीक्षक शंकर बर्गे, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.
दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.22) मतमोजणीस उपस्थित राहणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांसह उमेदवार, त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आदींची कल्याणमंडपम् येथे आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी उपनिबंधक श्री. सुरवसे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी पुढाकार घेतला. उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी आरटीपीसीआर किंवा एंटीजन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन उपनिबंधक श्री. सुरवसे यांनी केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सात जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित 14 जागांसाठी रविवारी (दि.21) मतदान झाले. या मतदानाचा मतमोजणी मंगळवारी होणार आहे. मतदानानंतर सीलबंद मतमेट्या जायकवाडी वसाहतीजवळील कल्याण मंडपम् येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या. मंगळवारी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आठ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदारसंघाची तालुका निहाय मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीची प्रथम सुरवात ही प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्था या प्रमाणे पुढील मतदारसंघाची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी 54 मतमोजणी अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, निरीक्षक शंकर बर्गे, निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी दिली.

माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक - डॉ.गोखले ; सेंद्रीय खतनिर्मिती तंत्रज्ञान यावरील प्रशिक्षणाचे उदघाटन....

माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक - डॉ.गोखले ; सेंद्रीय खतनिर्मिती तंत्रज्ञान यावरील प्रशिक्षणाचे उदघाटन....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर अत्यंत आवश्यक असुन घरच्या घरी खत निर्मिती केल्यास कमी खर्चात खत उपलब्ध होईल. शेतकामात महिलांचाच मोठा वाटा असुन महिलांनी सेंद्रीय खत निर्मिती कौशल्य अवगत करून सेंद्रीय खत निर्मिती करावी, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी सोमवारी (दि.22) केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने  भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानीत मानव विकास अनुसूचित जाती उपयोजना प्रकल्पांतर्गत पाच दिवसीय सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञानावरील महिला प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर आयोजक प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, महिला आर्थिक विकास महामंडळच्या परभणी जिल्हा समन्वयक श्रीमती निता अंभोरे, डॉ प्रविण वैद्य, डॉ हेमंत देशपांडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी डॉ. धर्मराज गोखले म्हणाले, की शेतीत सेंद्रीय खतांचा वापर न करता केवळ रासायनिक खतांचा अति वापर केल्यामुळे दिवसेंदिवस मातीचे आरोग्य खालवत आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनातही घट येत आहे. माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर अत्यंत आवश्यक असुन घरच्या घरी खत निर्मिती केल्यास कमी खर्चात खत उपलब्ध होईल. शेतकामात महिलांचाच मोठा वाटा असुन महिलांनी सेंद्रीय खत निर्मिती कौशल्य अवगत करून सेंद्रीय खत निर्मिती करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
श्रीमती निता अंभोरे म्हणाल्या की, महिला बचत गटाच्या माध्यमातुन महिला सक्षम होत असुन शेती पुरक व्यवसायाचे कौशल्य अवगत करण्यासाठी सदरिल प्रशिक्षणाचा उपयोग होईल. महिलांनी शेती पुरक व्यवसाय सुरू करून आर्थिक समृध्दी साधावी.
प्रास्ताविकात डॉ. सय्यद ईस्माईल यांनी सेंद्रीय व गांडुळ खताचे महत्व सांगुन मातीच्या आरोग्यावरच मानवाचे आरोग्य अवलंबुन असल्याचे म्हणाले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञान पुस्तिकेचे विमोचन  करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ. अनिल धमक, डॉ रामप्रसाद खंदारे, डॉ. स्वाती झाडे, डॉ संतोष चिक्षे, स्नेहल शिलेवंत, शशीशेखर जावळे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणात ग्रामीण भागातील निवडक 20 अनुसूचित जातीच्या महिलांनी सहभाग नोंदविला आहे. दि.22 ते 26 मार्च या दरम्यान सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञानावरील महिला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sunday, March 21, 2021

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा- खासदार कुमार केतकर

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा- खासदार कुमार केतकर 




नवी दिल्ली / सोनपेठ (दर्शन) : -

रंगभूमी, साहित्य, चित्रपट,क्रीडा,सामाजिक व राजकीय घडामोडींचे केंद्र असलेली महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ ही देशाच्या सांस्कृतिक एकजुटीचा वारसा असल्याचे  प्रतिपादन,ज्येष्ठ पत्रकार तथा विद्यमान खासदार कुमार केतकर यांनी आज केले .
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राचा ‘मुंबई’ वारसा ’ या विषयावर श्री. केतकर बोलत होते. 

         मुंबईचे व्यक्तीमत्व प्रामुख्याने गिरणगाव आणि यातील रंगभूमीने नटलेले होते. महाराष्ट्राची  निर्मिती मुंबईसह व्हावी यासाठी १० ते १५ वर्षे प्रखर चळवळ झाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही शाहीर अमर शेख,अण्णाभाऊ साठे, गवाणकर यांच्या शाहिरीने नटलेली असल्याने त्याचेही संस्कार मुंबईतील गिरणगावावर होते, असे श्री केतकर म्हणाले. पुढे महाराष्ट्राची निर्मिती होवून मुंबई ही राज्याची राजधानी झाली आणि  मुंबईचे  चित्र झपाटयाने बदलत गेले.

गिरणगाव, गिरगाव, शिवाजी पार्क, पार्ला असे निरनिराळे सांस्कृतिक बेट मुंबईत तयार झाली होती. मुंबई ही सर्व भाषा, सर्व संस्कृती अशी सर्व समावेशक आहे. मुंबईचा वारसा हा मूलभूम मुल्यांवर आधारीत असल्यामुळे तो कायम टिकणारा असल्याचेही श्री केतकर यांनी सांगितले.  
                                            मुंबई व कामगार चळवळ
मराठी भाषेचा मोठा प्रभाव मुंबईच्या वातावरणावर होता. गिरण्यांच्या संबंधीत व्यवसायात लोक कामाला आले व मुंबईचे झाले. मुंबईच्या कामगार चळवळीचा संस्कार संबंध महाराष्ट्रावर होता. कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस.एम.जोशी, दत्ता देशमुख ,प्रबोधनकार ठाकरे यांचा प्रभाव सबंध महाराष्ट्रभर असे. हा प्रभाव आणि मुंबईचे वैशिष्टे महाराष्ट्रभर पसरविण्याचे कार्य आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’  दैनिकासह अन्य दैनिकांनी प्रभावीपणे केले.  

                                  मुंबईने जपली राष्ट्रीय एकात्मता
राष्ट्रीय एकात्मता जपण्यामध्ये महत्वाचे साधने असणा-या चित्रपट आणि क्रिकेट यांनी सबंध देशााला एकत्व प्राप्त करून दिले.भारतातील चित्रपटाचे केंद्र असलेल्या मुंबईतील हिंदी चित्रपट सृष्टीमुळे जनसामान्यांमध्ये भारलेले वातावरण असायचे. आजही मुंबईच्या चित्रपट सृष्टीचा भारतावर सांस्कृतिक प्रभाव कायम आहे. मुंबईने देशाला  क्रिकेटचा वारसा  देत सुनिल गावस्कर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर, दीलीप वेंसरकर आदी जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू  दिले असल्याचे श्री. केतकर म्हणाले.  

देशाच्या अर्थकारणाचे केंद्र मुंबई
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील दलाल स्ट्रीटचा आर्थिक प्रभाव हा उदारमतवादी आर्थिक धोरणाच्या आधी भांडवली अर्थव्यवस्थेवर पडत असे.  मुंबईतूनच कामगार आणि भांडवलदार अशा दोन्ही प्रवाहाचा प्रभाव देशभर होत असे. पुढे १९७० नंतर ठाणे ,विक्रोळी, भांडूप, बेलापूर परिसरात कारखाने आले व या शहाराला आर्थिक गती मिळाली. मुंबई बदलत गेली. संगणकाचे वर्चस्व वाढू लागले .येथील तरूणवर्ग आयआयटी कडे वळला. १९९० नंतर देशातील तरूण मोठया प्रमाणात परदेशात गेले आणि यात मुंबई आयआयटीतील ७० ते ८० टक्के तरूण होते.  
                               मुंबईने दिला सामाजिक एकत्वाचा वारसा 

मुंबईच्या जीवनात सामाजिक एकत्व निर्माण करण्याची ताकद आहे. ही ताकद देशभर पसरत गेली आणि यामुळे देशाचे एकत्व सिध्द होत गेले. कामगार चळवळीचा श्रीगणेशा मुंबईतूनच झाला. देशातील स्वातंत्र्य चळवळीचे सर्व महत्वाचे ठराव मुंबईतूनच झाले. इथेच कम्युनिस्ट चळवळ, समाजवादी चळवळ, शेतकरी कामगार चळवळी आदि चळवळी वाढल्या. मानवी हक्क, वेतन हक्क, कामारांच्या हक्कांचे केंद्रही मुंबईच आहे. हे सबंध मुंबईचे वैशिष्टे सर्वांना भारावून टाकणारे असल्याचे श्री केतकर यांनी प्रतिपादीत केले.

परभणी जिल्हा म.स.बँकेसाठी 98.73 टक्के मतदान.....

परभणी जिल्हा म.स.बँकेसाठी 98.73 टक्के मतदान.....

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवारी (दि 21) सकाळी आठ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत एक हजार 553 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
परभणी येथील मतदान केंद्रावर सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत 268 पैकी 267 मतदारांनी मतदान केले. जिंतूरात 140 पैकी 138, सेलूत 72 पैकी 72, पाथरीत 54 पैकी 53, मानवत 84 पैकी 83, सोनपेठात 53 पैकी 52, गंगाखेडात 133 पैकी 132, पालम 103 पैकी 101, पूर्णा 138 पैकी 138, हिंगोलीत 132 पैकी 129, सेनगाव 102 पैकी 94, औंढा नागनाथमध्ये 77 पैकी 77, वसमतमध्ये 114 पैकी 114 तर कळमनुरीत 103 पैकी 103 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एक हजार 573 पैकी एक हजार 553 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी 98.73 इतकी होते.अशी माहीती सा.सोनपेठ दर्शनला मंगेश सुरवसे निवडणूक निर्णय अधिकारी दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक म.परभणी यांनी दिली.

जिल्हा बँकेसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत 91.23 टक्के मतदान....

जिल्हा बँकेसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत 91.23 टक्के मतदान....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवारी (दि.21) दुपारी दोन वाजेपर्यंत एक हजार 435 मतदारांनी मतदाना हक्क बजावला.परभणी येथील मतदान केंद्रावर सकाळी आठ ते दोन या वेळेपर्यंत एकूण 235, जिंतूर 137, सेलू 71, पाथरी 51, मानवत 83, सोनपेठ 51, गंगाखेड 122, पालम 87, पूर्णा 134, हिंगोली 114, सेनगाव 70, औंढा 70, वसमत 111, कळमनुरी 95 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी 91.23 टक्के इतकी होते.

देशासाठी महाराष्ट्र सदैव दिशा दर्शक-ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे ; महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेची सुरुवात

देशासाठी महाराष्ट्र सदैव दिशा दर्शक-ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे ; महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेची सुरुवात 

नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन)    : -

सहकार, उद्योग आदी क्षेत्रात अग्रेसर असणा-या महाराष्ट्राने देशाला विविध महत्वाचे कायदे, योजना दिल्या असून सामाजिक व राजकीय दृष्टया महाराष्ट्राने भारत देशाला नेहमीच दिशा दिली आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी आज केले.
  महाराष्ट्र परिचय केंद्राने आयोजित केलेल्या महाराष्ट्र हीरक महोत्सवी व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफतांना ‘गेल्या ६० वर्षातील महाराष्ट्राचे समाजकारण  व राजकारण’ या विषयावर ते बोलत होते. 
भारत देशाला महाराष्ट्राने विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे सांगून आजचा महाराष्ट्र ‘शिव- फुले-शाहु-आंबेडकरांच्या’ कार्यावर व विचारांवर उभा आहे व पुढच्या काळातही राज्याला याच विचारवर वाटचाल करावी लागेल असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसे करावे याचा वस्तूपाठ घालून दिला तर आदर्श राज्यात जुनी जळमट फेकुन देण्याची शिकवण महात्मा फुले यांनी दिली.
  राज्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेसाठी कशा रितीने कार्य करायला हवे याची शिकवण छत्रपती शाहुंनी दिली. डॉ. बाबासहेब आंबेडकर यांनी या तिन्ही महापुरुषांच्या कार्यातून व विचारातून सांगितलेल्या गोष्टी राज्यघटनेत अंतर्भूत केल्या असून आधुनिक काळात हे विचार महाराष्ट्रासह देशाच्या सर्वसमावेशक विकासाला पुरक असल्याचे त्यांनी सांगितले. 
महाराष्ट्राने देशाले दिले महत्वपूर्ण योगदान छत्रपती शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागास व तळागाळातील जनतेसाठी २६ जुलै १९०२ रोजी ५० टक्के आरक्षणाचा कायदा केला. स्वातंत्र्यानंतर देशाने हेच आरक्षणाचे सूत्र स्विकारल्याचे दिसते असे डॉ. चोरमारे म्हणाले. १९७२ मध्ये राज्यातील दुष्काळाचा सामना करताना कष्टकरी जनतेच्या हाताला काम मिळावे  म्हणून  महाराष्ट्राने ‘रोजगार हमी योजना’ राबविली थोर नेते वि.स.पागे या योजनेचे जनक होत. त्याआधी १८९६- ९७ च्यापूढे कोल्हापूर संस्थानात पडलेल्या दुष्काळाच्या काळात छत्रपती शाहु महाराजांनी अशी योजना राबविली  होती. आता देशात ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना नावाने राबविली जाते.
  महाराष्ट्रानेच देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली. पुढे देश पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाच कायदा  झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री असताना सैन्यदलात पहिल्यांदा महिलांना प्रवेश  मिळाला असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ समाजकारण  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा पुढे ठेवून समोर आलेल्या प्रश्नांची उकल केली. आर्थिकदृष्टया महाराष्ट्र भक्कम करण्यासाठी त्यांनी सहकार क्षेत्राला ताकद दिली व पुढे देशालाही सहकाराचे महत्व पटले. 
 सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना यशवंतराव चव्हान यांनी  राज्यातील जातीवादी विषारी विचार समूळ नष्ट करण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत आंबेडकरी चळवळीचे महत्वाचे योगदान आहे. वेदना, नकार , विद्रोह या सूत्राच्या आधारे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारांच्या प्रकाशात ही चळवळ उभी राहिली. ही सामाजिक व सांस्कृतिक पातळीवरची चळवळ होती. या चळवळीने दलित उपेक्षित समाजाला आत्मभान दिल्याचे त्यांनी सांगितले.  
          सांस्कृतिक जोड असल्याशिवाय समाजकारणास भक्कम अधिष्टान प्राप्त होत नाही. बाबा आमटे, नानाजी देशमुख,अन्ना हजारे यांच्या सामाजिक कार्यातील योगदानावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला . बाबा आढवांनी  सुरु केलेली ‘एकगाव एक पानवठा’ ही समृध्द सामाजिक चळवळ होती. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी राबविलेली अंधश्रध्दा निर्मुलनाची चळवळ महाराष्ट्रातील महत्वाची चळवळ ठरल्याचे सांगत राज्यातील जादुटोणा विरोधी विधेयक यादृष्टीने महत्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. 
             अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील समाजकारण प्रगल्भ असून त्यास शिक्षणाची जोड असल्याचे त्यांनी सांगितले.कर्मवीर भाऊराव पाटील, बापुजी साळुंखे, पंजावबराव देशमुख आदींनी महाराष्ट्राच्या तळागाळात शिक्षणाची गंगा पोचवली. वसंतदादा पाटील यांच्या काळात महत्वाचे शिक्षण धोरण ठरले . परिणामी  राज्यात दर्जेदार शिक्षण देणा-या संस्था उभ्या राहिल्याचे त्यांनी सांगितले. 
  

Wednesday, March 17, 2021

प्रा.यशश्री बालासाहेब जगतकर हिचे पि. एच. डी. पुर्व परीक्षेत यश

प्रा.यशश्री बालासाहेब जगतकर हिचे पि. एच. डी. पुर्व परीक्षेत यश



परळी / सोनपेठ (दर्शन) :-

प्रा. यशश्री बालासाहेब जगतकर हीने पि.एच.डी.पुर्व परीक्षेत यश संपादण केले असुन ति साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा अध्यक्ष तक्षशिला बहुउददेशिय सेवा भावी संस्था परळी वै बालासाहेब जगतकर यांची मुलगी असुन तिने  पहील्या पेपर ला शंभर पैकी ८१ तर दुसर्या पेपर ला शंभर पैकी ६१ मार्क घेऊन पास झाली असुन तिने प्रा.सरवदे, प्रा.शरद रोडे, प्रा.पवार सर, रत्नाकर गुट्टे आय.टी.आय.काॅलेजचे प्राचार्य. शिरीष जगतकर व राहुल रतन जगतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले असुन तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येवुन पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील गोरेगावकर यांची सेनगावमधून बिनविरोध निवड ; वरपूडकर गटास सुखद धक्का......

ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील गोरेगावकर यांची सेनगावमधून बिनविरोध निवड ; वरपूडकर गटास सुखद धक्का......



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सेनगाव (जि. हिंगोली) सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र देशमुख यांचे नाव निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मतदार यादीतून बुधवारी (दि.17) वगळले आहे. त्यामुळे देशमुख यांची उमेदवारी आपोआप रद्दबातल ठरली असून ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.या निवडीने जेष्ठ नेते सुरेश वरपूडकर गटास सुखद धक्का बसला आहे.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिलासाशी बोलताना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्या संस्थेचे नाव मतदार यादीतून वगळले असल्याचे नमूद करीत गुरुवारी (दि.18) या संदर्भात अधिकृत आदेश काढला जाईल, असे स्पष्ट केले.
सेनगाव सोसायटीत गोरेगावकर यांच्यासह राजेंद्र देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. छाननीत देशमुख यांच्या अर्जावर आक्षेप दाखल झाला होता. त्याव्दारे देशमुख यांचा ठराव देणारी सहकारी संस्था ठराव करतेवेळी थकबाकीदार आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. परंतु नवडणूक निर्णय अधिकार्यांनी सकृतदर्शनी पुराव्याच्या आधारे त्यांचा आक्षेप फेटाळला. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिल्या गेले होते. खंडपीठानेही सकृतदर्शनी ठराव देणारी संस्था बेबाकीत आहे, असे स्पष्ट करीत तक्रारकर्त्याचा आक्षेप फेटाळला. त्याविरोधात हिम्मतराव खरवळ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.याचिका दाखल केली. 15 मार्च रोजी पटलावर याचिका आल्यानंतर सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्याने ठराव दाखल करतेवेळी देशमुख यांची संस्था थकबाकीदारच होती, असे निदर्शनास आणून त्या तारखेस थकबाकीदार असणाऱी संस्था मतदारयादीत पात्र कशी ठरू शकते ? असे म्हटले. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे हे म्हणणे ग्राह्य धरले. त्या तारखेत थकबाकीदार असणार्या संस्थेचा मतदारयादीत समावेश होऊ शकत नाही, असा न्यायालयाने निर्वाळा दिला. त्यामुळेच राजेंद्र देशमुख यांचा ठराव करणार्या संस्थेच्या मतदारयादीतील पात्रतेवरच गंडांतर कोसळले होते.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्णयाची प्रत जिल्हा निवडणूक अधिकार्यांना बुधवारी कार्यालयीन वेळेपर्यंत प्राप्त झाली. त्यापाठोपाठ निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठराव घेतलेल्या त्या संस्थेचे नाव मतदारयादीतून वगळले. पर्यायाने देशमुख यांची उमेदवारीच रद्दबातल झाली आहे. गुरुवारी या अनुषंगाने अधिकृत आदेश काढण्यात येणार आहेत.

पोलिस अधीक्षकांकडून सहा फौजदारांना नियुक्ती ; तुळशीदास फुलपगार यांची सोनपेठ पोलिस ठाण्यात

पोलिस अधीक्षकांकडून सहा फौजदारांना नियुक्ती ; तुळशीदास फुलपगार यांची सोनपेठ पोलिस ठाण्यात



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी फौजदारपदी पदोन्नती मिळालेल्या सहाही जणांना बुधवारी (दि.17) नियुक्तीचे आदेश दिले आहेत.फौजदार रमेश प्रभाकर लासीकर यांना पोलिस नियंत्रण कक्षात, रविंद्र शंकरराव दीपक यांची पोलिस मुख्यालयात, तुळशीदास शिवलिंग फुलपगार यांची सोनपेठ पोलिस ठाण्यात, लक्ष्मण रावजी मुरकूटे यांची नागरी हक्क संरक्षण विभागात, मंचक होणाजी फड यांची दैठणा पोलिस ठाण्यात तर राजेश रावणराव जाधव यांची पोलिस मुख्यालयात फौजदार म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी बुधवारी एका आदेशातून म्हटले आहे.

Tuesday, March 16, 2021

आयुष्यभर निष्ठेनं पत्रकारिता केलेल्या वरिष्ठ पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी निकष बदला एस.एम.देशमुख यांची मागणी

आयुष्यभर निष्ठेनं पत्रकारिता केलेल्या वरिष्ठ पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी निकष बदला एस.एम.देशमुख यांची मागणी



अलिबाग / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

आयुष्यभर निष्ठेने पत्रकारिता केलेल्या जास्तीत जास्त पत्रकारांना "बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजने"चा लाभ मिळावा यासाठी पत्रकार सन्मान योजनेच्या निकषात बदल करण्यात यावा आणि पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पात कायमस्वरूपी तरतूद करण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी केली.रायगड प्रेस क्लबचा पंधरावा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा नुकताच अलिबाग येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून देशमुख बोलत होते.देशमुख यांच्या मागणीवर बोलताना माहिती आणि जनसंपर्क मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार सन्मान योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र पत्रकारांना मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच रायगड जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे अत्याधुनिक माहिती भवन उभे करण्याची घोषणा आदिती तटकरे यांनी यावेळी केली.
पत्रकार सन्मान योजना सुरू व्हावी यासाठी आम्ही 20 वर्षे पाठपुरावा केला त्यानंतर सुरू झालेल्या सन्मान योजनेचा लाभ एक वर्षात केवळ 125 पत्रकारांनाच मिळत असेल तर ही योजना सुरू होऊन काही उपयोग नाही.तांत्रिक मुद्दे उपस्थित करून जर पात्र पत्रकारांचे अर्ज नाकारले जात असतील तर योजनेचे निकष बदलले पाहिजेत.तसेच ही योजना ठेवीतील व्याजातून न चालविता त्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद केली तरच जास्तीत जास्त पात्र पत्रकारांना योजनेचा लाभ देता येईल अशी मागणी देशमुख यांनी केली.राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय जर 58 वर्षांचे असेल तर पत्रकारांसाठी वयाची अट 60 का ? असा सवाल करून सन्मान योजनेसाठी वयाची अट शिथिल करून ती 58 करावी आणि अनुभवाचा कालावधी 25 वर्षांचा करावा अशी मागणीही देशमुख यांनी केली.ज्या पत्रकारांकडे सलग 30-35 वर्षे अधिस्वीकृती पत्रिका आहे त्यापत्रकारांक़डे अन्य पुरावे मागून त्यांची अडवणूक आणि छळवणूक करू नका अशी विनंती  त्यांनी केली.पंढरीनाथ सावंत ,नवीन सोष्टे यांच्यासारख्या अनेक पत्रकारांकडे जुनी कागदपत्रे नाहीत,छोटया दैनिकात काम करणार्‍या पत्रकार,संपादकांची देखील हीच अडचण आहे,याचा अर्थ ते पत्रकार नाहीत असा होत नाही.अशा स्थितीत जिल्हा माहिती अधिकार्‍यांमार्फत त्यांच्या पात्रतेची शहानिशा केली जावी अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.देशमुख म्हणाले,काही अपात्र पत्रकारांनी चुकीची कागदपत्रे दाखल करून सन्मान योजनेचे लाभ लाटले आहेत अशा लाभार्थ्यांची चौकशी होऊन त्यात चुकीचे आढळले तर त्यांची पेन्शन थांबवावी .देशमुख पुढे म्हणाले,पत्रकारांशी संबंधित अधिस्वीकृती समितीसह अन्य समित्यां गेली 3-4 वर्षे अस्तित्वातच नाहीत त्यामुळे तातडीने सर्व समित्यांचे पुनर्रगठण करण्यात यावे.
आपल्या भाषणात आदिती तटकरे यांनी देशमुख यांच्या सर्वच मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत,जास्तीत जास्त पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या मतांचे आम्ही आहोत त्यात नियमांचा अडसर असेल तर त्यात बदल करावे लागतील त्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले.सन्मान योजनेची बजेटमध्ये तरतूद झाली तर अधिक पत्रकारांना लाभ मिळेल हे खरे आहे त्यासाठी देखील प्रयत्न केले जातील,तसेच अधिस्वीकृती समितीचे पुनर्रगठण पुढील एक महिन्यात करण्यात येईल असे आश्‍वासन आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी समितीचे काम नियमानुसार चालते,असे स्पष्ट करून देशमुख यांनी केलेल्या मागणीनुसार निकष बदलले तर नक्कीच जास्तीत जास्त पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ होईल असे स्पष्ट केले.हेतुपुरस्सर कोणत्याही पत्रकारावर अन्याय केला जात नसल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार यांनी सन्मान योजनेचा लाभ जास्तीत जास्त पत्रकारांना मिळाला पाहिजे अशी आग्रङी मागणी केली.तसेच पत्रकार आणि माहिती जनसंपर्क विभागाचा समन्वय पुर्वी सारखा राहिला नसल्याची खंतही त्यानी व्यक्त केली.यावेळी न्यूज 24 चे महाराष्ट्र विभागाचे संपादक विनोद जगदाळे यांना आदिती तटकरे यांच्या हस्ते आचार्य अत्रे युवा  संपादक पुरस्काराने सन्माननित करण्यात आले तसेच वरिष्ठ छायाचित्रकार वामन पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.यावेळी रायगड जिल्हयातील ंपंधरा पत्रकारांना विविध पुरस्कारानी सन्मानित केले गेले.कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी,कोकण विभागीय सचिव विजय मोकल,माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,दीपक रानवडे,वरिष्ठ पत्रकार शोभना देशमुख आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यानी केले तर आभाऱ प्रदर्शन शशिकांत मोरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी मानसी चेऊलकर,अभय आपटे,भारत रांजनकर,मोहन जाधव आणि इतरांनी विशेष मेहनत घेतली.रायगड प्रेस क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष भारत राजनकर यांचा यावेळी आदिती तटकरे .एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Monday, March 15, 2021

सोनपेठ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुभाष सुरवसे तर सचिवपदी प्रा.डाॅ.संतोष रणखांब

सोनपेठ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुभाष सुरवसे तर सचिवपदी प्रा.डाॅ.संतोष रणखांब 



सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सोनपेठ तालुका कार्यकारिणी सोमवार दिनांक १५ मार्च रोजी निवडण्यात आली.यावेळी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दै.लोकमतचे तालुका प्रतिनीधी सुभाष सुरवसे तर सचिवपदी प्रा.डाॅ.संतोष रणखांब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.येथील तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सहसचिव गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.यावेळी मार्गदर्शक म्हणुन संपादक किरण स्वामी, कार्याध्यक्षपदि राधेश्याम वर्मा, उपाध्यक्षपदी राजेभाऊ बचाटे, कोषाध्यक्षपदी श्रीराम जाधव, सहसचिवपदी उमेश मुळे यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी जिल्हा कार्यकारीणीचे संपादक किरण स्वामी यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित पत्रकारांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ध्येयधोरणे व आगामी काळात पत्रकारांसाठी करावयाची वेगवेगळी कामे याबाबत चर्चा केली.कार्यक्रमा दरम्यान परभणी येते होत असलेल्या विभागीय मेळाव्याची देखील तयारी कशा पध्दतीने करावयाची याबाबत सविस्तर चर्चा झाली.या कार्यकारीणीमध्ये सदस्य म्हणुन पत्रकार सदस्य म्हणुन पद्माकर मुजमुले, आकाश सावंत, तुकाराम यादव, धोडीराम शिंदे, तुकाराम शिंदे, हरीभाऊ डाके, राजेश्वर गलांडे, प्रा.डाॅ.बापुराव आंधळे यांच्यासह आदी पत्रकार असणार आहेत.यावेळी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचे व कार्यकारणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.