शेतकरी कुटुंबातील विजयकुमार सोळंके श्री महालिंगेश्वर विद्यालयाचा विध्यार्थी झाला सहाय्यक कमांडंट
ताडकळस येथून जवळच असलेल्या बानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व सामान्य शेतकरी कुटुंबातील विजयकुमार मनोहर सोळंके हे जिद्द व कठोर परिश्रमाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सहाय्यक कमाडट (केंद्रीय पोलिस उपअधिक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्त) देशातुन 141 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.पालम तालुक्यातील छोट्याश्या कांजळगाव येथील रहिवासी असलेले विजयकुमार सोंळके यांचे सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामाच्या गावी म्हणजेच बानेगाव (ता.पुर्णा) येथे झाले तर माध्यमिक शिक्षण विटा व सोनपेठ येथील श्री महालींगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी यावेळी ते सागतात माझे गुरु मुख्याध्यापक माणिकआप्पा निलंगे सर व मार्गदर्शक गुरु विरेश कडगे सर होते तर नांदेड येथील सायन्स कॉलेज मध्ये बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्या नंतर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे बी. फार्मसी पदवी मिळवली. त्या नंतर पुणे येथे यु .पी. एस .सी परीक्षेची तयारी सुरू होती.त्यातच 2019 मध्ये झालेल्या यू .पी .एस. सी परीक्षेत त्यांनी घवघवीतपणे यश संपादन केले व 15 नोव्हेंबर 2020 रोजी परीक्षेचा अंतिम टप्पा मुलाखत प्रक्रिया पार पाडली . या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात विजयकुमार सोळंके हे देशातुन 142 व्या क्रमांकाने यशस्वी झाले असुन त्यांची सहाय्यक कमाडंट पदी निवड झाली आहे . त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.दरम्यान बानेगाव येथील जि.प.प्राशाला व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.परभणी जिल्हाधिकारी, परभणी पोलिस अधिक्षक तसेच मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर आदिंनीही सत्कार करुन विजयकुमार सोळंके यांना पुढिल वाटचालीस सर्वस्तरातुन तसेच मित्र परीवारातुन शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.




No comments:
Post a Comment