पोलिस अधिकारी, कर्मचार्यांचा उपमहानिरीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव.....
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते शनिवारी (दि.27) जिल्हा पोलिस दलातील अधिकारी - कर्मचार्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह अन्य अधिकार्यांची यावेळी उपस्थिती होती.
विशेष पोलिस उपमहानिरीक्षक श्री. तांबोळी हे वार्षिक तपासणीनिमित्त जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शहरातील नवामोंढा पोलिस ठाण्याची शुक्रवारी (दि.26) त्यांनी वार्षिक तपासणी केली. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयातील विक्रांत स्पोर्टस मैदानासह अत्याधुनिक जीमचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण पोलिस ठाण्यातील व्हॉलीबॉल मैदानाचेही उद्घाटन श्री. तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा पोलिस दलातील उत्कृष्ट कार्य करणार्या अधिकारी - कर्मचार्यांसह पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचार्यांना शनिवारी श्री.तांबोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात फौजदार चंद्रकांत साखरे, सहाय्यक फौजदार श्याम अंबेकर, कर्मचारी शेख रौनक शेख खाजामिया, ग्यानदेव बेंबडे, रघुवीर देशपांडे यांचा बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर ग्राम पंचायत निवडणूक संदर्भाने निवडणूक सेलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कर्मचारी सुनील गरुड, जरार अहमद जुल्फेखार अहेमद, सुरेखा घोगरे, संतोष व्यवहारे, राजेश जटाळ, अमर चाऊस यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय मोटर परिवहन पर्यवेक्षक सय्यद साजिद हुसैन, मोहमद हेरेस मोहमद युसूफ अन्सारी, पोलिस निरीक्षक रमाकांत बनसोडे, उमेश पाटील, राखीव पोलिस निरीक्षक रविंद्र दामोदर, राखीव फौजदार शामलाल राठोड यांचाही विशेष पोलिस उपमहानिरीक्षक श्री. तांबोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या शिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेतील आशा देशपांडे, ग्रिष्मा कदम, अस्थापना शाखेतील दिलीप सावंत, पत्रव्यवहार शाखेतील देवदत्त पवार, विभागीय चौकशी शाखेतील ओमप्रकाश कोटरवार, प्रबंधक अनंता गमे, पत्रव्यवहार शाखेतील, श्रीकृष्ण सोमवंशी, दीपक गजभार, संतोष भोसले, पल्लवी देशमुख, गोविंद फुफाटे, रुपा कासेवाड, कविता गुट्टे, गंगाधर होले, रविंद्र आसोरे, मीरा केंद्रे, गुलाब बुक्तरे, प्रवीण वायाण, दिपाली पाटील, विठ्ठल बोबडे, नाजिया शेख, अशोक शिंदे, राजेश गायकवाड, समीर शेख आदींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

No comments:
Post a Comment