Tuesday, February 2, 2021

प्रा.डॉ.आत्माराम टेकाळे यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता...

प्रा.डॉ.आत्माराम टेकाळे यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता...



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद यांच्या मार्फत श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. आत्माराम टेकाळे यांना शारीरिक शिक्षण विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे.
सन 2008 मध्ये त्यांनी आपले एम. फिल. भारतीयार विद्यापीठ कोईमतुर येथून पूर्ण केले व संशोधनाची खरी सुरुवात केली असे म्हणता येईल. सन 2009 मध्ये प्राचार्य डॉ. भागवत कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शारीरिक शिक्षण या विषयात पी.एचडी. चे संशोधन कार्य सुरू केले आणि सन एक ऑक्टोबर 2013 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून त्यांना पी.एचडी. प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदांमधून शोधनिबंधाचे वाचन त्यांनी केले आहे. अनेक शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित झाले आहेत, तसेच आतापर्यंत एक पुस्तक प्रकाशित झाले आहे.आता संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्यासाठी नवे दालन खुले झाल्यामुळे  पंडित गुरु पार्डीकर  महाविद्यालयचे अध्यक्ष माजी आमदार व्यंकटराव कदम, प्रा. डॉ. भागवत कटारे, प्राचार्य डॉ. एच.पी.कदम, प्रा. डॉ. एम बी धोंडगे (अधीसभा सदस्य), प्रा.डॉ. व्ही. आर. भोसले आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment