Tuesday, February 9, 2021


जाहीर सूचना !

जाहीर सूचना !!

जाहीर सूचना !!!

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती,सोनपेठ

ता.सोनपेठ जि.परभणी

दिनांक 15 फेब्रुवारी 2021

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती,सोनपेठच्या कार्यक्षेत्रातील सर्व आडते (अ) वर्ग व्यापारी (ब) वर्ग व्यापारी (क) वर्ग व्यापारी (ड) वर्ग व्यापारी शहर व खेडे विभाग प्रकीयाकार, हमाल, मापाडी, मदतनीस, सर्व्हेअर, वखार महामंडळ, बी- बियाणे व्यापारी, स्वस्त धान्य दुकानदार, गाडी वाहक इत्यादींना या जाहिरातीद्वारे सूचित केले जाते कि. सर्व संबंधितानी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विनियमन) नियम 1967 च्या नियम 6 पोटनियम 5 (अ) व नियम 7 च्या पोटनियम 2 (अ) नुसार दिनांक 28 / 2 / 2021 अखेर बाजार समितीचे लायसन्स ( परवाना) नुतनीकरण करून घेणे आवश्यक आहे.


तरी सर्व संबंधितानी वर्ष 2021 / 2022 या वर्षासाठी ठराविक फॉर्मची पूर्तता करून व्यवहारानुसार नियमाप्रमाणे फिस भरून पावती हस्तगत करावी. दिनांक 28/ 2 / 2021 नंतर व्यवहार करणाच्या व्यापान्यांना विलंब शुल्क शेकडा 10 रुपये व अर्जासाठी 1 रुपया असे एकून 11 प्रतिदिन दिनांक 31 / 3 / 2021 पर्यंत भरावा लागेल. दिनांक 31/ 3 / 2021 नंतर लायसन्स (परवाना) न घेता व्यवहार करणार्या विरुद्ध कायदा कलम (46) प्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. संबंधितानी याची नोंद घ्यावी.

 लायसन्ससाठी खालील प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करावी.

1) (अ) लायसन्स मिळण्याकरता अर्ज (ब) पतदारीचे प्रमाणपत्र ( क) रोख तारण किंवा बँकिचे किंवा अन्य इमारतीचे हमीपत्र (ड)सुरक्षा (अनामत) ठेव रोख बँक गॅरंटी इत्यादी कागदपत्रे.

2) लायसन्ससाठी लागणारे आवश्यक ती माहिती व फॉर्म (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत मिळतील.

3) बाजार फिस, सुपरव्हिजन फिस व गाळे / भूखंड किराया इत्यादी थकबाकीदारांचे लायसन्स नुतनीकरण केले जाणार नाहीत.

4) भागीदार असल्यास त्यांची खरी नक्कल दिल्याशिवाय भागीदारी ग्राह्य धरल्या जाणार नाही.

तरी दिनांक 31 / 3 / 2021 नंतर कुठल्याच प्रकारची तक्रार ऐकल्या जाणार नाही.

नोट - वर्ष 2021 - 2022 चा परवाना तथा नुतनीकरण करू इच्छिणाऱ्या संबंधितानी प्रत्यक्ष कार्यालयात येवून रक्कमेसह संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी.त्या शिवाय परवाना दिला जाणार नाही.याची नोंद घ्यावी.

प्र.सचिव

अशोक श्रीहरी गवळी

उपसभापती

सौ.मीना दशरथराव सूर्यवंशी

सभापती

श्री राजेश उत्तमराव विटेकर

सन्माननीय संचालक मंडळ, सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती,सोनपेठ

ता.सोनपेठ जि.परभणी


No comments:

Post a Comment