सोनपेठ शहरात अस्वच्छ पाणी,बंद पथदिवे व स्वच्छता बाबत जिल्हाधिकारी यांना पँथर आर्मीचे निवेदन
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरास नळाव्दारे सोडत असलेले अस्वच्छ पाणी, दहिखेड प्रभागात अस्ताव्यस्त पडलेला कचरा व सोनखेड कडे जाणाऱ्या रोडवर बंद पडलेले पथदिवे, या बाबतीत सोनपेठ न.प.प्रशासनास आदेशित करण्या बाबत मा.जिल्हाकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय,परभणी,यांना निवेदन देऊन त्यामध्ये दिनांक :- 9 फेब्रुवारी 2021 बुधवार रोजी वरिल विषयास आपल्या सेवेत निवेदन सादर करण्यात येते की, सध्या सोनपेठ शहरात नगर परिषद सोडत असलेले अस्वच्छ पाणी नागरीकांच्या आरोग्यास अपायकारक आहे. सोनपेठ शहरास स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा म्हणून वाटर फिल्टर यंत्रणा मंजुर करून कार्यान्वीत केली असतांना सुध्दा ती बंद आवस्थेत आहे असे वाटते.त्यामुळे न.प.यांचे वॉटर फिल्टर कडे दुर्लक्ष आहे.त्यामुळे नागरीकांना नळाव्दारे दुषित पाणी येत असल्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. सोनपेठ नगर परिषद स्वच्छता अभियांना अंतर्गत 95 या क्रमांकावर आहे. परंतु दहिखेड प्रभागात कचरा अस्थाव्यस्थ पडलेला आहे. सोशल मिडिया द्वारे प्रसिध्दी करूनही कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही.कागदा वरच सोनपेठ नगर परिषद 95 या क्रमांकावर कशी काय ? हेच समजत नाही.सोनखेड रोडवर पथदिवे हे अर्धे चालू आहेत आणि अर्धे बंद आवस्थेत आहेत.त्यामुळे रात्री अंधार पडतो, या वरिल बाबीवर सदरील नगर परिषदेस वरिल समस्या सोडविण्यासाठी आदेशित करावे अशी विनंती केलेली आहे, आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की, नागरीकांच्या आरोग्या बाबत वरिल प्रश्नी आदेशीत करून नागरीकांना न्याय देवून संघटनेस सहकार्य करावे आशी ही विनंती केली आहे.निवेदनावर आशिष भैय्या मुंढे (पँथर आर्मी महाराष्ट्र राज्य महासचिव),अनिकेत साळवे (परभणी शहर युवाध्यक्ष),विकास काळे (शहर कार्याध्यक्ष),आदित्य काळे (परभणी शहराध्यक्ष),दिपक कांबळे (पुर्णा तालुकाध्यक्ष) आदिंच्या स्वाक्षरी आहेत.
सा.सोनपेठ दर्शन आपल्या पंचक्रोशितील बातम्या व जाहीरातीसाठी संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
एकदा भेटाल परत-परत भेटाल...........!
नोट :- एका मिनीटात आटकेपार फक्त सा.सोनपेठ दर्शन आँनलाईन लिंक व्दारे तसेच जाहीरात ही वृतपत्रा सोबत सोशल मिडिया वाट्सप,फेसबुक,इन्स्टाग्राम व ट्युटर वरती देखील.
पहीले इस्तमाल करे फिर विश्वास करे.......!


No comments:
Post a Comment