सोनपेठ प्रीमियर लीग 2021 क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या शुभहस्ते बॅट-बॉल टोलवून करण्यात आले तर नाणे फेक माजी आमदार व्यंकटराव कदम यांच्या शुभहस्ते करून क्रिकेट सामन्याची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी उपस्थित दत्तराव कदम, सुमित पवार, डॉ.अमोल चव्हाण, नगरसेवक अमृत स्वामी, सुनील बर्वे, पत्रकार राधेश्याम वर्मा, किरण स्वामी मान्यवरांचे स्वागत सोनपेठ प्रिमियम सदस्य सागर टाक, जावेद शेख, महेश झिरपे, समीर अन्सारी, भागवत कदम, बाबा सोन्नर, राहुल साठे, संजय ढवळे,दिनेश जाधव, अस्लम शेख, गजानन देवरे, आसिफ शेख, झुबेर पठाण, कल्याण काकडे व अशोक भुसारे यांनी केले.दररोज चार सामने खेळवले जाणार असल्याची माहिती अक्षय कदम यांनी दिली.प्रामुख्याने या आठ टीम मध्ये सुमित भैय्या पवार, खदीर भाई अन्सारी, बालाजी पदमवार, डॉ.अमोल चव्हाण,अक्षय कदम व शहाजी कदम आदींच्या टिमने सहभाग नोंदविला आहे.


No comments:
Post a Comment