सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील मौजे नरवाडी येथिल बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नरवाडी ता.सोनपेठ जि.परभणी यांना मानव विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, गुरधाळ ता.देवणी जि. लातूर या संस्थेचा सरांच्या शैक्षणिक , सामाजिक , राज्यस्तरीय कार्याची दखल घेऊन "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक" पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सरांचे सर्व विद्यार्थी मित्रांकडून,नरवाडी येथील ग्रामस्थाकडून कौतुक होत आहे ...... ! सरांनी हा पुरस्कार त्यांना एकट्याला मिळालेला नसून सर्व विद्यार्थी मित्रांना,पालकांना,नरवाडी येथील ग्रामस्थांना ,सर्व शिक्षक मित्रांना तसेच आदरणीय गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण साहेबांना व सर्व कोरोना योद्ध्यांना मिळालेला पुरस्कार आहे असे नम्रता पूर्वक जाहिर केले.पुरस्काराचे वितरण पद्मश्री पुरस्कार प्राप्त तसेच अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते वितरीत होणार आहे . बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे सरांच्या कार्याची यथोचित दखल घेतल्या बद्दल सरांचे व मानव विकास बहुउद्देशिय सेवाभावी संस्था गुरधाळ यांचे सर्व स्तरातून कौतूक होताना दिसत आहे.


No comments:
Post a Comment