Tuesday, February 2, 2021

सत्तेतून पैसा आणि पैश्यातुन सत्ता हे सुत्र बदलून टाकू- सौरभ दादा खेडेकर


सत्तेतून पैसा आणि पैश्यातुन सत्ता हे सुत्र बदलून टाकू- सौरभ दादा खेडेकर

परळी / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

2 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांचा परळी वैजनाथ चा दौरा चांगलाच गाजला.जलालपुर भागांत पक्ष कार्यालयाचे उदघाटन सौरभ दादा खेडेकर यांच्या हस्ते झाले.त्यानंतर शहरातील लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात कोविडचे नियम पाळत जंगी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवश्री प्रा.एम.एल.देशमुख,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री डॉ.बालाजी जाधव,प्रमुख अतिथी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.भास्कर निर्मळ,प्रमुख अतिथी संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक शिवश्री शशिकांत कन्हेरे,प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेड बीड पूर्व जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे,संभाजी ब्रिगेड बीड मध्य जिल्हाध्यक्ष विजय दराडे,संभाजी ब्रिगेड बीड पश्चिम जिल्हाध्यक्ष महेंद्र मोरे,संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष राहुल वायकर आदींची प्रमुख उपस्थीती होती.
याप्रसंगी बोलताना संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांनी कार्यकत्यात आपल्या भाषणाने नवीन उत्साह भरला.स्थानिक पातळीवर संभाजी ब्रिगेडने सर्वजणांना सोबत घेऊन सामाजिक व राजकीय प्रश्न सोडवावेत असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला. तसेच,मराठा आरक्षणाबाबत बोलताना खेडेकर म्हणाले की गेल्या 25 वर्षांपासून संभाजी ब्रिगेड मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याशी प्रयत्नरत आहे.मराठा समाजाने इतर नेत्यांना प्रश्न विचारण्याऐवजी मराठा नेत्यांना प्रश्न विचारावे लागतील.ना.धनंजय मुंडे यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाबाबत पक्ष प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी एक पोस्ट लिहून ना.धनंजय मुंडेंसारखे मेहनतीने उभे राहिलेले संघर्षशील बहुजन नेतृत्व सदाशिव पेठीय पद्धतीने निर्णय घेऊन कोणी संपऊ इच्छित असेल तर त्याला आमचा विरोध आहे.प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तूर्तास संयम दाखवणे आवश्यक आहे.मात्र,राजकीय पक्ष म्हणून आमचा अशा गोष्टींना विरोध असेल.सत्तेतून पैसा आणि पैश्यातुन सत्ता हे सुत्र आता बदलून टाकू अशी भूमिका सौरभ दादा खेडेकर यांनी मांडली.मराठा सेवा संघाचे दक्षिण भारत प्रभारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.एम.एल.देशमुख यांनी संभाजी ब्रिगेड यापुढे स्थानिक पातळी ते देशपातळीवर प्रस्थापित राजकीय पक्षांना खंबीरपणे पर्याय म्हणून उभा राहील असा आशावाद व्यक्त केला.संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक, प्रवक्ते आणि प्रसिद्ध वक्ते प्रा.बालाजी जाधव यांनी एका चॉकलेटने मॅनेज होणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना नाही.आमचे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत.बेगडी असण्यापेक्षा ब्रिगेडी असणं कधीही चांगलं.खरं बोलण्यापेक्षा बरं बोलणं ही रीत असण्याच्या जगात ब्रिगेड खरंच बोलते.परळीच्या चार दोन गावगुंडांच्या दहशतीला भीक घालू नका, संभाजी ब्रिगेड आपल्यासाठी सदैव उभी असेल.आगामी नगर परिषदेत परळी वैजनाथ पालिकेत संभाजी ब्रिगेड आपला झेंडा नक्की फडकवेल.असे मनोगत यावेळी व्यक्त केले.याप्रसंगी प्रस्तावीक सेवकराम जाधव,मनोगत प्रा.भास्कर निर्मळ वदेवराव लुगडे महाराज यांनी व्यक्य करुन सुत्रसंचालन व आभार संजय सुरवसे सर व मिनाक्षी जाधव यांनी प्रदर्शन केले.



No comments:

Post a Comment