प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अर्चना ढमढेरे यांना पंचकर्म महर्षि गोगाटे स्मृती पुरस्कार प्रदान...
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथील प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सौ. अर्चना पंकज ढमढेरे यांना पंचकर्म महर्षि त्र्यं. म. गोगाटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.आरोग्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार पंचकर्म शिरोमणी वैद्य प्रवीण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. राजीव मंदाने, डॉ. अलोक गुप्ता, विवेकानंद प्रतिष्ठानचे स्वामी चेतनानंद, डॉ. संजय रत्नपारखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.राज्यातील 12 वैद्यांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान होत आला आहे. समका आयुर्वेद प्रतिष्ठानचे संचालक डॉ.पंकज पवार (यवतमाळ) व धन्वंतरी संस्था वर्धा, डॉ. नितीन मेश्कार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
डॉ. अर्चना ढमढेरे यांचे 20 वर्षांपासून आयुर्वेद व पंचकर्म क्षेत्रातील काम, स्त्रीरोगावरील विशेष काम याचा विचार करून हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. परभणीतील पहिले अत्याधुनिक महिलांसाठी फिटनेस सेंटर व आयुर्वेद पंचकर्म क्लीनीक गेल्या 20 वर्षापुर्वी डॉ. अर्चना ढमढेरे यांनी सुरू केले. कोरोनाच्या या आपत्तीत साडेतीन हजारहून अधिक व्यक्तींना आयुर्वैदामृत काढा उपलब्ध करून दिला. तसेच आयुर्वैदाचे सुरक्षा कवच कसे महत्वपूर्ण आहे, हे पटवून दिले. आयुर्वैदेचा प्रचार आणि प्रसाराकरिता अनेक उपक्रमसुध्दा त्यांनी राबविले.दरम्यान,डॉ.अर्चना ढमढेरे यांचे विविध संस्था,संघटनांच्या पदाधिकार्यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले आहे.

No comments:
Post a Comment