Monday, February 15, 2021

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या मराठवाडा विभागीय संघटक पदी संतोष स्वामी यांची निवड - अभिनंदन


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या मराठवाडा विभागीय संघटक पदी संतोष स्वामी यांची निवड - अभिनंदन 




बीड / परभणी / सोनपेठ  (दर्शन) :- 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई च्या मराठवाडा विभागीय संघटकपदी संतोष स्वामी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मान्यतेने माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड या ग्रामीण
भागातील धडाडीचे पत्रकार तथा सोशल मिडीया उत्कृष्टपणे हाताळणारे संतोष बाबुराव स्वामी (खटाळ) यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीने मराठवाडा स्तरावर पत्रकार संघाच्या संघटन बांधणी मध्ये क्रियाशील पत्रकारांची निश्चितपणे भर पडणार आहे.या निवडीबद्दल पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी व सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने अभिनंदन केले असुन पुढील कार्यासाठी सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment