Friday, February 12, 2021

परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा परिवहन अधिकाऱ्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा परिवहन अधिकाऱ्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
   

       
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
              
परभणी येथील आरटीओ कार्यालयात अनधिकृत व्यक्तीची माहिती देण्यासाठी गेलेल्या पत्रकारांस अवमानकारक व धमकावनीची भाषा करणाऱ्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्याची तक्रार जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.या बाबत माहिती अशी की परभणी शहरातील आरटीओ कार्यलयात एजंट आणि अनधिकृत व्यक्तीचा वावर वाढला आहे या बाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार धाराजी भुसारे हे आरटीओ यांच्या कक्षात गेले असता त्या ठिकाणी आरटीओ यांनी भुसारे यांच्याशी अवमानकारक भाषा वापरून धमकावणीची  भाषा वापरली त्यामुळे भुसारे यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले या बाबत चौकशी करावी तसेच या कार्यलयात कुठलेही शासकीय पद नसताना टेबल वर फाईल हाताळणाऱ्या अनधिकृत व्यक्तीची चौकशी करावी अशी मागणी केली त्यावर आरटीओ यांची चोकशी करण्याचे आश्वासन मा जिल्हाधिकारी यांनी पत्रकार संघाच्या पदाधिकार्यना दिले या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुरेश नाईकवाडे, सूरज कदम,प्रवीण देशपांडे, लक्ष्मण मानोलीकर ,लक्ष्मीकांत बनसोडे, धाराजी भुसारे,आबासाहेब कड पाटील,विजय चट्टे,गोपीराज जावळे,राजू कर्डीले,अमर गालफाडे,संजय घनसावंत,सय्यद जमील, नदीम सिद्दीकी आदी पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment