Thursday, February 11, 2021

अ.भा.वीरशैव लिंगायत महासंघाच्या पुरस्कारांचा ९वा वर्धापनदिन साजरा ; पत्रकार परमेश्वर लांडगे व संतोष स्वामींना साहित्यरत्न पुरस्कार तर सुभाषअप्पा नित्रुडकर यांचा गौरव

अ.भा.वीरशैव लिंगायत महासंघाच्या पुरस्कारांचा ९वा वर्धापनदिन साजरा ; पत्रकार परमेश्वर लांडगे व संतोष स्वामींना साहित्यरत्न पुरस्कार तर सुभाषअप्पा नित्रुडकर यांचा गौरव



कोल्हापूर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर येथे नुकताच साजरा करण्यात आला. या अनुषंगाने वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी वाहुन घेतलेल्या अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार, त्याच बरोबर विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणार्‍या वीरशैव समाजातील 12 मान्यवरांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महासंघाच्या वतीने दिल्या जाणार्‍या या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी मराठवाड्यातील चौघांची निवड करण्यात आली होती.अहमदपूरच्या भक्तिस्थळाचे अध्यक्ष आणि प्रशासकीय अधिकारी रामदास पाटील, औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रूग्णालयाचे डॉ.महेश रेवाडकर, पत्रकार परमेश्वर लांडगे आणि पत्रकार संतोष स्वामी यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले.तर नवनियुक्त मराठवाडा अध्यक्ष सुभाषअप्पा नित्रुडकर यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्याला प.पू.डॉ.निळकंठ शिवाचार्य धारेश्वरकर,प.पू.डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधामकर,प.पू.श्रीगुरू महादेव शिवाचार्य महाराज वाईकर,वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर,प.पू.डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर आदी शिवाचार्यांसह वस्त्रोद्योग महासंघाचे राज्याध्यक्ष अशोक स्वामी,सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पालघर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दराम सालिमठ, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ,इचलकरंजी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी,औरंगाबाद म्हाडा माजी सभापती संजय केणेकर,अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ अध्यक्ष भिवलिंग स्वामी,कार्याध्यक्ष विजय जंगम,महिला प्रदेश अध्यक्षा विद्याताई जंगम,करुणाताई स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. जन्मतः हिंदू म्हणून नोंद असलेल्या वीरशैव समाजाला येत्या जनगणना नोंदणी प्रसंगी काही अपप्रवृत्ती लिंगायत धर्म म्हणून नोंद करण्यासाठी चुकीचे अवाहन करत आहेत.या अपप्रवृत्तींच्या विरोधात या मेळाव्याच्या माध्यमातून एल्गार करत हिंदू म्हणून जन्मलो आहोत हिंदू म्हणूनच मरणार असल्याचा सुर उमटत होता.शिवाचार्यांवर होणाऱ्या हल्यांचा निषेध करत येत्या काळात समाजबांधवांनी समाज विदोषी लोकांविरुद्ध एक होत लढा देणे गरजेचे असल्याचे मत अ.भा.वीरशैव लिंगायत महासंघाद्वारे करण्यात आले. 
वर्धापनदिनाच्या अनुषंगाने वीरशैव समाजात आपल्या कार्याची विशेष छाप सोडणार्‍या पुणे येथील शरद गंजीकर,जेष्ठ साहित्यिक आणि वीरशैव संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक शामाताई घोणसे, कोल्हापूर वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे, हिन्दू आणि वीरशैव एकच या पुस्तिकेचे लेखक सोलापूर येथील सिध्दाराम पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आला.तर प्रशासकीय तथा सामाजीक क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या रामदास पाटील यांना धर्मरक्षकवीर, स्पर्धा परीक्षेसाठी सातत्याने विद्यार्थ्याना मार्गदर्शन करीत असल्याबाबत प्रशासकीय अधिकारी या देशाला देणारे मनोहर भोळे सर यांना विशेष कार्यगौरव, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनिल गाताडे यांना समाजभूषण,सामाजिक कार्यकर्ते किशोर बाळासाहेब पाटील यांना समाजभूषण, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कामिगरीसाठी पत्रकार परमेश्वर लांडगे यांना निर्भिड पत्रकार आणि साहित्यरत्न, वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रूग्णालयाचे डॉ.महेश रेवाडकर यांना वैद्यकिया सेवारत्न, बीड जिल्ह्यातील दिंद्रुड येथील पत्रकार संतोष स्वामी यांना विशेष कार्यगौरव, सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या कोल्हापूर येथील वीरशैव अर्बन मल्टीपर्पज निधि बँकेचे चेअरमन संतोष जंगम यांना सहकाररत्न, कोल्हापूर येथील पत्रकार बाळकृष्ण सांगवडेकर यांना उत्कृष्ट साहित्यिक, सागर माळी यांना कार्यगौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर नवनियुक्त मराठवाडा अध्यक्ष सुभाषअप्पा नित्रुडकर यांचा स्मृतीचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.याप्रसंगी सा.सोनपेठ दर्शन अ.भा.विरशैव लिंगायत महासंघ 9 वा वर्धापन दिन विशेषांकाचे संपादक किरण रमेश स्वामी यांनी विचारमंचावर तसेच उपस्थीतांना आंकाचे वितरण केले.

No comments:

Post a Comment