Monday, February 15, 2021

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
    सोमवार दि. 15 फेब्रुवारी 2021 रोजी औरंगाबाद येथून परभणी येथे सायंकाळी 7 वाजता आगमन व राखीव आणि मुक्काम करतील.
        मंगळवार दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता मोटारीने पालम जिल्हा परभणीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता आगमन व पालम येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12:30 वाजता पालम येथून मोटारीने कंधार जिल्हा नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता कंधार येथून मोटारीने गंगाखेड मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment