Friday, February 12, 2021

ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जवळेकर तर सचिवपदी दिपक कानडे व उपाध्यक्ष पदी फेरोज पठाण यांची निवड

ताडकळस मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जवळेकर तर सचिवपदी दिपक कानडे व उपाध्यक्ष पदी फेरोज पठाण यांची निवड 


ताडकळस / सोनपेठ (दर्शन) :-

 ताडकळस पत्रकार संघटनेचे मा.अध्यक्ष मदनराव आंबोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार परिषदेचे परभणी जिल्हा अध्यक्ष मा.श्री.सुरेश नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांची रितसर सदस्य नोंदणी करून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस ताडकळस येथील पत्रकार बांधव उपस्थित होते या बैठकीत ताडकळस येथील मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न च्या ताडकळस पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक एकमत ताडकळस प्रतिनिधी लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) तर उपाध्यक्ष पदी माझा महाराष्ट्र चे फेरोज पठाण व सचिवपदी पीबीएन न्यूज चे संपादक  दिपक कानडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व त्याचबरोबर संघटनेच्या सहसचिव पदी बाळासाहेब राऊत ,कार्याध्यक्ष पदी दै.पुढारी चे मदनराव आंबोरे ,सल्लागार पदी दै. सकाळचे शिवाजी शिराळे ,सह सल्लागार पदी पीबीएन न्यूज चॅनल चे मुख्य संपादक धम्मपाल हानवते ,कोषाध्यक्ष पदी दै. बाळकडु चे परभणी जिल्हा प्रतिनिधी देवानंद नावकिकर सह आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली .
यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न ताडकळस पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या निवडीसाठी ताडकळस पत्रकार संघटनेचे खंबीर नेतृत्त्व मा.अध्यक्ष गजानन आंबोरे(दै.गोदातीर) ,मार्गदर्शक माधवराव आवरगंड(दै.गाववाला) ,आधारस्तंभ तुकारामजी नाईकवाडे(दै.लोकमत) ,तेज न्यूज चे शेख शहजाद ,दै.महानगर चे नजीर खाँ पठाण ,आवाज जनतेचे संपादक सचिन सोनकांबळे ,पीबीएन न्यूज चे हनुमान खुळखुळे ,संजय कानडे(दै.सामना) आदींनी समर्थन करत संमती दर्शवली तसेच मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न ताडकळस पत्रकार संघटनेच्या नुतन  सर्व  पदाधिकारी व सदस्यांचे ताडकळस पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .

No comments:

Post a Comment