Friday, February 5, 2021

सोनपेठ येथे कोरोना लसीकरणास सुरुवात ; प्रथम आरोग्य विभाग,अंगणवाडी ताई व आशा ताई यांना प्राधान्य - सिध्देश्वर हालगे




सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ ग्रामिण रुग्नालयात आज दि.5 फेब्रुवारी 2021 शुक्रवार पासुन कोरोना लसीकरणास सुरुवात मा.जि.प.अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या शुभहस्ते उदघाटन करुन करण्यात आली यावेळी मा.तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार, मा.गट विकास अधिकारी सचिन खुडे, आरोग्य अधिकारी डाँ.सुभाष पवार,अधिक्षक डाँ.सिध्देश्वर हालगे यांच्या सह आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते.
याप्रसंगी बोलताना ग्रामिण रुग्नालय अधिक्षक सिध्देश्वर हालगे यांनी सांगितले कि प्रथम प्राधान्य 
पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी ताई तसेच आशा ताई यांना व खाजगी डॉक्टर यांना लस देण्यात येणार आहे तसेच शासनाच्या निर्देशा प्रमाणे लसीकरण होणार आसुन संबधीतांना मोबाईल व्दारे संदेश पाठऊन कळवण्यात येनार आसल्याचे सा.सोनपेठ दर्शन प्रतिनीधी जवळ बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment