मराठवाड्यातून उत्कृष्ट लिपिक म्हणून शिवाजी गमे यांची निवड ; कार्यसंस्कृतीचा होणार गौरव
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
सन 2020 या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) कार्यालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद अंतर्गत कार्यालयांतील बारा कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
यामध्ये मराठवाडा विभागातून उत्कृष्ट लिपिक म्हणून शिवाजी गमे, वरिष्ठ लिपिक, जिल्हा माहिती कार्यालय बीड सध्या कार्यरत परभणी यांची निवड करण्यात आली आहे.तर स्वच्छ व सुंदर कार्यालय म्हणून संपूर्ण मराठवाड्यातून जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयाची निवड करण्यात आली आहे.उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच कार्यसंस्कृती प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
मराठवाडा विभाग अंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे एकूण दहा कार्यालये आहेत.या कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रसिध्दीचे काम अव्याहतपणे सुरु असते.गेल्या वर्षभरात आपल्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडण्या बरोबरच इतर कामातही हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम काम करणाऱ्या तसेच कोरोना सारख्या आपत्कालिन परिस्थितीत तसेच निवडणुकीच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या आणि अचानक आलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारुन कार्यालयाची प्रतिमा उंचावणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment