श्री सोमेश्वर मित्र मंडळ दहीखेड शिवजन्मोत्सव निमित्त आदर्श घ्यावा असा "माझी सुंदर शाळा" हा उपक्रम...
सोनपेठ (दर्शन) :-
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.सचिन खुडे (गट वकास अधिकारी पंचायत समिती सोनपेठ) प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून मा.संदिपान शेळके (पोलीस निरीक्षक)
तसेच मा.डाँ.सिध्देश्वर हालगे (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोनपेठ) व मा.शौकत पठाण (गटशिक्षणाधिकारी) आदि मान्यवर लाभनार असून या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते याचे उद्घाटन वृक्षारोपण तसेच वाढदिवसानिमित्त ग्रंथनाम कार्यक्रम संपन्न होणार आहे.या माध्यमातून शिवजन्मोत्सव साजरा करण्याची श्री सोमेश्वर मित्र मंडळ दहीखेड यांनी इतर कुठेही खर्च न करता "माझी सुंदर शाळा" या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळे मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा आपलाच पाल्य असून तो उद्याचा जिल्हाधिकारी, उद्याचा पोलीस अधीक्षक, उद्याचा एखादा नेता घडावा एवढीच अपेक्षा ठेवून आपला खर्च सत्कारणी लागावा या उदात्त हेतूने ही सर्व मित्र मंडळी एका व्हाट्सअप ग्रुप मधून एकत्र आलेली आहे सात जणांचा हा व्हाट्सअप ग्रुप आजच्या घडीला 126 लोकांचा झालेला असून यामध्ये त्यांच्या ज्याच्या त्याच्या व्यवसायाच्या परीने फुलना फुलाची पाकळी 500, 1000, 2000, 3000, 5000 अशी मदत शाळेसाठी दिलेली आहे.परभणी जिल्ह्यातील पहिलीच अशी शिवजन्मोत्सव निमित्य संकल्पना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहीखेड उकीरड्यातुन नंदनवनात रुपांतर करुन श्री सोमेश्वर मित्र मंडळ यांनी राबविल्याबद्दल यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे या साठी सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने तसेच सर्वच स्तरातून श्री सोमेश्वर मित्र मंडळाचे अभिनंदन होताना दिसत आहे.

No comments:
Post a Comment