Saturday, February 27, 2021

पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा उपमहानिरीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव.....

पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा उपमहानिरीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव.....



परभणी / सोनपेठ  (दर्शन) :- 

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते शनिवारी (दि.27) जिल्हा पोलिस दलातील अधिकारी - कर्मचार्‍यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह अन्य अधिकार्‍यांची यावेळी उपस्थिती होती.
विशेष पोलिस उपमहानिरीक्षक श्री. तांबोळी हे वार्षिक तपासणीनिमित्त जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शहरातील नवामोंढा पोलिस ठाण्याची शुक्रवारी (दि.26) त्यांनी वार्षिक तपासणी केली. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयातील विक्रांत स्पोर्टस मैदानासह अत्याधुनिक जीमचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण पोलिस ठाण्यातील व्हॉलीबॉल मैदानाचेही उद्घाटन श्री. तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. 
जिल्हा पोलिस दलातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांसह पोलिस अधीक्षक कार्यालयातील कर्मचार्‍यांना शनिवारी श्री.तांबोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात फौजदार चंद्रकांत साखरे, सहाय्यक फौजदार श्याम अंबेकर, कर्मचारी शेख रौनक शेख खाजामिया, ग्यानदेव बेंबडे, रघुवीर देशपांडे यांचा बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तर ग्राम पंचायत निवडणूक संदर्भाने निवडणूक सेलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कर्मचारी सुनील गरुड, जरार अहमद जुल्फेखार अहेमद, सुरेखा घोगरे, संतोष व्यवहारे, राजेश जटाळ, अमर चाऊस यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय मोटर परिवहन पर्यवेक्षक सय्यद साजिद हुसैन, मोहमद हेरेस मोहमद युसूफ अन्सारी, पोलिस निरीक्षक रमाकांत बनसोडे, उमेश पाटील, राखीव पोलिस निरीक्षक रविंद्र दामोदर, राखीव फौजदार शामलाल राठोड यांचाही विशेष पोलिस उपमहानिरीक्षक श्री. तांबोळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या शिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेतील आशा देशपांडे, ग्रिष्मा कदम, अस्थापना शाखेतील दिलीप सावंत, पत्रव्यवहार शाखेतील देवदत्त पवार, विभागीय चौकशी शाखेतील ओमप्रकाश कोटरवार, प्रबंधक अनंता गमे, पत्रव्यवहार शाखेतील, श्रीकृष्ण सोमवंशी, दीपक गजभार, संतोष भोसले, पल्लवी देशमुख, गोविंद फुफाटे, रुपा कासेवाड, कविता गुट्टे, गंगाधर होले, रविंद्र आसोरे, मीरा केंद्रे, गुलाब बुक्तरे, प्रवीण वायाण, दिपाली पाटील, विठ्ठल बोबडे, नाजिया शेख, अशोक शिंदे, राजेश गायकवाड, समीर शेख आदींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

मराठी माणसाला मराठी भाषेविषयी अभिमानच ;आपण सर्व मराठी संस्कृती टिकवून ठेवूया-बालकिशन सोनी परळी बसस्थानकात मराठी भाषा दिन साजरा

मराठी माणसाला मराठी भाषेविषयी अभिमानच ;आपण सर्व मराठी संस्कृती टिकवून ठेवूया-बालकिशन सोनी
परळी बसस्थानकात मराठी भाषा दिन साजरा



परळी / सोनपेठ (दर्शन) :- 

भाषा म्हणजे संस्कृती आणि संस्कृती म्हणजे भाषा असे वाक्य कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांनी म्हटले असून त्यांचा आज जन्म दिन हा आपण ‘मराठी भाषा दिन’  म्हणून साजरा करतो असे मत न्यायटाईम्सचे संपादक बालकिशन सोनी यांनी व्यक्त केले.
परळी येथील बसस्थानकात शनिवारी (दि.27) दुपारी 12 वा. मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना बालकिशन सोनी म्हणाले, माझी मातृभूमी आणि मातृभाषा अभिमानाचा मराठी दिवस माणणार्‍या भाषा दिनाच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी श्री सोनी व परळी आगारातील आगार प्रमुख अनिल बिडवे यांच्या हस्ते कवी कुसूमाग्रज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले.
श्री सोनी पुढे बोलताना म्हणाले, मराठी माणसाला मराठी भाषेविषयी अभिमानच आहे. आपण सर्व मराठी संस्कृती टिकवून ठेवूया असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला परळी बसस्थानकातील प्रवाशांना पेढे वाटून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रामेश्वर सोनवणे (वाहतूक निरीक्षक), सचिन राठोड (सहाय्यक वाहतूक निरीक्षक), चंद्रसेन होळंबे (वरिष्ठ लिपिक), अमोल क्षिरसागर, कोरडे, हाडबे, चाटे (वाहतूक नियंत्रक), मारोती मुजमुले (पोलिस हवालदार), भरत मामडे आदी यावेळी उपस्थित होते.

Thursday, February 25, 2021

उप महानिरीक्षकासह अधीक्षकांची व्हॉलीबॉलच्या मैदानात चाली वर चाल व जोरदार शाँट

उप महानिरीक्षकासह अधीक्षकांची व्हॉलीबॉलच्या मैदानात चाली वर चाल व जोरदार शाँट




परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात तयार केलेल्या व्हॉलीबॉलच्या मैदानाच्या उद्घाटन सोहळ्यनिमित्त नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह अन्य अधिकारी - कर्मचार्‍यांसोबत थेट मैदानावर व्हॉलीबॉलची सर्व्हिस करीत सुंदर चालीसह क्रीडा नैपुण्य दाखवून दिले.
पोलिस अधीक्षक श्री.मीना यांच्या पुढाकारातून ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारातील मोकळ्या जागेत व्हॉलीबॉल छानसे मैदान तयार केल्या गेले आहे. विशेषतः या मैदानावर लालमातीचा वापर करण्यात आला असून त्या मैदानाचा गुरुवारी विशेष पोलिस उपमहानिरीक्षक श्री.तांबोळी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी तांबोळी यांच्यासह पोलिस अधीक्षक श्री.मीना यांना व्हॉलीबॉल खेळण्याचा मोह आवरला नाही. हे दोघेही अधिकारी बॉलनिशी मैदानात उतरले. तेव्हा त्यांचे सहकारी अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधीक्षक (परभणी) अविनाश कुमार, सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त (जिंतूर), प्रभार पोलिस उपअधीक्षक प्रदीप काकडे, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बापुराव दडस, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्यासह ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचारी आदींनी या सामन्यात सहभाग घेतला. हा सामना चांगलाच रंगला. विशेषतः सर्व्हिस करण्या बरोबरच सुंदर अशा चाली तसेच जोरदार शॉट मुळे सामना चुरशीचा झाला.दरम्यान, पोलिस अधीक्षक श्री.मीना यांच्यासह ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी या मैदानासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करतानाच पोलिसांनी मैदानी खेळ नेहमीच खेळावे, असा संदेश श्री.तांबोळी यांनी यावेळी दिला.

जीएसटीत हजारांवर सुधारणाने व्यापारी वैतागले ; महासंघाचा आरोप विविध दर रिटर्न भरतांना त्रासदायक ठरत आहेत - सुर्यकांत हाके

जीएसटीत हजारांवर सुधारणाने व्यापारी वैतागले ; महासंघाचा आरोप 
विविध दर रिटर्न भरतांना त्रासदायक ठरत आहेत - सुर्यकांत हाके


परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

जीएसटी कायद्यात सुमारे 42 महिन्यात जवळपास एक हजारावर सुधारणा झाल्यामुळे व्यावसायिक आणि सीए व कर सल्लागार वैतागले आहेत, असे मत जिल्हा व्यापारी महासंघाने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले.
व्यापारी कर भरावयाला तयार आहेत, पण या सारख्या सुधारणा आणि नोटीसांना ते अक्षरशः कंटाळले आहेत. व्यापार्यांनी जर कर भरला नसता तर हे जीएसटीचे विक्रमी उत्पादन झालेच नसते. कराचे अनेक आणि विविध दर रिटर्न भरतांना त्रासदायक ठरत आहेत,असे मतही व्यापारी महांसघाने व्यक्त केले. आम्हाला जीएसटी, गुड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स हवा होता, पण हा तर फारच गुंतागुंंतींचा झाला आहे. तारखांच्या घोळामुळे व्यापारी आणि कर सल्लागार यांना सणवार सुट्टीपण राहीली नाही. सरकारी अधिकारी मात्र पाच दिवसांचा आठवडा आणि सार्वजनिक सुट्ट्या हक्काच्या रजा मिळवून वर्षात चार महिने सुट्ट्या घेवू लागले आहे. कल्याणकारी राज्य कल्पनेत 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरापराधाला शिक्षा होता कामा नये, हे भारतीय घटनेला मान्य आहे. पण, सरकारला मात्र 100 प्रामाणिक करदात्याला शिक्षा झाली तरी चालेल, पण एकही कर बुडता, सुटता कामानये हे धोरण राबवायचे आहे. त्यामुळेच सरकारी अधिकारी प्रामाणिक करदात्याच्याच मागे लागले आहेत, असेही व्यापारी महासंघाने म्हटले. प्रामाणिक करदाता कोणताही मोबदला न घेता कर गोळा करतो आहे. पण तोच सर्वात जास्त आज भरडल्या जात आहे. उदाहरणार्थ एकदा जीएसटी भरुन सरकारमान्य डीलरने तो सरकारी तिजोरीत भरला नाही तरी, शिक्षा जीएसटी भरलेल्यांनाच दिली जात आहे. अनेकवेळा इंटरनेट चालू नाही, त्यामुळे बँकेत भरणा करता येत नाही. जीएसटी साईट बंद असते, त्यामुळे रिटर्न अपलोड करता येत नाहीत, पण हे विचारात न घेता प्रामाणिक करदाता शिक्षा आणि दंडास पात्र ठरत असल्याबद्दल व्यापारी महासंघाने तीव्र खंत व्यक्त केली. सरकारी अधिकार्यांना खूप जास्त अधिकार दिल्याने गैरवापराचीही शक्यता वाढली आहे. त्यामुळे सुरुवातीला जीएसटी म्हणजे घना सारो टॅक्स न राहता आता तो घना सारो लिटीगेशन टॅक्स झाला आहे. त्यामुळेच सरकारला जागे करण्याकरिता 26 फेबु्रवारी रोजी भारतातील व्यापारी बंदचे आवाहन केल्या गेले आहे, अशी माहिती व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी दिली.

ह.भ.प.बाजीराव महाराज जवळेकर यांना तिर्थक्षेत्र पैठणला देवाज्ञा

ह.भ.प.बाजीराव महाराज जवळेकर यांना तिर्थक्षेत्र पैठणला देवाज्ञा 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

प.पु. गुरुवर्य हभप बाजीराव महाराज जवळेकर यांना गुरुवारी सकाळी तीर्थक्षेत्र पैठणला देवाज्ञा झाली. ते 85 वर्षांचे होते.महाराष्ट्रातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र पैठण (जि. औरंगाबाद) येथील भव्यदिव्य अशा गीता मंदिराचे ते संस्थापक आहेत. प्रसिध्द संत म्हणून ते राज्यात सर्वदूर परिचित होते. विशेषतः आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून जवळेकर महाराज यांनी हजारो भक्त, शिष्य निर्माण केले होते. विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल समाजभूषण, समाजसेवक आयुर्वेदाचार्य इत्यादी पदव्यांनी विविध संस्थांनी संत बाजीराव महाराज यांना सन्मानित केले होते. गीता मठ, शेगाव, दुमाला, पंढरपुर संस्थानचे संस्थापक असणारे हभप बाजीराव महाराज जवळेकर यांना गुरुवारी सकाळी 9 वाजता श्रीक्षेत्र पैठण येथे देवाज्ञा झाली.तीर्थक्षेत्र पैठण येथील गीता मंदिर परिसरात सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, हे वृत्त कळताच हजारो शिष्यवृंदांनी तीर्थक्षेत्र पैठणला धाव घेतली.

Wednesday, February 24, 2021

प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अर्चना ढमढेरे यांना पंचकर्म महर्षि गोगाटे स्मृती पुरस्कार प्रदान...

प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.अर्चना ढमढेरे यांना पंचकर्म महर्षि गोगाटे स्मृती पुरस्कार प्रदान...



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी येथील प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सौ. अर्चना पंकज ढमढेरे यांना पंचकर्म महर्षि त्र्यं. म. गोगाटे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.आरोग्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार पंचकर्म शिरोमणी वैद्य प्रवीण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. राजीव मंदाने, डॉ. अलोक गुप्ता, विवेकानंद प्रतिष्ठानचे स्वामी चेतनानंद, डॉ. संजय रत्नपारखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.राज्यातील 12 वैद्यांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान होत आला आहे. समका आयुर्वेद प्रतिष्ठानचे संचालक डॉ.पंकज पवार (यवतमाळ) व धन्वंतरी संस्था वर्धा, डॉ. नितीन मेश्कार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. 
डॉ. अर्चना ढमढेरे यांचे 20 वर्षांपासून आयुर्वेद व पंचकर्म क्षेत्रातील काम, स्त्रीरोगावरील विशेष काम याचा विचार करून हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. परभणीतील पहिले अत्याधुनिक महिलांसाठी फिटनेस सेंटर व आयुर्वेद पंचकर्म क्लीनीक गेल्या 20 वर्षापुर्वी डॉ. अर्चना ढमढेरे यांनी सुरू केले. कोरोनाच्या या आपत्तीत साडेतीन हजारहून अधिक व्यक्तींना आयुर्वैदामृत काढा उपलब्ध करून दिला. तसेच आयुर्वैदाचे सुरक्षा कवच कसे महत्वपूर्ण आहे, हे पटवून दिले. आयुर्वैदेचा प्रचार आणि प्रसाराकरिता अनेक उपक्रमसुध्दा त्यांनी राबविले.दरम्यान,डॉ.अर्चना ढमढेरे यांचे विविध संस्था,संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले आहे.

मा.सुरज कदम सर यांची मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल (बार्टी) जि.परभणी यांच्या वतिने सत्कार

मा.सुरज कदम सर यांची मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल (बार्टी) जि.परभणी यांच्या वतिने सत्कार



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
मा.सुरज कदम सर यांची मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे(बार्टी) जि.परभणी चे प्रकल्प अधिकारी दि.फ.लोंढे सर यांनी परभणी येथील दैनिक देशोन्नती कार्यालय येथे मा.सुरज कदम सरांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सोबत बार्टी चे समतादूत महादेव तुरे,अविनाश मलसमिंदर उपस्थीत होते.

Monday, February 22, 2021

सोनपेठ प्रीमियर लीग 2021 क्रिकेट सामन्यांना प्रारंभ

सोनपेठ प्रीमियर लीग 2021 क्रिकेट सामन्यांना प्रारंभ


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ प्रीमियर लीग 2021 क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या शुभहस्ते बॅट-बॉल टोलवून करण्यात आले तर नाणे फेक माजी आमदार व्यंकटराव कदम यांच्या शुभहस्ते करून क्रिकेट  सामन्याची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी उपस्थित दत्‍तराव कदम, सुमित पवार, डॉ.अमोल चव्हाण, नगरसेवक अमृत स्वामी, सुनील बर्वे, पत्रकार राधेश्याम वर्मा, किरण स्वामी मान्यवरांचे स्वागत सोनपेठ प्रिमियम सदस्य सागर टाक, जावेद शेख, महेश झिरपे, समीर अन्सारी, भागवत कदम, बाबा सोन्नर, राहुल साठे, संजय ढवळे,दिनेश जाधव, अस्लम शेख, गजानन देवरे, आसिफ शेख, झुबेर पठाण, कल्याण काकडे व अशोक भुसारे यांनी केले.दररोज चार सामने खेळवले जाणार असल्याची माहिती अक्षय कदम यांनी दिली.प्रामुख्याने या आठ टीम मध्ये सुमित भैय्या पवार, खदीर भाई अन्सारी, बालाजी पदमवार, डॉ.अमोल चव्हाण,अक्षय कदम व शहाजी कदम आदींच्या टिमने सहभाग नोंदविला आहे.

Sunday, February 21, 2021

मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत ; मास्क घाला,शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा संसर्ग रोखण्यासाठी आता " मी जबाबदार" मोहीम राज्यभर ; वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना संबोधन

मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत ; मास्क घाला,शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा
संसर्ग रोखण्यासाठी आता " मी जबाबदार" मोहीम राज्यभर ; वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना संबोधन




मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी " मी जबाबदार" या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून  राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारेही मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करीत होते.
संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे जिथे आवश्यकता  असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत. 
पुढील ८ दिवसांत जनतेने निर्णय घ्यावा
कोविड परिस्थितीत आपल्याला जनतेशी या माध्यमातून संवाद करताना समाधान मिळते आणि आपण देखील मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे असे सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी  मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये असेही ते म्हणाले. 
आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ देऊ नका
गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय , त्यात आपल्याला यशही आले . मुंबईत आपण दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरलो मात्र आता काही दिवसांपासून ८०० ते ९०० रुग्ण आढळत आहेत. राज्यातही दररोज हजार ते दीड हजार रुग्ण वाढताहेत, आज दिवसभरात सुमारे ७ हजार रुग्ण आढळले ही  चिंताजनक बाब आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे सुविधा नव्हत्या,ऑक्सिजन,बेडसे,रुग्णालये, प्रयोगशाळा पुरेशा नव्हत्या. पण आता सुविधांनी आपण सज्ज आहोत मात्र आता वाढत चालवलेला संसर्ग आपण थांबविला नाही तर या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. एकीकडे आपण सगळॆ खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत, लोक बिनधास्तपणे नियम मोडून फिरताहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेला चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यास सांगतो आहोत हे बरोबर नाही. 
सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून भान ठेवले यासाठी त्यांचे अभिनंदन केले. 
कोविड पसरविणारे कोविड दूत बनू नका
पाश्चिमात्य देशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्याठिकाणी मोठे निर्बंध टाकण्यात आले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता जेव्हा संसर्ग पसरतोय तेव्हा वाचवायला येणार नाहीत. सध्या कोविड योध्द्यांचे सत्कार सुरु आहेत. या योध्यांनी जीवावर उदार होऊन लढाई केली आहे, मात्र त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण कोविड पसरविणारे कोविड दूत बनू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
" मी जबाबदार" ही  मोहीम !
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखले सुद्धा पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे, आपण सर्व बाहेर आलो आहोत  त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही  आपली व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वानी पार पाडण्यासाठी " मी जबाबदार" ही  मोहीम सुरु करीत आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र थांबला नाही
कोविडची जोरदार साथ असताना देखील महाराष्ट्र थांबला नाही. २ लाख कोटींपर्यंत गुंतवणूक महाराष्ट्राने आणली. एमएमआरडीएच्या काही प्रकल्पांना सुरुवात झाली, पर्यटन असो किंवा कृषी क्षेत्र असो आपण विकासाची कामे सुरूच ठेवली. भूमिपूजने झाली, कृषी पंपांना वीज दिली, मी विदर्भात, मराठवाड्यात येऊन गेलो , जव्हारला भेट दिली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे पासून नागपूर-शिर्डी वाहतुकीस सुरु करतो आहोत. कामे थांबणार नाही मात्र आता गर्दी करून याचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत तर ती ऑनलाईनच करण्याचे म्हणजे संसर्गाला आमंत्रण मिळणार नाही यादृष्टीने मी सूचना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांसमवेत नीती आयोगाच्या बैठकीत आपण कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत धोरण असावे अशी मागणी केली असून याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.

Saturday, February 20, 2021

शेतकरी कुटुंबातील विजयकुमार सोळंके श्री महालिंगेश्वर विद्यालयाचा विध्यार्थी झाला सहाय्यक कमांडंट

शेतकरी कुटुंबातील विजयकुमार सोळंके श्री महालिंगेश्वर विद्यालयाचा विध्यार्थी झाला सहाय्यक कमांडंट 

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

ताडकळस येथून जवळच असलेल्या बानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व सामान्य शेतकरी कुटुंबातील विजयकुमार मनोहर सोळंके हे जिद्द व कठोर परिश्रमाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सहाय्यक कमाडट (केंद्रीय पोलिस उपअधिक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्त) देशातुन 141 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.पालम तालुक्यातील छोट्याश्या कांजळगाव येथील रहिवासी असलेले विजयकुमार सोंळके यांचे सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामाच्या गावी म्हणजेच बानेगाव (ता.पुर्णा) येथे झाले तर माध्यमिक शिक्षण विटा व सोनपेठ येथील श्री महालींगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी यावेळी ते सागतात माझे गुरु मुख्याध्यापक माणिकआप्पा निलंगे सर व मार्गदर्शक गुरु विरेश कडगे सर होते तर नांदेड येथील सायन्स कॉलेज मध्ये बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्या नंतर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे बी. फार्मसी पदवी मिळवली. त्या नंतर पुणे येथे यु .पी. एस .सी परीक्षेची तयारी सुरू होती.त्यातच 2019 मध्ये  झालेल्या यू .पी .एस. सी परीक्षेत त्यांनी घवघवीतपणे यश संपादन केले व 15 नोव्हेंबर 2020 रोजी परीक्षेचा अंतिम टप्पा मुलाखत प्रक्रिया पार पाडली . या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात विजयकुमार  सोळंके हे देशातुन 142 व्या क्रमांकाने यशस्वी झाले असुन त्यांची सहाय्यक कमाडंट पदी निवड झाली आहे . त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.दरम्यान  बानेगाव येथील जि.प.प्राशाला व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.परभणी जिल्हाधिकारी, परभणी पोलिस अधिक्षक तसेच मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर आदिंनीही सत्कार करुन विजयकुमार सोळंके यांना पुढिल वाटचालीस सर्वस्तरातुन तसेच मित्र परीवारातुन शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

शेतकरी कुटुंबातील विजयकुमार सोळंके श्री महालिंगेश्वर विद्यालयाचा विध्यार्थी झाला सहाय्यक कमांडंट

शेतकरी कुटुंबातील विजयकुमार सोळंके श्री महालिंगेश्वर विद्यालयाचा विध्यार्थी झाला  सहाय्यक कमांडंट 

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

ताडकळस येथून जवळच असलेल्या बानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व सामान्य शेतकरी कुटुंबातील विजयकुमार मनोहर सोळंके हे जिद्द व कठोर परिश्रमाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सहाय्यक कमाडट (केंद्रीय पोलिस उपअधिक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्त) देशातुन 141 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.पालम तालुक्यातील छोट्याश्या कांजळगाव येथील रहिवासी असलेले विजयकुमार सोंळके यांचे सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामाच्या गावी म्हणजेच बानेगाव (ता.पुर्णा) येथे झाले तर माध्यमिक शिक्षण विटा व सोनपेठ येथील श्री महालींगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी यावेळी ते सागतात माझे गुरु मुख्याध्यापक माणिकआप्पा निलंगे सर व मार्गदर्शक गुरु विरेश कडगे सर होते तर नांदेड येथील सायन्स कॉलेज मध्ये बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्या नंतर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे बी. फार्मसी पदवी मिळवली. त्या नंतर पुणे येथे यु .पी. एस .सी परीक्षेची तयारी सुरू होती.त्यातच 2019 मध्ये  झालेल्या यू .पी .एस. सी परीक्षेत त्यांनी घवघवीतपणे यश संपादन केले व 15 नोव्हेंबर 2020 रोजी परीक्षेचा अंतिम टप्पा मुलाखत प्रक्रिया पार पाडली . या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात विजयकुमार  सोळंके हे देशातुन 142 व्या क्रमांकाने यशस्वी झाले असुन त्यांची सहाय्यक कमाडंट पदी निवड झाली आहे . त्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.दरम्यान  बानेगाव येथील जि.प.प्राशाला व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.परभणी जिल्हाधिकारी, परभणी पोलिस अधिक्षक तसेच मा.जि.प.अध्यक्ष तथा सभापती राजेशदादा विटेकर आदिंनीही सत्कार करुन विजयकुमार सोळंके यांना पुढिल वाटचालीस सर्वस्तरातुन तसेच मित्र परीवारातुन शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

कोविड-19 टास्क फोर्सची बैठक ; कोरोना बाबतच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

कोविड-19 टास्क फोर्सची बैठक ; कोरोना बाबतच्या निष्काळजीपणाला आळा 
घालण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर




औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोनाबाबत सर्वत्र वाढत चाललेल्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे आणि कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक पध्दतीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. 
 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 टास्क फोर्सची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, महानगर पालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, आरोग्य उपसंचालक  डॉ.स्वप्नील लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, उपायुक्त (महसूल) पराग सोमण, उपायुक्त (सा.प्र.) जगदीश मिनीयार, महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, घाटीच्या डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, आदीसह खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते. 
 मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठकीत सर्व यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. गर्दीचे ठिकाण, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, भाजीमंडई, मॉल, आठवडी बाजार, बसस्टँड, रेल्वेस्टेशन या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे. सर्वत्र मास्क वापरणे बंधनकारक करा. विनामास्क, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळले तर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना श्री.केंद्रेकर यांनी यावेळी दिल्या.
 सर्व संबंधित यंत्रणांनी आपआपसांत समन्वय ठेवण्याची सूचना करताना ते पुढे म्हणाले की, कोरोनाबाबतच्या ज्या समित्या आहेत त्यांच्या नियमितपणे बैठका घ्याव्यात. सर्व यंत्रणां प्रभावीपणे कार्यान्वित करा. आरोग्य विषयक सेवा देणारे मनुष्यबळ, औषधी, ऑक्सिजन आदींची उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घ्यावा. यासाठी लागणाऱ्या निधीकरीता पाठपुरावा केल्या जाईल. महानगर पालिकेनेही विना मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांवर कार्यवाही करावी. अडचणी आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहकार्य घ्यावे. कोविड केअर सेंटर, औषधी याचा नियमित आढावा घ्यावा. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात गांभीर्याने लक्ष द्यावे,  ग्रामीण रुग्णालय सुसज्ज ठेवावेत. तसेच मास्क वापरणे बंधनकारक करावे. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार पोलिसांनी नियमित बैठका घेऊन समन्वयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावा. औद्योगिक क्षेत्रात कोरोना नियंत्रणाची नियमावली बंधनकारक करावी.  एसटी बसमध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीबाबत बोलताना श्री.केंद्रेकर म्हणाले की, बसमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवू नये. मास्कशिवाय बसमध्ये कोणालाच प्रवेश देऊ नये, विनामास्क आढळल्यास किंवा विरोध केल्यास गुन्हा दाखल करावा. तसेच बसस्थानकाच्या परिसरात होर्डिंगद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करावी. लाऊड स्पीकरद्वारे वेळोवेळी सूचना कराव्यात, असे निर्देश त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिले. 
 ऑटोरिक्शात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणाऱ्यांवर आरटीओंनी कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली. महानगर पालिकेने  बसस्टँड, रेल्वेस्टेशन येथे तपासणी केंद्र सुरूच ठेवावेत, असे सांगतांना कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा, कोविड लसीकरण मोहिमही प्रभावीपणे राबविण्यात यावी. अद्याप अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांनी तात्काळ लस घ्यावी. तसेच फ्रंटलाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनीही लस घ्यावी. जिल्हा प्रशासनाने नियमितपणे जिल्हा कोविड-19 टास्क फोर्सच्या बैठका घ्याव्यात. घाटीने बेड सज्ज ठेवावेत. औषधी, ऑक्सिजन, याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालयांनी कोविड व नॉन कोविड असे भाग करुन कोविड रुग्णांसाठी पुरेसे बेड ठेवावेत. तसेच ऑक्सिजन निर्मिती युनिट बसवावे. 
 यावेळी विविध विभागाचे अधिकारी, खाजगी डॉक्टर्स यांच्या सोबत श्री.केंद्रेकर यांनी चर्चा करुन करोनाची सद्यस्थिती व त्यावरील कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. 

Thursday, February 18, 2021

रयतेचा राजा, रयतेला आई प्रमाणे प्रेम देणारा राजा शिवछत्रपती शिवराय......!!!!!

रयतेचा राजा, रयतेला आई प्रमाणे प्रेम देणारा राजा शिवछत्रपती शिवराय......!!!!!





इतरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काय वेगळे केले होते ज्यामुळे आपण लोकशाहित सुद्धा एका राजाची जयंती साजरी करतो ? या प्रश्नाचा मागोवा घेताना इतिहासाशी इमान ठेवून उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून शिवजयंती साजरी करावी.
  १८६९ ला फुलेंनी दुर्लक्षित असलेल्या शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला व सर्वात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७० ला 'कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक' असे म्हणत पोवाडा गाऊन साजरी केली होती. ही झाली शिवजयंती सुरू झाल्याची पार्श्वभूमी. पण त्यावेळी शिवरायांनी अशी कोणती वेगळी किमया केली होती ज्यामुळे रयतेला ते आपले राजे वाटायचे. शिवाजींचा इतिहास वाचून आपल्याला कळते कि, आतापर्यंत होऊन गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी जे करायला पाहिजे होते पण केले नाही तेच शिवाजी राजांनी प्रामाणिकपणे केले होते, करून दाखवले होते. हे सर्व करताना शिवाजींमधील बुद्धिचातुर्य, दूरदृष्टी, पराक्रम, माणसे जमविण्याची, टिकवण्याची व निष्ठा बाणवण्याची इत्यादी अनेक कला, गुणविशेष व चारित्र्यसंपन्नता याकडे दुर्लक्ष करता कामा नये. या सर्व कला गुणांचा, स्वभावाचा शिवचरित्रातील वेगवेगळ्या प्रसंगातून आपणास प्रत्यय येतो. आजपर्यंत शिवाजी महाराजांवर अनेक लिखाण झाले व होत आहेत पण महिराजांची प्रतिमा सामान्य जनात जशी बनायला पाहिजे तशी सर्वांमध्ये कदाचित बनू शकली नाही. यासाठी अनेक संशोधक, पुरोगामी अभ्यासक यांनी प्रयत्न केले व सुरू आहेत. आपल्याला कोणत्याही गोष्टीची सत्यता पडताळायची असल्यास अनेक प्रश्न डोक्यात ठेवून तर्कपूर्ण विचार करत मागोवा घ्यावा लागेल तेव्हा कदाचित आपण खरं आणि खोटं यातील फरक ओळखू शकणार. इतके वर्ष उलटून सुद्धा आपण अगदी मनापासून तन मन धनाने जल्लोषात शिवजयंती साजरी करतो.

          छत्रपति शिवाजी महाराज हे वारसा हक्काने राजा नव्हते बनले. कारण त्यांचे वडिल शहाजीराजे एक सरदार होते आणि त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली होती. पण शहाजीराजेंना आपले स्वतंत्र राज्य असण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि ते उभारण्यासाठी त्यांनी शिवबांना मार्गदर्शन व मदत केली. त्यांनी बाल शिवबांना माँसाहेब जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये पुण्याची जहागिरी दिली. सर्वप्रथम जिजाऊंनी शेतकऱ्यांचे राज्य व्हावे असा संदेश देण्यासाठी शापित समजल्या जाणाऱ्या जमिनीला सोन्याच्या नांगराने बाल शिवबाच्या हातून सामान्यजन समवेत नांगरणी केली आणि लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धा मिटवून समतेसाठी एक होण्याचे आवाहन केले. शिवबांना घडविण्यामध्ये राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचा, शिस्तीचा, मुत्सद्दीपणाचा सर्वात मोठा वाटा आहे. जिजाऊंच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी शिवाबांनी प्रत्यक्ष काम करत असताना अनेक निष्ठावान मावळे मिळवले व रयतेला आपल्यासाठी काम करणारा राजा वाटू लागला.

             सिद्दी जोहर ने पन्हाळगडाला वेढा दिला होता तेव्हा अनेक महिने उलटले तरि वेढा सैल पडेना. नेताजी पालकर व सिद्दी हिलाल ने वेढा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. युक्ति म्हणून शिवा न्हावी ने शिवाजींचा वेष धारण केला व वेढ्यातून किल्ल्याच्या बाहेर पडला. तेव्हा संपूर्ण सैन्याचे लक्ष तिकडे जाऊन शिवा न्हावीलाच शिवाजी समजून पाठलाग केला. तेवढ्या वेळेत शिवाजी लक्ष चुकवून विशाळगडावर जाण्यासाठी निघाले होते. सिद्दी जोहरच्या लक्षात येताच तो महाराजांच्या मागे सुसाट निघाला पण वाटेत जीवाचे बलिदान देऊन राजांना वाचविण्यासाठी मूठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे घोडखिंड लढविण्यासाठी उभे ठाकले होते. शिवा न्हावी, बाजीप्रभू देशपांडे व इतिहासातही नोंद नसलेले काहि मावळे यांना जीव जाणार माहिती असतानाही प्राणपणाने लढले. यामागे त्यांचा लोभ नव्हता, मर्दुमकी गाजवून इनाम मिळवण्यासाठी त्यांचे बलिदान नव्हते किंवा कुणीतरि भडकून देत आहेत म्हणून कुठल्यातरि विवादा साठी त्यांचे बलिदान नव्हते.
  औरंगजेबाचा शूर सरदार मिर्झाराजे जयसिंह याच्याशी शिवबांनी तह केला व आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात गेले पण तिथे अपमान झाला म्हणून दरबार सोडू पाहणाऱ्या शिवबांना बाळ संभाजींसमवेत औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले. यावेळी सुद्धा युक्ति ने महाराज पेटाऱ्यांमधून बाहेर निघण्यामध्ये यशस्वी झाले. सैनिकांना पटकन लक्षात येऊ नये व राजांना दूरवर जाण्यास सवड मिळावी म्हणून शिवरायांच्या जागी त्यांचा वेष धारण करून हिरोजी फर्जंद बिछान्यावर झोपला होता व मदारी मेहतर पाय चेपत बसला होता. प्राण जाण्याची भिती असताना सुद्धा असे कार्य केले म्हणून त्याची दखल इतिहास नक्किच घेते. फक्त बलिदान देण्यामागचा हेतू हा उदात्त व सकारात्मक बदल घडवू पाहणारा हवा. नाहि तर सद्या इस्टेटीच्या लोभापाई किंवा ज्या गोष्टिंचा सामान्यांच्या जीवनात काहिच फरक पडत नाहि अशा गोष्टिसाठी लढतात - मरतात पण अशा गोष्टींची इतिहासात नोंद होत नाहि.

         सैनिकांमध्ये व रयतेमध्ये शिवाजींबद्दल अशी भावना निर्माण झाली होती ज्यामुळे शिवाजींचे कार्य रयतेला आपले कार्य वाटायचे व प्रसंगी त्यासाठी प्राणही न्योछावर करण्याची मानसिकता असायची. असे करण्यामागे अनेक कारणे आहेत. रयतेची लूट करण्यातच आपली धन्यता मानणाऱ्या व त्यामार्फत जीवन ऐशोआरामात जगणाऱ्या जहागिरदार, वतनदार व एकूणच गावगाड्या संबंधी रयतेच्या हिताचे बदल शिवाजी महाराजांनी केले. प्रत्येकाची जमीन मोजून देऊन ठरल्याप्रमाणेच वसूली करण्याचे आदेश दिले. रयतेला तक्रार करण्याची व निष्पक्ष न्यायदानाची हमी मिळू लागली. त्यामुळे रयत व राजा यांचा थेट संबंध येऊन माजुरड्या वतनदारांमध्ये एक प्रकारे जरब निर्माण झाला. इतर राजांचा राज्यकारभार होता तेव्हा सैन्य शेतातील पिकांचा विचार न करता उभ्या पिकातूनच घोडे, फौजफाट्यासह जायचे पण शिवबांनी रयतेच्या उभ्या पिकातून न जाण्याचे आदेश सैन्याला दिले होते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये व जे लागेल ते पैसे देऊन मर्जीने घ्यावे, रयतेला त्रास होता कामा नये. आरमार उभारणीसाठी कुणाच्या शेतातील जिर्ण झालेले झाडच तोडायचे असा आदेश देताना तेही परवानगीने द्रव्य देऊनच तोडावे असा राजेंचा आदेश असायचा. रयतेला हे सर्व नविनच होतं. शेती, शेतकरी व सामान्य रयत यांची बारिक सारिक गोष्टिंपासून ते त्यांच्या हिताचे असणारे दूरगामी मोठे बदल घडविणारे राजेशाहीतील लोकशाहिसाठी आदर्श असणारे शिवाजीराजे होते. पण सद्याचे लोकशाहिमधील सरकार स्वतःच्या आडमुठेपणामुळे अडून बसलेले असल्याने हे लोकशाहिला मारक सरकार तर नाही ना? असे चित्र दिसत आहे. केंद्र सरकारने आणलेले तिन कृषी कायदे शेतकऱ्यांना नको आहे म्हणून लाखोंच्या संख्येने विरोध दर्शवित आहे. सरकार ने शिवरायांकडून शासनव्यवस्था कुणासाठी असते? व कशासाठी असते? हे पाहावे व माघार घेण्यात सरकारमधील व्यक्तिची हार नसून देशाचा कौल किंवा मानसिकता आहे म्हणून निर्णय घ्यावा. सरकार मधील व्यक्ति विशेषांनी हा मुद्दा स्वतःसाठी प्रतिष्ठेचा बनविला असल्याने कदाचित माघार घेण्यास नकार देत आहेत. पण शेतकऱ्यांना हे माहित आहे कि, कृषी कायदे भांडवलदारांच्या हिताचे असून
१. संपूर्ण बाजारपेठ खाजगी भांडवलदारांकडे जाईल.
२. वस्तुचा साठा करण्याचे कायदेशिर कवच घातल्याने मालाचा साठा करू शकणारे कोण? तर ते भांडवलदार. त्यामुळे मालाच्या किमती त्यांच्या नियंत्रणात राहणार. वरिल दोन कायद्यांमुळे शेतकऱ्याला शेती करणे परवडणार नाही. मग तो
३. करार शेतीच्या माध्यमातून सोपी शेती करण्याच्या प्रयत्नात राहणार. आणि भांडवलदार वर्ग शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात राबायला लावून स्वतःचा फायदा करून घेणार.  या तिनही कायद्यांच्या दूरगामी परिणामांचा विचार केल्यास यात शेतकरी फायदा कुठेच दिसत नाहि. पण शिवरायांनी त्यावेळी शेतकरी, रयत यांच्यासाठी काय काय केले होते? आणि त्यावरून शिवाजी महाराज आता असते तर काय केले असते? या प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी आधी शिवरायांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. मग या प्रश्नाचे ज्याचे त्याला उत्तर मिळवणे कठिण जाणार नाही.

       शिवाजींच्या स्वभावातील आणखी एक महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे त्यांचा स्त्रियांविषयी चा दृष्टिकोन. राजेशाहिमध्ये गरीब स्त्रिच्या अब्रुला किंमत नव्हती, स्त्रिला फक्त उपभोग्य वस्तूच समजले जायचे. रांझ्याच्या पाटलाने आपल्या पाटीलकीचा आव आणत अशाच एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रु लुटली म्हणून राजांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन विलंब न करता हात पाय तोडायची शिक्षा फर्मावली. रयतेसाठी हे नविनच वाटले, बदल जाणवू लागला.
  आणखी एक घटना आहे, १६७८ मध्ये सकुजी गायकवाड या शिवरायांच्या सरदार ने बेळवाडीला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा दिला. किल्लेदार सावित्री देसाई नावाची एक स्त्रि होती. तब्बल महिनाभर तिने लढा दिला शेवटी हरली. पण शत्रू भावनेच्या उन्मादात सकुजी ने त्या स्त्रि वर बलात्कार केला. शिवाजींच्या कानी हि गोष्ट पडताच त्यांनी तात्काळ सकुजीचे डोळे काढण्याची शिक्षा देऊन आयुष्यभरासाठी तुरूंगात डांबले. शत्रू असली तरि व कोणत्याही धर्मातील स्त्रियांचा सन्मान करण्यात यावा अशी सक्त ताकिद राजांनी दिली होती. पण सद्या वर्तमानात आपल्या वतनदारांच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्याचे, त्यांना पाठिशी घालण्याचे काम आपल्याला उघड्या डोळ्याने बघावे लागत आहे. हाथरस ची घटना असो कि कठुआ ची असो, कि महाराष्ट्रातील एखादी घटना असो, शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांना शिवाजींचे रूप माहिती नाहि का? कि फक्त राजांचा वापर आपल्या सोईपुरता, फायद्यापुरता व त्यांच्या नावाने धर्मांधता पसरविण्यापुरताच करायचा का? असे प्रश्न पडणे व विचारणे साहजिक आहे. महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला सैनिकांनी हजर केले तेव्हा त्यांनी मातेचा दर्जा देऊन सन्मान केला. यावरून महाराजांचा चारित्र्यसंपन्नता व सौंदर्या संबंधीचा निरोगी दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिवरायांना मानणाऱ्या आजच्या शिवभक्तांनी शिवरायांपासून हे घ्यावे, यासाठी आठवावे.
      इतर राजांच्या सैन्याला लढाई हा व्यवसायच असायचा पण राजेंनी शेतकरी, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या शेतकऱ्यांना सैनिक बनवले होते. ज्यांचा शेतीशी जिवंत संबंध असतो ते लुटारू होत नाही. म्हणून शेती, शेतकरी, लेकी- सुनांचा आदर करणारे सैनिक म्हणून ओळख निर्माण झाली होती. पण सद्या देशात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटल्या जात आहे, हे केवढे मोठे दुर्दैव आहे. शिवाजींचे सैन्य शेती करायचे व गरज पडल्यास मोहिमेवर जायचे. लढाईचा उद्देश लूट करणे नसून लूट थांबवणे हा होता. सूरतेची परकीय लूट करणे ही त्यावेळी गरज म्हणून केली होती. इतर राजांच्या सैन्याला लूटितील हिस्सा मिळायचा त्यामुळे त्यांचा जास्त लूट करण्यावर भर असायचा. पण शिवबांनी हिस्सा न देता ठराविक मेहनताना देण्याचे ठरविले होते. लूट मिळो अगर न मिळो सैन्याला नियमित पगार मिळे. त्यामुळे जास्त लूट करण्यामध्ये हितसंबंध नसायचा. लूटीमध्ये मंदिर, मस्जिद, दर्गा व स्त्रि यांना त्रास होता कामा नये असा सक्त आदेश शिवरायांचा असायचा. मुसलमानांचा धर्मग्रंथ कुराण हाती लागल्यास सन्मानाने आपल्या मुसलमान नोकराकडे देण्याचा आदेश होता. शिवरायांनी स्त्रि-पुरूष यांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्यास बंदी घातली होती.

              सद्या शिवाजी महाराजांच्या नावाने धर्मांधता व समाजामध्ये विकृती पसरविण्याचे काम राजरोसपणे चालू आहे. स्वतःच्या जाति धर्मातील, प्रदेशातील थोर व्यक्तिमत्वांना पूजणे व त्यांच्या माध्यमातून आपले वैयक्तिक किंवा जातिचे, धर्माचे, प्रदेशाचे मोठेपण सांगणे हा मानवी स्वभाव आहे. हे एकप्रकारे ठिक आहे असे मानूयात. छत्रपति शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील हिंदू धर्माचे होते व त्यांची धर्मावर श्रद्धा असून त्याप्रमाणे वागायचे. ते हिंदू होते म्हणून सर्व हिंदूंना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो, यात काहिच गैर नाही. इतके वर्ष लोटूनही महाराष्ट्रातील अशिक्षित व्यक्तिला सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल माहिती पोहचविण्याचे माध्यम म्हणजे पोवाडे, किर्तने, लोककथा, व्याख्याने, चित्रपट वगैरे आहे. पण यातील सर्व घटकांना जाणिवेच्या मर्यादा असतात. शिवाय हे कार्यक्रम लोकांमध्ये जाऊन सांगावे लागते त्यामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी चमत्कार, भडकपणा सांगण्याच्या नादात इतिहासाचा विपर्यास होतो. म्हणून काव्य आणि इतिहास यामधील फरक सर्वांनी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. पण याव्यतिरिक्त ही विकृत विचारसरणी आपल्या समाजात कार्यरत असल्याने वर्तमान स्वार्थ साधण्यासाठी सोईचा होईल असा इतिहास जाणून बुजून सांगितला जातो, पटवला जातो. इतिहासाकडे अपुरे पणाने किंवा चुकीच्या पद्धतीने पाहिल्या जाते आणि स्वार्थासाठी जाणूनबुजून हिंदू विरूद्ध मुसलमान द्वेष पसरविण्यासाठी शिवाजींचा गैरवापर केला जातो.
  बरेच मुसलमान सहिष्णु असल्याचे इतिहासात नोंद आहे. पण यांकडे दुर्लक्ष केले जाते. निजामशाही चा मूळ पुरुष गांगवी हा बहिरंभट कुलकर्णी चा मुसलमान झालेला मुलगा होता, विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहा ची पत्नी मराठा होती, शहाजहान पुत्र व औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह हा तर संस्कृतचा जाणकार होता आणि याची काशीच्या पंडितांमध्ये बैठक असायची. हे सर्व राजे सर्व धर्माला समान मानणारे सहिष्णू होते. अकबर बादशहा चे तर शिवाजी राजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात भरभरून कौतुक केले आहे. बादशहा अकबर ने हिंदू-मुसलमान ऐक्याचा 'दिनेइलाही' नामक धर्माची स्थापना केली होती. मुसलमान राजाकडे अनेक हिंदू सरदार होते याची लांब यादि आहे. ज्यामध्ये स्वतः शहाजीराजे आदिलशाहित होते, शहाजीराजेंचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीत होते असे अनेक शिवाजींच्या रक्ताचे नाते, मराठे व हिंदू मुसलमान राजाकडे इमानेइतबारे कार्यरत होते. हिंदू राजपूत तर त्यावेळी मुसलमान राजाशी विवाहसंबंध सुद्धा जोडायचे व बादशहा प्रति निष्ठा कमी नाहि होऊ द्यायचे. तेव्हा कुणीही यांना धर्म बुडवे म्हणत नव्हते. कारण धर्म मुख्य नसून राज्यनिष्ठा महत्त्वाची होती.
   शिवाजी महाराजांकडे ही मोठमोठ्या हुद्यांवर मुसलमान सरदार, सैनिक होते. आरमार प्रमुख दर्यासारंग दौलतखान, खास व्यक्ती म्हणून मदारी मेहतर, एक वकिल काजी हैदर, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, सरनोबत नूरखान बेग, सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवा इ. व याव्यतिरिक्त सातशे पठाण तुकडी शिवबांच्या सैन्यात होती. त्याकाळी धर्मामुळे, धर्मासाठी लढाया नव्हत्या तर मुख्य उद्देश राज्यविस्तार करणे हाच होता. कार्यसिद्धिसाठी उपयोगी ठरेल तेवढ्यापुरताच धर्म होता. शिवाजींची लढाई ही जाचक धोरणाविरूद्ध होती यासाठी महाराजांना अनेक लढाया हिंदूंविरूद्ध, मराठ्यांविरूद्ध सुद्धा कराव्या लागल्या. तर अनेक मुसलमान राजांच्या मुसलमान राजसत्तेविरोधात सुद्धा अनेक लढाया झाल्या. त्यावेळी सैन्यात हिंदू राष्ट्रवाद किंवा मुसलमान प्रसाराची भावना नसून पोटाला देणाऱ्याशी इमान राखला जाई.
  मुसलमान राजे हिंदूंची मंदिरे लूटत, पाडत इत्यादी पसरविल्या जाते, हे सत्य आहे पण यामागचा हेतू फक्त संपत्ती लूटणे हाच होता. सद्या काहि हिंदू व मुसलमान संघटना आपापल्या धर्मातील लोकांना भडकविण्याचे काम करत आहेत. अनेक मुसलमान राजे त्यावेळी मंदिरांना देणगी देत किंवा लुटलेल्या मंदिरांना दुरूस्ती करत. पाडणे आणि देणगी देणे हे दोन्हीही व्हायचे राज्यासाठी, राज्य प्रस्थापित व टिकवण्यासाठी. कारण मुसलमान राजांना त्रासदायक ठरू लागल्यास मुल्ला मौलवींचीही पर्वा नसे. स्वतः चे राज्य स्थापना व स्थिरतेसाठी धर्माचा वापर व्हायचा किंवा स्वतःची दुष्कृत्ये लपवायला धर्माचा गैरवापर सुद्धा व्हायचा.
   शिवाजीराजे धर्मश्रद्ध होते पण त्यांनी कधीही परधर्माचा द्वेष केला नाही उलट मशिद, पिर, दर्गा यांना देणगी दिली व स्वतः शिवबा मुसलमान फकिर याकुतबाबा यांना मानत. शिवाजींच्या नावाने धर्मद्वेष पसरविणाऱ्या तथाकथित भक्तांनी आपल्या हिंदू - मुसलमान ऐक्याच्या भारतीय संस्कृतीला बदनाम करू नये. मुसलमान बांधवांनी तथाकथित खोट्या शिवभक्तांच्या कारवाया, भाषणे, लिखाण पाहून व काही मुसलमान संघटनांच्या भडकविण्यामध्ये येऊन शिवाजीस ओळखू नये. तर शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा व त्यांचा मुसलमान धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजावून घेऊन मगच काय ते ठरवावे. शिवाजी राजेंनी स्वधर्मा इतकाच परधर्माचा सन्मान केला. उपासना पद्धती वेगळ्या असल्या तरि सर्व धर्माचा उद्देश एकच असल्याचे तत्व शिवरायांनी त्यावेळी मांडले होते. पण सद्या परधर्म द्वेषाच्या पायावरच स्वतःच्या धर्मात उच्च स्थान मिळते या समजुतीवर धर्माची पायाभरणी व धर्माच्या पायावर सत्तेची भिंत चढवल्या जात आहे. पण हे चुकिचे असून लोकशाहिला अतिशय घातक व मारक आहे म्हणून सद्या शिवाजीं सारखी डोळस धर्मसाधनेची नितांत गरज आहे.

         प्रत्येक काळामध्ये प्रत्येक व्यक्तिला विशिष्ट अशा कालसापेक्ष मर्यादा असतात. त्याकाळी शिवाजी राजांना सुद्धा काळाच्या, धर्माच्या, परिस्थितीच्या मर्यादा होत्या म्हणून त्याप्रमाणे राजेंना काही गोष्टि कराव्या लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजा म्हणून मान्य करण्यास हिंदू धर्माचा विरोध होता त्यामुळे एकही ब्राम्हण महाराजांच्या राज्याभिषेकास तयार नव्हता. कारण हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य प्रमाणे राजा फक्त ब्राम्हण व क्षत्रिय च बनू शकत होते आणि शिवाजी कुणबी असल्याने शूद्र वर्णात गणल्या जात होते. शेवटी काशीहून गागाभट्ट नामक ब्राम्हणाला बोलावण्यात आले व त्याने प्रचंड दक्षिणा घेऊन राज्याभिषेक केला. चातुर्वर्ण्य रचनेचा व वर्णवर्चस्वाचा त्रास राजेंनाही झाला. शिवाजी महाराज स्वबळाने, युक्तिने, शौर्याने मिळवलेल्या राज्याचे राजे होते. अगदी औरंगजेब सुद्धा राजेंना मानीत पण धर्माला शिवाजी हे राजे म्हणून मान्य नव्हते. शिवाजी क्षत्रिय होते कि नाही हा मुद्दा निरर्थक आहे कारण व्यक्तिची ओळख त्याने केलेल्या कार्यावरून, विचारावरून होत असते. शिवाजी महाराजांनी वर्णव्यवस्था नुसार शूद्र, अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांच्या पराक्रमाला वाव देऊन मोठ्या हुद्द्यावर नोकरीस ठेवले ज्यामध्ये मुख्य गुप्तहेर बहिर्जी नाईक रामोशी, शिवा न्हावी, जिवा महाला, मराठा, कुणबी, बेरड, आडेकरी इ. अठरा पगड जातिंचा मावळ्यांमध्ये समावेश होता. अतिशय महत्त्वाच्या मोहिमांमध्ये यांची स्वराज्याला भरीव साथ मिळाली. समुद्राच्या सहाय्याने उपजिविका भागविणारे कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान इ. कष्टकऱ्यांना आरमार उभारणीच्या सैन्यामध्ये सामिल करून घेतले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकामध्ये म्हटले आहे कि, _"सामान्यांना शिवाजीने मोठे केले, मग सामान्यांनी शिवाजीला मोठे केले आणि मग सर्वांनी मिळून खूप मोठे कार्य केले. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो 'विचार' एक शक्ति होते आणि ती शक्ति सामान्यांकडून असामान्य कार्य करवून घेते. सामान्यांच्या सहभाग व सहकार्याविना इतिहासातील असामान्य कार्ये घडत नाही. ज्यांचे बरे चाललेले असते त्यांना बदल नको असतो, जुलूम करण्यात सहभागी असणारे जुलूम नाहिसा कसा करतील? बदल हवा असतो जुलूम सहणाऱ्या सामान्यांना आणि शिवाजीने सामान्यांना संघटित, शहाणे, मोठे केले व जुलूमाला आळा घातला."_ पण पेशवाईमध्ये चातुर्वर्ण्य हिंदू धर्माप्रमाणे राज्यकारभार चालत असल्याने अराजकता, जातिभेद खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. म्हणून पेशवाईतील हिंदू धर्म हा भेदाभेद, अन्याय करणारा तर शिवाजींचा हिंदू धर्म समानता, संधी व अंधश्रद्धेच्या विरोधात होता. आपल्याला कोणता हिंदू धर्म हवा?

         सद्या शिवाजी महाराजांना देव बनविण्याचा खोडसाळपणा काहि मतलबी, स्वार्थी लोक करताना दिसत आहे. शिवाजींचा देव केला म्हणजे सर्वांना सोईचे असते. 'तो शिवाजी देव होता म्हणून करू शकला, आपण तर सामान्य माणूस आहे', असे म्हटले म्हणजे त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज राहत नाही. राज्यकर्त्यांना तसे शासन चालविण्याची गरज उरत नाही. गळ्यात, हातात, वाहनावर, मोबाईल वर फोटो ठेवला कि शिवभक्त झाला का? बाकि काहिच करण्याची गरज उरत नाहि का? तत्कालीन शिवाजीं संबंधी काहि चमत्काराच्या अफवा झाल्या असतील तर त्याचा त्यांना फायदा झाला असेल पण सद्या त्यांच्या नावाने त्यांचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून आपण व आपला समाज सावध ठेवावा आणि भोंदू कोण आणि भक्त कोण हे ओळखायला शिवाजी समजून घ्यावेत. शिवाजींच्या तलवारीची अफवा ही अशीच जनमानसांत पसरविण्यात आली. शिवाजींना तलवार भवानीने नाहि दिली तर ती तलवार पोर्तुगाल मध्ये बनल्याचे पुरावे आहेत. लोकांच्या धार्मिक वृत्तीचा, अशिक्षित वृत्तीच्या भावनांचा गैरवापर केला जातो.
    प्रस्थापितांनी थोर पुरूषांचा त्यांच्या हयातीत विरोधच केला पण तरि ही सामान्यांच्या मनातून काहि केल्या जात नसल्यामुळे प्रस्थापित स्वतःच पूजायला लागतात, भांडवल करतात. ज्ञानेश्वरांनी प्राकृतात ग्रंथ निर्मिती केल्याने प्रस्थापितांची ज्ञानाची मक्तेदारी मोडित काढून गरीब, अगदी अशिक्षिताला सुद्धा ज्ञान दिले म्हणून आणि ते गरीब असल्याने धर्माचे प्रस्थापित ठेकेदार त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवायचे. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवून आणि स्वर्गासी पाठवूनही तुकाराम महाराज संपतच नाही म्हणून मंबाजी भट व आताचे त्याचे वारसदार त्यांना पूजायला लागतात. त्यांच्या अभंगांत आपले अभंग घुसवून काहि जण किर्तने करू लागलेत. पण त्यांनी अंधश्रद्धेवर, प्रस्थापितांवर कठोर शब्दांत ओढलेले ताशेरे कालबाह्य ठरवू पाहत आहेत. महात्मा गांधीजींना ही मारणारा नथुराम गोडसे व त्याच्या कटात सामिल असणारे कोणत्या विचारसरणीचे होते याचाही प्रत्येकांनी विचार करावा? आजही गोडसेला पूजणारे आणि गांधी संपत नाहि म्हणून नावापुरते जगभर गांधींचे नाव घेणारे गोडसेचे वारसदार आपल्यात आहेत. त्यांना ओळखून अशी देशविघातक, महाराजांना त्रास देणाऱ्या विचारसरणीचा नायनाट करावा लागेल. काहि वर्षा आधीच आपल्या महाराष्ट्रातील आपल्या तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण विचाराने महाराष्ट्राला नवविचार देऊ पाहणारे कॉम्रेड गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. जेव्हा विचाराला हरवू शकत नाही तेव्हा शरीराला मारून टाकतात. पण विचार नेहमी जीवंत राहतो व असंख्य जणांमध्ये तेवत राहतो. विचार मरत नाही हे आता धर्माचा आंधळा अतिरेक असणाऱ्या सनातन्यांना सुद्धा आजपर्यंतच्या अनुभवातून माहित पडले आहे. पण तरि ही ते हत्या करतात कारण त्यांना वाटते कि यांचा वारसा चालविणारा दुसरा विचार जीव जाण्याच्या भितीने तयार होऊ नये. पण बदल घडवू पाहणाऱ्यांना जीव जाण्याची भीती नसते, त्यांना काहि केल्या बदल हवा असतो. आणि असा विचार करणाऱ्या एका विचारामागे 'आम्ही सारे गांधी' , 'आम्ही सारे पानसरे' , 'आम्ही सारे दाभोळकर' म्हणत हजारो विचार तयार होत असतात, होत राहणार.

  सद्याचे वतनदार भांडवलदारांच्या हिताचे जे काही करता येईल ते करण्यात मशगुल असल्याचे दिसत आहे. यासाठी सामान्य जनतेवर अन्याय करून त्यांची फसवणूक करून त्यांना लुटण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे आणि भांडवलदारांच्या आधीच खूप वाढलेल्या संपत्तीत आणखी भर पडत आहेत. शिवाजी महाराजांच्या राज्याला आपण आदर्श राज्य म्हणतो, इतिहासकार सुद्धा सर्वतोपरी योग्य सुशासन असलेलं राज्य, रयत सुखी असलेलं राज्य म्हणून वर्णन करतात. मग तशा पद्धतीचे राज्य निर्माण करण्यात काय हरकत आहे? त्यावेळी राजेशाही, सरंजामशाही, धर्माचा हस्तक्षेप, परकिय आक्रमण या गोष्टिची चिंता नेहमी सतावत राहायची. पण या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी शिवाजींनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी सुद्धा झाले होते. आता तर देशात लोकशाही आहे व देशाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक गोष्टि उपलब्ध आहे. पण हे सर्व करण्यासाठी फक्त प्रामाणिक मानसिकता हवी. देशासंबंधी भेडसावणारे जागतिक मुद्दे सरकारने मनात आणले तर मिटवू शकत नाहि का? राजकिय हितसंबंध कायम राहावे म्हणून हे मुद्दे असेच राहतात किंवा ठेवतात का? आणि देशांतर्गत धर्माचा गैरवापर केला जातो ते फक्त राजकिय हितसंबंध जोपासण्यासाठी. म्हणून शिवाजी राजा व शिवाजी राजांचे स्वराज्य, राज्यकारभार कसे होते? कुणासाठी होते? आणि सद्या तसे का नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यामध्ये व तसे सुशासन व्हावे व त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे असे ज्याला वाटत असेल तो खरा शिवरायांचा अनुयायी आहे. विचारांचे शस्त्र प्रतिगामी यांकडे ही असते आणि त्यांच्याकडे जे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी ते त्यांच्याकडिल विकृत विचारांचा प्रभावी वापर करतात. पण आपल्याकडे पुरोगामी विचारसरणीचा मोठा वारसा आहे फक्त त्यामध्ये प्रामाणिकपणा कायम ठेवून विचाराला अधिक बळकट बनवूया. आज शिवाजी आपल्यात नाही आणि येऊ पण शकत नाही पण त्यांचे विचार व उपदेश अजूनही आपल्यात आहे. म्हणून चला खरा शिवाजी समजून घेऊ व समजता समजताच जिथे बरे चालले नसेल तिथे बदल घडविण्यासाठी सज्ज होऊया.
जय जिजाऊ! जय शिवराय!!

  (सदर लेख कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाल्याने स्वतःचे मत मांडण्यासाठी लिहू शकलो. मी असे लेख लिहित राहावे यासाठी कृपया तुमचा अभिप्राय नक्की कळवा.)
(खूप मेहनतीने लेख लिहिला आहे, खरे छत्रपति शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा लेख आहे. कृपया वेळ काढून संपूर्ण लेख वाचा, विचार करा आणि प्रतिक्रिया कळवा)

 ✍🏻 मनोज प्रल्हाद गावनेर
    मंगरूळ चवाळा, अमरावती
      9730408891
manojgawner1995@gmail.com

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर ▪️तात्काळ अन्टीजन/आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याचे आवाहन

कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर
▪️तात्काळ अन्टीजन/आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याचे आवाहन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोव्हीड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात येऊ नये यासाठी जनतेनी ताप, सर्दी,खोकला तसेच साधारण सौम्य लक्षणे जरी असले तरी अँन्टिजन किंवा आरटीपीसीआर तपासणी तात्काळ करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी गर्दी टाळणे,तोंडाला मास्क लावणे व शासनाने वेळोवेळी जे आदेश निर्गमित केले आहे त्याचे पालन करून जनतेने सहकार्य करावे असे त्यांनी स्पष्ट केले.कोव्हीड-19 अर्थात कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य दुसरी लाट जिल्हयात न येण्याकरीता जिल्हयातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व मेडिकल असोसियशनची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, महानगर पालिका आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक,महानगर पालिका उपायुक्त प्रदिप जगताप,महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत हे उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर म्हणाले की,महाराष्ट्रात मागील महिन्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून जिल्हयातही रुग्णांची संख्या वाढली आहे.सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णामध्ये कोवीड-19 ची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णांचे समोपदेशन करुन अँन्टिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी.तसेच कोव्हीड लसीकरण सर्व खाजगी डॉक्टरांनी व त्यांच्या स्टॉफनी करुन घ्यावी व कोव्हीड लसीकरणाबाबत जनजागृती करावी असे सांगितले.कोव्हीड-19 विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हयात दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपले रुग्णालय व इन्फास्ट्रकचर सुस्थितीत तयार करुन ठेवावे.तसेच कोवीड सेंटर उभारणी करीता प्रशासकीय परवानगी लागल्यास त्यांना तात्काळ परवानगी देण्यात यईल.तसेच ऑक्सीजन सिलेंडर लागल्यास प्रशासनामार्फत ऑक्सिजन सिलेंडरही उपलब्ध करुन देण्यात येतील असे जिल्हाधिकारी म्हणाले.कोव्हीड चाचण्या वाढविण्याकरिता कॅम्पचे आयोजन करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला पाहिजे.मागील वर्षी सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक,नर्स व हेल्थ वर्कर यांनी कोरोना विषाणू आजार रोखण्याकरीता खुप चांगले काम करुन प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले आहे.आताही या सहकार्याची अपेक्षा आहे असे ते यावेळी म्हणाले.कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता जनतेने तोंडला मास्क लावणे,हात सॅनिटाईझ करणे आणि सामाजिक अंतर राखून या नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या बैठकीस इंडियन मेडिकल असोशियसन,आयुर्वेद व्यवसायिक, निमा असोशियसन,होमिओपॅथिक असोशियसन,केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशियसनचे अध्यक्ष,सदस्य व खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.         

श्री सोमेश्वर मित्र मंडळ दहीखेड शिवजन्मोत्सव निमित्त आदर्श घ्यावा असा "माझी सुंदर शाळा" हा उपक्रम...

श्री सोमेश्वर मित्र मंडळ दहीखेड शिवजन्मोत्सव निमित्त आदर्श घ्यावा असा "माझी सुंदर शाळा" हा उपक्रम...

 


सोनपेठ (दर्शन) :-

श्री सोमेश्वर मित्र मंडळ दहीखेड आयोजित प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने "माझी सुंदर शाळा" ही संकल्पना राबवून या उपक्रमाद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहीखेड येथे सोनपेठ तालुक्यातच नाही तर परभणी जिल्ह्यातुन आदर्श घ्यावा असे शाळेला  तारेचे कुंपण,सुशोभिकरण,वृक्षलागवड व वाढदिवसा निमित्त शाळेला ग्रंथदान असा कार्यक्रम दिनांक 19 फेब्रुवारी 2021 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.सचिन खुडे (गट वकास अधिकारी पंचायत समिती सोनपेठ) प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून मा.संदिपान शेळके (पोलीस निरीक्षक)
 तसेच मा.डाँ.सिध्देश्वर हालगे (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोनपेठ) व मा.शौकत पठाण (गटशिक्षणाधिकारी) आदि मान्यवर लाभनार असून या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते याचे उद्घाटन वृक्षारोपण तसेच वाढदिवसानिमित्त ग्रंथनाम कार्यक्रम संपन्न होणार आहे.या माध्यमातून शिवजन्मोत्सव साजरा करण्याची श्री सोमेश्वर मित्र मंडळ दहीखेड यांनी इतर कुठेही खर्च न करता "माझी सुंदर शाळा" या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळे मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा आपलाच पाल्य असून तो उद्याचा जिल्हाधिकारी, उद्याचा पोलीस अधीक्षक, उद्याचा एखादा नेता घडावा एवढीच अपेक्षा ठेवून आपला खर्च सत्कारणी लागावा या उदात्त हेतूने ही सर्व मित्र मंडळी एका व्हाट्सअप ग्रुप मधून एकत्र आलेली आहे सात जणांचा हा व्हाट्सअप ग्रुप आजच्या घडीला 126 लोकांचा झालेला असून यामध्ये त्यांच्या ज्याच्या त्याच्या व्यवसायाच्या परीने फुलना फुलाची पाकळी 500, 1000, 2000, 3000, 5000 अशी मदत शाळेसाठी दिलेली आहे.परभणी जिल्ह्यातील पहिलीच अशी शिवजन्मोत्सव निमित्य संकल्पना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहीखेड उकीरड्यातुन नंदनवनात रुपांतर करुन श्री सोमेश्वर मित्र मंडळ यांनी राबविल्याबद्दल यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे या साठी सा.सोनपेठ  दर्शन परीवाराच्या वतिने तसेच सर्वच स्तरातून श्री सोमेश्वर मित्र मंडळाचे अभिनंदन होताना दिसत आहे.


Wednesday, February 17, 2021

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी  जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये परभणी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या हद्दीत दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 28 फेब्रुवारी  2021 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

                                                          

बाळशास्त्री जांभेकरांची 20 फेब्रुवारीला जयंती प्रथमच शासकीय स्तरावर साजरी होणार

बाळशास्त्री जांभेकरांची 20 फेब्रुवारीला जयंती 
प्रथमच शासकीय स्तरावर साजरी होणार


मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

आद्य पत्रकार,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केल्याने येत्या 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकरांची 209 वी जयंती प्रथमच राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जात आहे..उशिरा का होईना सरकारने बाळशास्त्री जांभेकरांचा थोर व्यक्तीच्या यादीत समावेश करून त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी सरकारला धन्यवाद दिले आहेत.मराठी पत्रकार परिषद देखील 20 फेब्रुवारी रोजी राज्यभर बाळशास्त्रींची जयंती साजरी करीत आहे.
बाळशास्त्री जांभेकर यांची जन्म तारीख कोणती याबद्दल विविध मतप्रवाह आहेत.फेब्रुवारी 1812 च्या शेवटच्या आठवडयात बाळशास्त्रींचा जन्म झाला असावा असे बहुतेकांचे मत आहे..शासकीय स्तरावर देखील या संदर्भात संभ्रम आहे.त्यामुळेच 14 जानेवारी 2021 रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरमध्ये 16 फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती असल्याचे म्हटले होते.मात्र 11 फेब्रुवारी रोजी सरकारने शुध्दीपत्रक काढून 20 फेब्रुवारी रोजी शासकीय,निमशासकीय कार्यालयात बाळशास्त्रींची जयंती साजरी करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यामुळे यंदा प्रथमच राज्यात शासकीयस्तरावर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी होत आहे..गुगलवर बाळशास्त्रींचा जन्म 6 जानेवारी रोजी झाल्याचे म्हटले आहे..मात्र ते तद्दन चूक असून ही चूक दुरूस्त करण्यासाठी परिषद गुगलकडे पाठपुरावा करीत आहे.6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी नियतकालिक सुरू केले होते.त्या दिवशी बाळशास्त्रींचा जन्म झालेला नाही.बाळशास्त्रींच्या जन्मतारखेप्रमाणेच त्यांच्या छायाचित्रांबद्दल देखील मतप्रवाह आहेत.गुगलवर बाळशास्त्री जांभेकरांची चार भिन्न छायाचित्रं आहेत.मात्र मराठी पत्रकार परिषदेने प्रसिध्द केलेले जांभेकरांचे छायाचित्र हेच योग्य असल्याचे मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते.2000 मध्ये पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राचे प्रकाशन करण्यात आले होते.बाळासाहेब ठाकरे यांनी मान्यतेची मोहर उमटविलेले छायाचित्रच सरकारने वापरावे यासाठी मराठी पत्रकार परिषदेने पाठपुरावा केला होता.गेली दोन वर्षे सरकारचे माहिती आणि जनसंपर्क खाते हे छायाचित्र वापरत आहे.बाळशास्त्री जांभेकर यांचं वयाच्या केवळ 32 व्या वर्षी निधन झालं होत..त्याचं शरीर व्यायामानं पिळदार झालेलं होतं आणि बुध्दीमत्तेचं तेज त्यांच्या चेहरयावर विलसत होतं.यासर्व गोष्टीचा विचार करून मुकुंद बहुलेकर या प्रसिध्द चित्रकाराने हे छायाचित्र काढले होते.सर्व सरकारी कार्यालयाने देखील खालील छायाचित्रंच वापरावे असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.

नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा; यंत्रणांनी कर्तव्यात ढिलाई दाखवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा; यंत्रणांनी कर्तव्यात ढिलाई दाखवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे




मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असेही श्री.ठाकरे म्हणाले. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

 

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.



जिल्ह्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिले.

 

राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

 

राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रिय रुग्णालये करण्यात आली आहे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाणांचे, शौचालयांचे, बसस्थानके, उद्याने याठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम हाती घ्यावे. नियमांचे पालन करायचे की पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे याची निवड लोकांच्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या काळात अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

 

कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यांना जो निधी देण्यात आला आहे त्यातील शिल्लक असलेला निधी ३१ मार्चपर्यंत वापरायला परवानगी देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

 

जनारोग्य योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ देतानाच ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहेत तेथील सार्वजनिक कार्यक्रमांमधील गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना आरोग्यमंत्री. श्री. टोपे यांनी केली.

महत्वाचे मुद्दे:

कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत
मधल्या काळात आपण ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’ राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सहव्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करावी.
ज्या ज्या व्यावसायिक संस्था,संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व  संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्यावी.
जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करावी.
बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करावी.ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत तेथे जाऊन कोरोना चाचणी करावी.विवाह समारंभासाठी पोलिस परवानगी आवश्यक.बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात -जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर

जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात -जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

सध्याची कोव्हिडजन्य परिस्थिती पाहता  जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्या वाढविणे आवश्यक झाले आहे.  महापालिकेने शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तातडीने चाचण्या कराव्यात. दररोज किमान एक हजार  आरटीपीसीआर चाचण्या होणे गरजेचे आहे. असे कडक निर्देश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिले.
         कोविड-19 बाबत बी.रघुनाथ सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
       पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की, कोचिंग, मंगल कार्यालय, दुकाने, बस स्थानक, रेल्वे स्थानक यासह गर्दीच्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. मास्क वापरत नसलेल्या लोकांना दंड करण्यासाठी शहरात 10 पथके स्थापन करावेत. मास्क न घालता दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना प्रवेश देणाऱ्या दुकानदारास दंड करावा तो दंड भरण्यास नकार दिल्यास दुकान सील करावी. अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 लोकांची चाचणी तातडीने करावी. जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांची सर्वप्रथम आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. तसेच इतर जिल्हातून  परभणी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या सर्व  व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येवून त्यांना प्रवेश देण्यात यावा. तसेच मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी प्राधान्याने करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच तालुकानिहाय आरोग्य विभागाचा आढावा घेवून शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा जाणून घेवून विविध निर्देश दिले. या बैठकीस संबंधित अधिकारी, आयएमए व केमिस्ट संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

Tuesday, February 16, 2021

शिवजन्मोत्सव सोहळा साध्या पध्दतीनेच साजरा करा- पो.नि.संदिपान शेळके ; पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी नागरिकांची बैठक संपन्न

शिवजन्मोत्सव सोहळा साध्या पध्दतीनेच साजरा करा- पो.नि.संदिपान शेळके ; पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमी नागरिकांची बैठक संपन्न


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यात दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव हा साध्या पध्दतीने साजरा करावा,असे प्रतिपादन येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी केले.मंगळवारी (दि.१६) येथील पोलीस ठाण्याच्या प्रांगणात शिवप्रेमी नागरिकांची बैठक संपन्न झाली.यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शक सूचना देताना शेळके बोलत होते.कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्य शासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवप्रेमींची बैठक बोलावली होती.बैठकीच्या अध्यक्षस्थानी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके हे होते तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने हे उपस्थीत होते. तालुक्यातील कुठल्याही ठिकाणी शिवजन्मोत्सव निमित्ताने मिरवणूक काढली जाणार नसून अशा मिरवणुकीला सोनपेठ पोलीस परवानगी नाकारणार असून संबंधितांवर कडक कारवाई करतील.त्यामुळे शिवप्रेमींनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे,असेही शेळके यांनी यावेळी सांगितले.उपस्थित शिवप्रेमींनी देखील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करणार असल्याचे सांगितले.या बैठकीला जय भवानी मित्र मंडळाचे बळीराम काटे, सार्वजनिक  शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अशोक भुसारे, नारायण रोडे, पत्रकार गणेश सुरवसे, संपादक किरण स्वामी यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.बैठकीच्या यशस्वीतेसाठी दिलीप निलपत्रेवार, जमादार अनिल शिंदे,ओम यादव, मधुकर ढवळे, आनंद कांबळे यांनी पुढाकार घेतला.



आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद (लहु राघोजी साळवे) यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद (लहु राघोजी साळवे) यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 




 (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एखदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.

वस्ताद लहुजी साळवे
जन्म:नोव्हेंबर १४इ.स. १७९४
पेठ, पुरंदर जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत
मृत्यू:फेब्रुवारी १७इ.स. १८८१
पुणेमहाराष्ट्रभारत
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा समाज सुधारक
संघटना:हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
नौजवान भारत सभा
धर्म:हिंदू
प्रभावित:ज्योतिबा फुले बळवंत फडके बाळ गंगाधर टिळक उमाजी नाईक इ.
वडील:राघोजी साळवे
आई:विठाबाई
पत्नी:अविवाहित

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना 'राऊत ' या पदवीने गौरविले होते.पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजीं चे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रू वर तुटून पडले होते व सपासप तलवारीचे वार करत शत्रुंना जमिनीवर लोळवत होते. अखेर या संकटातुन बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले.राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या समोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळकवासुदेव बळवंत फडकेजोतिबा फुलेगोपाळ गणेश आगरकरचापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहेइ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ११वीच्या पुस्तकामध्ये वीर वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म इ.स.१८०० मध्ये झाल्याचे नमुद आहे. उपमा -धर्मवीर लहुजी वस्ताद, आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद.