विशेष पथका कडून शेकडो वाहनांवर दंडात्मक कार्यवाही ; वाहनधारकात संताप,उद्धट वागणूक झाल्याची चर्चा.
जिंतुर / सोनपेठ (दर्शन) :-
जिंतूर तालुक्यातील मौजे बोरी पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाद्वारे दि.2 ऑगस्ट रोजी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्य यांच्या आदेशावरून कौसडी फाटा या ठिकाणी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पथकातील पोलीस कर्मचारी , पोलीस अधिकारी यांच्यामार्फत जिंतूर परभणी रस्त्यावरील ये जा करणाऱ्या
दुचाकी, चार चाकी वाहन धारकास गाडी साइडला लाव, मोहीम चालू आहे कळत नाही का? असे म्हणत कागदपत्र दाखव अशी अरेरावीची भाषा वापरून पथकातील पोलिस कर्मचारी वाहनधारकास दमदाटी करत एकदाच तीन-चार जण येऊन वाहनधारकास उद्धट वागणूक देत काठीचा धाक दाखवित असल्याची चर्चा वाहनधारक आतून केली जात आहे.याविषयी सविस्तर असे जिंतूर परभणी रस्त्यावरील बोरी येथील कौसडी फाट्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुचाकी व चारचाकी अशा सुमारे 100 हून अधिक वाहनांवर कार्यवाही केली ही कार्यवाही करत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांची रनिंग मध्ये गाडीची चावी काढून घेत तीन चार पोलीस कर्मचारी कागदपत्राच्या नावाखाली वाहनधारकास उद्धट वागणूक देत एखादा आरोपी प्रमाणे काठीचा धाक दाखवत असल्याची चर्चा वाहण वाहनधारकातून केली जात आहे व उद्धट वागणूक दिल्यामुळे वाहनधारकातून पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त होत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
100 पेक्षा जास्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली व प्रत्येक वाहनाकडून दोनशे रुपये दंड आकरणयात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मार्कड यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment