वैज्ञानिक भित्तीपत्रकाचे प्रदर्शन संपन्न
सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व विवेक वाहीनीच्या वतीने हशिप्रमंचे संस्थापक अध्यक्ष कै. राजाभाऊ कदम व अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती दिन हा 'वैज्ञानिक दृष्टिकोण दिन'च्या निमित्ताने वैज्ञानिक माहीती देणाऱ्या भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून हशिप्रमंच्या उपाध्यक्षा ज्योतीताई कदम तर ऊद्घाटक डॉ. विष्णू राठोड, प्रमुख पाहूणे म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. बालासाहेब काळे, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, दत्ता पवार, पत्रकार गणेश पाटील व सुभाष सुरवसे, डुबे, प्रा. गोविंद लहाने, डाॅ. मुकुंदराज पाटील, रियाज खान, अब्दूल गणी(ऊर्दू) हे होते.
शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयातील विविध प्रकारची बनवून भित्तीपत्रकाचे प्रदर्शन आयोजीत केले होते. यात बी. एस्सी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांबद्दल, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सापांविषयी तर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शरिरातील संस्थाबद्दल भित्तीपत्रके तयार केली होती. या प्रदर्शनास शहरातील महालिंगेश्वर विद्यालय, मुक्तेश्वर विद्यालय, डॉ. झाकिर हुसैन उर्दू विद्यालय, कै. राजाभाऊ कदम विद्यालयांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह भेट दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रास्ताविक प्रा. भैय्यासाहेब जाधव तर आभार प्रा. पांडुरंग फले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विशाल राठोड, प्रा. गोविंद वाकणकर, प्रा. अंगद फाजगे, विवेक वाहीनीच्या प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी, प्रा. डॉ. अशोक चव्हाण, प्रा. डॉ. शिवाजी अंभुरे, प्रा. डॉ. शिवाजी वडचकर, प्रा.पवन पांचाळ, प्रा.अंकिता डाके यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment