किशोरवयीन मुलींच्या समस्या व समुपदेशन कार्यशाळेचे ऊद्दाच दि.14 रोजी आयोजन
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथे कै.र.व.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'किशोरवयीन मुलींच्या समस्या व समुपदेशन कार्यशाळेचे'आयोजन दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आले आहे. बालपण ओलांडून तारुण्यात प्रवेश करण्या आधीचा काळ म्हणजे किशोरावस्था. नुकताच बालपण संपलेलं पण तरीही परिपक्वता न आलेलं हे वय. मुला-मुलींच्या आयुष्यातील लोभसवाणं तरीही अवघड वळण. काहीतरी कळायला लागतं पण नीटसे आकलन होत नसतं, त्यामुळे शिकायची जाणून घ्यायची इच्छा किंवा धडपड, कधी कुतूहल ,कधी संकोच ,तर कधी अनामिक भय अशा संमिश्र भाव भावनेमध्ये असलेले हे वय, म्हणूनच कधीं न बोलता ही मदत मागणार असं हे किशोरवय या वयातील मुलींच्या समस्यांवर मुलींशी संवाद साधून ,सखोल चर्चा व्हावी या उद्देशाने प्रस्तुत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे त्यात प्रामुख्याने सौ.ज्योती शिंदे (कदम) हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष या उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून डॉ. उषा माने डॉ.अर्चना पारशेवार, श्रीमती सरस्वती रोडे, श्रीमती आहिरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळे साठी सोनपेठ परिसरातील सर्व शाळेतील सातवी ते दहावी च्या विद्यार्थिनींनी कै.र.व.महावीद्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत सातपुते ,समन्वयक डॉ. सुनिता टेंगसे, मुख्याध्यापक श्री धिवार के.डी .यांनी केले आहे.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment