सोनपेठ येथे बकरी ईद उत्साहाने साजरी ; मुस्लीम बांधवानी 15 हजार रूपये चंदा जमा करून दिला पुरग्रस्तांसाठि
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरात पंरमपरेनुसार तमाम मुस्लीम बांधव परमेश्वरा प्रति अखंड निष्ठा आणी त्याग व बलिदानाचा संदेश देणारी "ईद उल अज्हा" अर्थात "बकरी ईद" शहरात अती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शहरातील सोनखेड येथील ईदगाह मैदानावर मोलाना हाफेज गफार व मोलाना समीयोद्दीन काजी यांच्या मार्गदर्शनात हजारोच्या संख्येने मुस्लीम बांधवानी सामूहिक नमाज अदा केली यावेळी हाफेज गफार यांनी खुत्ब्याचे वाचन करून परमेश्वरकडे सामाजिक सलोखा व पुरग्रस्तांनसाठी दुवा मागीतली व ईदगाह मैदानात जमलेल्या मुस्लीम बांधवाना कोल्हापूर / सातारा येथील पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले त्याच्या आवाहानास प्रतिसाद देत नमाजा साठी ईदगाह मैदानावर जमलेल्या तमाम मुस्लीम बांधवानी कोल्हापूर / सातारा येथील पुरग्रस्तांनसाठी 15 हजार रूपये चंदा जमा करण्यात आला.
सोनपेठ परीसरातील बातम्या व जाहिराती साठि
सा.सोनपेठ दर्शन एकमेव आपले वृतपत्र संपादक
किरन रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment